You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जामियामध्ये गोळीबार कुणी केला?
दिल्लीतील जामिया भागात गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोमध्ये हा तरुण हवेत पिस्तुल रोखताना दिसतो. पोलीस या तरुणाला घेऊन जात असताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला त्याचं नाव विचारलं. हा तरुण अल्पवयीन आहे.
आम्ही फेसबुकवर या नावाने सर्च केल्यावर गोळीबाराच्या आधीची काही माहिती मिळाली. हे फेसबुक अकाउंट व्हेरिफाईड नाही. मात्र, या खात्यावरून जे फोटो आणि व्हिडियो शेअर करण्यात आले त्यावरून जामियामध्ये गोळीबार करणारा तरुण हाच असल्याचं कळतं.
गोळीबार करण्यापूर्वीची सर्व माहिती एका या फेसबुक अकाउंटवरून घटनास्थळावरूनच पोस्ट करण्यात येत होती.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फेसबुक फीडच्या अनेक पोस्ट्समध्ये हा तरुण स्वतःला हिंदुत्व समर्थक असल्याचं सांगतो. या प्रोफाईलवर पूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये हा तरुण हातात पिस्तुल आणि मोठी कट्यार घेऊन दिसतो.
गोळीबार करण्यापूर्वी तरुणाने काय लिहिलं?
जामिया भागात फायरिंग करण्यापूर्वी तरुणाने केव्हा आणि काय म्हटलं, बघूया.
30 जानेवारी, सकाळचे 10.43 वा. - कृपया सर्व बंधुंनी मला SEE FIRST करावं
10.43 AM - लवकरच सांगेन. उपदेश राणा
10.44 AM - CAAच्या समर्थनार्थ बसलेल्या एका व्यक्तीचा फोटो.
12.53 PM - जामिया भागातून फेसबुक लाईव्ह. यात गर्दी दिसते.
1.00 PM - एक मिनिट में बहन ** रहा हूं.
1.00 PM - आजादी दे रहा हूं.
1.00 PM - माझ्या घराकडे लक्ष ठेवा.
1.00 PM - मी इथे एकटाच हिंदू आहे.
1.09 PM - कॉल करू नका.
1.14 PM - माझ्या अंतयात्रेत मला भगव्यात गुंडाळून न्या आणि जय श्री रामच्या घोषणा द्या.
1.22 PM - इथे कुठलाच हिंदू मीडिया नाही.
1.25 PM - शाहीन बाग खेल खत्म.
यानंतरच्या काही फेसबुक लाईव्हमध्ये तरुणाने खांद्यावर बॅग घेऊन धरणं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी दिसतो. या व्हीडियोमध्ये तो काहीच बोललेला नाही.
गोपाल मूळचा कुठला आहे?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर गोपाल नोएडालगतच्या जेवर इथला राहणारा आहे. जेवरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे.
गोपालने त्याच्या फेसबुक इंट्रोमध्ये लिहिलं आहे - "रामभक्त गोपाल नाम है हमारा. बायो में इतना ही काफी है. बाकी सही समय आने पर. जय श्री राम."
फेसबुक बायोमध्ये आपण बजरंग दलाशी संबंधित असल्याचं तो सांगतो. बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना आहे.
मात्र, 28 जानेवारी रोजी टाकलेल्या एका पोस्टमध्ये तो लिहितो - मी सर्व संघटनांपासून मुक्त आहे.
29 जानेवारी रोजीही त्याने एक पोस्ट टाकली होती. त्यात तो लिहितो - पहला बदला तेरा होगा भाई चंदन. (पहिला सूड मी तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा उगारेन, भाऊ चंदन.)
26 जानेवारी 2018 रोजी उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये अनेक तरुणांनी बाईकवरून तिरंगा यात्रा काढली होती. यात हिंसाचार उफाळल्यानंतर झालेल्या गोळीबारीत चंदन गुप्ता यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)