उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप : पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड आणि अनिल देशमुख यांनी 2021मध्ये राजीनामे दिले आहेत.

खातेवाटप करताना गृहमंत्रिपदाची धुरा अनिल देशमुख यांच्या खांद्यावर, तर वनमंत्रीपदाची जबाबदारी संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखातं अजित पवार यांना देण्यात आलं. बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं . अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, जयंत पाटील यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे मंत्रिपद मिळालं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीनं राज्यात सत्ता स्थापन केली.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर 30 डिसेंबर रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर 43 कॅबिनेट आणि राज्यमंत्री असं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे.

कॅबिनेट मंत्री आणि त्यांचं खातं

शिवसेना

कॅबिनेट मंत्री

1. उद्धव ठाकरे- मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, विधी-न्याय

2. सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

3. एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्व. बांधकाम (सार्व. उपक्रम)

4. उदय सामंत - उच्च-तंत्र शिक्षण

5. दादाजी भुसे - कृषी

6. गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा

7. संदिपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन

8. अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य

9. आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

10. शंकराराव गडाख (अपक्ष) - जलसंधारण

राज्यमंत्री

1. अब्दुल नबी सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. शंभुराज शिवाजीराव देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

3. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राष्ट्रवादी

कॅबिनेट

1. अजित पवार (उपमुख्यमंत्री) - वित्त, नियोजन

2. छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा

3. दिलीप वळसे पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क

4. जयंत पाटील- जलसंपदा

5. नवाब मलिक - अल्पसंख्याक कल्याण

6. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन

7. राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य

8. हसन मुश्रीफ - ग्रामविकास

9. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण

10. बाळासाहेब पाटील - सहकार, पणन

11. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

1. दत्तात्रय विठोबा भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

2. संजय बाबुराव बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

3. प्राजक्त प्रसादराव तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

4. आदिती सुनिल तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

काँग्रेस

कॅबिनेट

1. बाळासाहेब थोरात - महसूल

2. अशोक चव्हाण - सार्व. बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून)

3. नितीन राऊत - ऊर्जा

4. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण

5. सुनील केदार - पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण

6. विजय वडेट्टीवार - ओबीसी कल्याण

7. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

8. के.सी. पाडवी - आदिवासी विकास

9. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

10. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास

राज्यमंत्री

1. सतेज उर्फ बंटी डी. पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

2. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)