शिवसेना-भाजपमधला सत्तासंघर्ष: परतीच्या पावसात सोशल मीडियावर आलंया मीम्सचं पीक

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 10-12 दिवस झालेत. जनतेने शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिल्यावरही सत्तास्थापनेचा प्रश्न अजूनही काही सुटताना दिसत नाहीये. उलट, ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटत आहेत.

त्यातच राज्यभरात लांबलेल्या पावसाने मांडलेलं थैमान आणि व्यथित झालेला बळीराजा, यामुळे गेल्या आठवड्याभरात सोशल मीडियावर मीम्सचं चांगलंच पीक आलेलं दिसतंय.

अनिल कपूरने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी एका चित्रपटाबाबत चर्चा करतानाचा हा फोटो त्यांनी ट्वीट केला होता. हा जुना फोटो मीम्स तयार करणाऱ्यांनी शोधून काढलाय.

अभिनेता अनिल कपूर 'नायक' सिनेमात 24 तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता. त्याचा संदर्भ सद्यपरिस्थितीशी जोडत अनिल कपूर आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटोखाली `महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. उद्या होणार शपथविधी' असं लिहून शेअर केलं आहे.

मध्यंतरी शिवसेनेकडून वाटाघाटीत जेही ठरतंय, ते भाजपकडून लिहून घेणार असं म्हटलं होतं. त्यावर सतीश आचार्य यांनी हे कार्टून रेखाटलं आहे.

अन्य एका मीममध्ये "सरकार नसलं तरी चालतंय", असा टोमणा मारण्यात आला आहे.

दोन्ही पक्षांवरील असे कार्टून्सही चांगलेच व्हायरल होत आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या कविता सोशल मीडियावर चांगल्याच लोकप्रिय आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात तेही सक्रिय असल्याने त्यांचं नाव वारंवार येत आहे.

म्हणून असंही एक मीम व्हायरल होत आहेच.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या एका बातमीनुसार आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "या सगळ्यात माझं नाव विनाकारण घेतलं जात आहे. निवडणुकीत माझ्या पक्षानं खूप जागा जिंकल्या नाहीत. तरीही मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर, मी चांगलं काम करून दाखवेन."

मराठीत गाजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाला 31 वर्षं पूर्ण झाली असली, तरी त्यातलं प्रत्येक पात्र आणि संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमातल्या संवादांचा आधार अनेक मीम्समध्ये घेतला जातो. परंतु सध्याचा सत्तास्थापनेच्या तिढ्याला संवाद नाही तर सिनेमाच्या पोस्टरचा आधार घेतला आहे.

ट्विटर, फेसबुक आणि सगळ्यात जास्त व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या मीम्सबरोबरच सध्याच्या परिस्थितीवर चपखल असे विनोदही शेअर होत आहेत.

लांबलेला पाऊस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहूनच जाणार, त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री ठरवा, अशा आशयाचे विनोद फिरत आहेत.

दुसऱ्या एका फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह करत आहेत.

ह्रतिक रोशनच्या 'सुपर 30' चित्रपटातील एका सीनचा वापर करून उद्धव ठाकरे अमित शहा यांना 'ही चिटींग आहे', असं म्हणत असल्याचं फोटोमध्ये म्हटलंय.

काहींनी सॅक्रेड गेम्सचा हा मीम शेअर केला आहे.

त्याशिवाय दोन्ही पक्षांबाबतचे अनेक विनोद, चार ओळीतल्या वात्रटीका व्हायरल होत आहेत.

त्यापैकी एकामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी विविध पर्याय सांगण्यात आलेले आहेत.

एकूणच, सत्तास्थापनेमधली कारस्थानं, मतं, सेनेच्या मागण्या, भाजपाची भूमिका अशा सगळ्या गदारोळात सामान्यांना मीम्समधून जरा मजा घेता येतेय. नेटकऱ्यांच्या सृजनशीलतेला एक व्यासपीठ या सगळ्या घडामोडींमधून मिळालं, हे मात्र नक्की.

त्यामुळेच की काय, कार्टूनिस्ट मंजूळ यांनी हे कार्टून काढलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)