You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सुषमा स्वराज राजकारणातल्या सुनील गावस्कर होत्या'
- Author, प्रदीप सिंह
- Role, वरिष्ठ पत्रकार
सुषमा स्वराज यांचा आज (14 फेब्रुवारी) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा सुषमा स्वराज यांनी केली होती. तेव्हा त्यांच्याच पक्षातील 80 ते 90 वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती या शब्दाची अॅलर्जी होती.
त्यामुळे अवघ्या 66 व्या वर्षी त्यांनी राजकारणातून एकप्रकारे निवृत्ती घोषित केली तेव्हा सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या.
पण त्यांच्या आरोग्याबाबत विचार केल्यास हे अपेक्षित होतं. ज्यांना सुषमा स्वराज यांच्या आरोग्याबाबत माहिती होतं त्यांना या घोषणेचा अर्थ कळला होता.
त्यांचे पती आणि माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचं नाव अशांमध्ये पहिल्या स्थानी आहे. सुषमा स्वराज यांच्या घोषणेनंतर त्यांचे पती म्हणाले होते, एक वेळ अशी आली की मिल्खा सिंह यांनीही धावणं बंद केलं होतं. सुषमा स्वराज तर मागच्या 41 वर्षांपासून निवडणूक लढवत आहेत.
पुढची लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करून त्यांनी एका निरोगी परंपरेला पुढे नेलं. अशा प्रकारची घोषणा करणारे राजकारणात अपवादानेच आहेत. अशा प्रकारचं पाऊल उचलणारे पहिले होते नानाजी देशमुख. राजकारण्यांनी साठाव्या वर्षीच निवृत्त झालं पाहिजे असं बोलून ते निवृत्त झाले होते.
राजकारणातील सुनील गावस्कर
पण लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी यांच्या काळात असं वाटतं की ज्याप्रकारे त्या 25 व्या वर्षी राजकाणात आल्या होत्या. त्याचप्रकारे लवकरच निवृत्त झाल्या. ही घोषणा करून त्यांनी आपले गुरू लालकृष्ण आडवाणी यांनाच अवघडल्यासारखं केलं होतं.
पण या घोषणेमुळे सुषमा स्वराज भारतीय राजकारणातल्या सुनील गावस्कर बनल्या होत्या. त्यांनासुद्धा लोक हाच प्रश्न विचारत होते जसा गावस्करांना विचारला होता, आताच का?
सुषमा स्वराज एक प्रखर आणि ओजस्वी वक्ता, प्रभावी संसदपटू आणि कुशल प्रशासक होत्या. एक वेळ होती जेव्हा भाजपात अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज आणि प्रमोद महाजन सर्वात लोकप्रिय वक्ता होत्या. मग ती बाब संसदेतील असो किंवा रस्त्यावरची.
सुषमा स्वराज यांना भाजपाच्या डी-फोर म्हणजेच दिल्ली-फोरपैकी ओळखलं जायचं. त्यांच्याशिवाय प्रमोद महाजन, अरूण जेटली, आणि व्यंकय्या नायडू हे बाकीचे तीन होते. भाजपाच्या दुसऱ्या पीढीच्या सगळ्या नेत्यांप्रमाणे हे सगळे जण अटल-आडवाणी आणि विशेषतः आडवाणी यांनी तयार केलेले नेते होते.
सुषमा स्वराज यांचा वर्ष 2009 ते 2014 पर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळा त्यांच्या राजकीय जीवनाचा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. वर्ष 2006 ला प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर आणि लोकसभेत विरोधी पक्षनेत्या बनल्यानंतर भाजपात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीत त्यांनी बाजी मारली असं म्हटलं गेलं.
या सगळ्या वैशिष्ट्यांनंतरही सुषमा स्वराज कधीच भाजप अध्यक्ष बनू शकल्या नाहीत. याचे दोन कारण होते. संघटनेच्या कामापेक्षाही संसदीय कार्यात त्यांचा रस अधिक होता. डी-फोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी नसलेल्यांपैकी त्या एकट्याच होत्या.
त्यांचे वडील संघातील प्रभावी लोकांपैकी एक होते. पण त्यांचे पती जॉर्ज फर्नांडीस यांचे सोबती होते. त्यांना चंद्रशेखर आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता पार्टीमध्ये वाढवलं होतं.
जनता पार्टीचं विभाजन झाल्यानंतर त्या भाजपात आल्या होत्या. विविध पक्षातील समाजवादी नेत्यांची सहानुभूति आणि आदर सुषमा स्वराज यांना मिळत गेलं. आपल्या साध्या स्वभावाने विरोधकांना निरूत्तर करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे पक्षाप्रमाणेच पक्षाबाहेरसुद्धा त्यांचे मित्र होते. मागच्या चार दशकांमध्ये त्यांनी 11 निवडणुका लढवल्या. त्यापैकी तीन वेळा त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या.
पक्षाला कमतरता भासणार?
सन 2013 साली नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी लालकृष्ण अडवाणींची शेवटपर्यंत साथ दिली होती. पण 2014 साली जेव्हा मोदी पंतप्रधान बनले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
अटकळ होती अडवाणींची साथ दिल्याबद्दल मोदी त्यांना माफ करणार नाहीत. कदाचित मोदींचा मोठेपणा असेल किंवा सुषमा स्वराज यांची पात्रता किंवा त्यांना आपल्यासोबत ठेवण्याची गरज, मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळात ते स्थान दिलं जे त्यांना आधी कधीही मिळालेलं नव्हतं.
सुषमांनीही आपल्या वागण्यात कधीही कटुता येऊ दिली नाही. त्यांचं वागणं नेहमीच सौहार्दपूर्ण होतं. त्यांनी आपल्या वागण्यातून हे कधीही दर्शवलं नाही की त्या मोदींच्या विरोधक होत्या.
असं असतानाही हे सुषमा मोदी-शाहांच्या भाजपपासून तुटलेल्या होत्या हे नाकारता येत नाही. पक्षाच्या राजकीय निर्णयांमध्ये त्यांची भूमिका मर्यादित होती.
गेल्या काही काळापासून आपल्या तब्येतीच्या तक्रारींमुळे त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्यांची जागा अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या वक्त्यांनी घेतली होती. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशेष प्रचार केला नाही, आणि निवडणूक लढवलीही नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)