You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटकात राजकीय नाट्याला वेग, 11 आमदार मुंबईत
कर्नाटकात राजकीय नाट्याला वेग आला असून 13 असंतुष्ट आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यापैकी 11 आमदार मुंबईच्या सोफीटेल हॉटेलमध्ये थांबल्याची बातमी एएनआयने दिली आहे.
कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलाचं सरकार अल्पमतात आलं आहे. तिथे भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे, असं म्हटलं जात आहे.
13 महिन्यातच कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसचं सरकार संकटात आलं आहे.
राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसच्या 10 तर जेडीएसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश यांनी आमदारांचा राजीनामा स्वीकारला तर 224 आमदारांच्या कर्नाटक विधानसभेत या युतीत 118 आमदारांची संख्या कमी होऊन 105 होईल.
बहुमतासाठी 113 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. कर्नाटकात भाजपाचे 105 आमदार आहेत विधानसभेचे अध्यक्ष आज आणि उद्या सुटीवर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची दखल ते मंगळवारी घेतील असं त्यांनी सांगितलं.
मी आमदारांच्या संपर्कात- सिद्धारमय्या
काँग्रेस नेते सिद्धारमय्या म्हणाले, "मी पाच सहा आमदारांच्या संपर्कात आहे. मी सगळी माहिती देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने माझ्याशी निष्ठावान असण्याचा संबंध नाही. सर्व आमदार पक्षाशी निष्ठा ठेवून आहेत. सगळ्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवावी अशी अपेक्षा आहे." ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान मल्लिकार्जून खरगे यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरगे यांनी मात्र या शक्यता नाकारल्या आहेत. ते म्हणाले, "मला याबाबत काहीही कल्पना नाही. हे युती सरकार टिकावं अशी माझी इच्छा आहे. आमच्यात फूट पाडण्यासाठी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरवली जात आहे."
त्याचवेळी माझा या राजकीय घडामोडींशी संबंध नाही असं वक्तव्य भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी केलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींची सगळ्यांना कल्पना आहे. पुढे काय होतंय ते पाहू असंही ते पुढे म्हणाले.
सोमवारी 5-6 आणखी आमदार राजीनामा देऊ शकतात. भाजप 105 आमदारांसकट सरकार स्थापनेचा दावा करू शकते असं बोललं जात आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा सगळ्यांत धक्कादायक आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)