You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बसप-सपाची उत्तर प्रदेशात युती : लोकसभा निवडणुकीचं बिगुल
देशाच्या राजकारणात अत्यंत प्रभावी राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष (सपा) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) प्रत्येकी 38 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदार संघातील 76 जागा ही युती लढवणार आहे.
अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत तर दोन जागा अन्य मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी लखनौच्या ताज हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षात होणाऱ्या युतीची औपचारिक घोषणा केली.
युती दीर्घकाळ टिकेल- मायावती
मायावती या वेळी म्हणाल्या, "मी हे सांगू इच्छिते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. त्या काळात देशातील वंचितांविरुद्ध अन्याय झाला आहे."
त्या म्हणाल्या, "काँग्रेसच्या काळात गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्याचाच पारिपाक म्हणून बसप आणि सपा या पक्षांची निर्मिती झाली जेणे करून काँग्रेस पक्षापासून मुक्ती मिळेल."
युतीसंदर्भात मायावती म्हणाल्या, " ही युती फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठीसुद्धा असेल."
मायावतींचा अपमान म्हणजे माझा अपमान
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, "मायावतींविषयी जेव्हा भाजपा नेत्यांनी अशोभनीय वक्तव्यं केली. इतकंच नाही तर या नेत्यांना मंत्रिपदंही दिली तेव्हाच आम्ही मायावतींच्या पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला."
पंतप्रधानपदासाठी कुणाला पाठिंबा?
मायावती यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे, त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्याल का, या प्रश्नाचं उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, " मी कुणाला पाठिंबा देणार हे तुम्हाला महिती आहे. उत्तर प्रदेशने देशाला सतत पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशातून कुणी पंतप्रधानपदावर पोहोचत असेल तर मला आनंदच होईल."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)