श्रीनगर गारठलं : 28 वर्षांतील सर्वांत कमी तापमानाची नोंद

- 7.6 डिग्री सेल्शियस तापमानासह श्रीनगरनं गेल्या 28 वर्षांमधील सर्वाधिक थंड अशी डिसेंबरची रात्र अनुभवली आहे, हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.

यापूर्वी 7 डिसेंबर 1990ला तापमान -8.8 डिग्री सेल्शियसपर्यंत घसरलं होतं. 1990ला शहरानं सर्वांत थंड अशी रात्र अनुभवली होती. तेव्हा शहराचं तापमान -7.2 डिग्री सेल्शियस होतं. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे.

यामुळे श्रीनगरजवळील पाण्याचे नळ, तलाव आणि इतर पाण्याचे स्रोत गारठले आहेत.

पहेलगाममध्ये - 8.3 डिग्री सेल्शियस तर गुलमर्गमध्ये -9 डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. लेहमध्ये - 8.4 तर कारगिलमध्ये -17.2 तापमान नोंदवलं गेलं आहे.

नौकेचे मालक सकाळीच नौकानयन करण्यास धजावत नाहीत. कारण तलावातील बर्फाच्या लगद्यामुळे नौका खराब होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे, असं एका नौकेचे मालक सांगतात.

काश्मीरमध्ये चिल्लाई-कलन चा काळ सध्या सुरू आहे. या काळात काश्मीरमध्ये तापमानात वारंवार बदल आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते.

चिल्लाई-कलन ची सांगता 31 जानेवारीला होते. पण त्यानंतर काश्मीरमध्ये थंडी कायम राहते. यानंतर 20 दिवस चिल्लाई-खुर्दचा (कमी थंडी) काळ असतो तर 10 दिवस चिल्लाई-बच्चा (बेबी कोल्ड) काळ असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)