आजारी पर्रिकरांवर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा भार का?

फोटो स्रोत, Twitter
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दुपारी साडेतीनची वेळ. पणजीत ऊन तापलं होतं. आणि त्याचवेळी अतिशय कृश व्यक्ती मांडवी पुलावर सुरक्षेसाठी हेल्मेट घालून अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत होती. नाकात नळी घातलेली, चालताना त्रास होत असलेला आणि आधाराला सोबत एक व्यक्ती.
अर्थात ते होते गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर. त्यामुळेच कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या पर्रिकरांना अशा स्थितीतही मुख्यमंत्रिपदाचा भार वाहायला लावणं अमानवी असल्याची टीका विरोधक करत आहेत.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे त्यांच्यावर अनेक महिने उपचार सुरु आहेत. त्यासाठी ते अमेरिकेलाही जाऊन आले. मात्र अशा नाजूक अवस्थेतही त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी भाजप नेतृत्वाने कायम ठेवली.
कॅन्सरच्या आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं वजनही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं छायाचित्रांमधून जाणवत आहे.
काल मनोहर पर्रिकर यांनी आधी मांडवी आणि झुआरी नदीवरील पुलाची पाहणी केली. त्यासाठी पर्वरी ते मेर्सिस असा सहा किलोमीटरचा प्रवासही पर्रिकरांनी केला.
पुलाची पाहणी करताना त्यांनी बांधकामासंबंधी अधिकारी व अभियंत्यांशी चर्चा केल्याचेही या फोटोमध्ये दिसून येत. आहे. त्यामुळेच गंभीर आजारी स्थितीतही त्यांना काम करायला लावून त्याची जाहिरात केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीवर टीका सुरू झाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
''मनोहर पर्रिकर यांच्या नाकामध्ये नळी घातल्याचे दिसून येत आहे. या स्थितीत त्यांना काम करायला लावणे अत्यंत अमानवी आहे. हा दबाव आणि तमाशा टाळून पर्रिकर यांना त्यांच्या आजाराचा सामना करण्याची परवानगी का दिली जात नाही?'' असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीटरवर विचारला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मुख्यमंत्री साहेब काळजी घ्या, तुमचा पक्ष तुमची काळजी घेणार नाही
''त्यांच्या नाकामध्ये नळी घातलेली दिसत आहे का? आजारपण असूनही कामाला जुंपण्याइतका पक्ष सत्तालोलुप कसा होऊ शकतो? सत्ता बळकावणे, सत्तेत बसून राहाणे हे भाजपाला अजिबात अशक्य नाही. मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही काळजी घ्या, तुमचा पक्ष (तुमची) काळजी घेणार नाही'', असे ट्वीट काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.
मनोहर पर्रिकर दृढ आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. ते या गंभीर आजाराशी अत्यंत धाडसाने लढत आहेत. मात्र ताण येईल, इन्फेक्शन होईल अशा ठिकाणी नळी वगैरे लावून त्यांना का पाठविण्यात आले? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी विचारला आहे. विरोधकांकडून टीका होत असल्याबाबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना विचारले असता त्यांनी, मी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
महत्त्वाची खाती मनोहर पर्रिकर यांच्याकडेच
मनोहर पर्रिकर गेले अनेक महिने कॅन्सरवर उपचार घेत आहेत. त्यांना प्रशासनाच्या रोजच्या कामकाजामध्ये सहभाग घेता येत नाही. गोव्यातील सध्याच्या प्रशासकीय स्थितीबाबत प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. ''सध्या पर्रिकर यांच्याकडे वित्त, गृह, दक्षता, कार्मिक, सामान्य प्रशासन आणि इतर मंत्र्यांना न दिलेली खाती आहेत. पर्रिकर यांच्य तब्येतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्यानंतर एखादी बैठक घेऊन त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात. पुन्हा चर्चा थंडावल्यावर हाच प्रकार पंधरा दिवसांच्या अंतराने केला जातो असे तीन-चार महिने सुरु आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रशासन चालवण्यासाठी कोणत्याही काळजीवाहू पदाची निर्मिती करण्यात आलेली नाही. पर्रिकर यांनी आजारपणामुळे पद सोडावे अशी मागणी काँग्रेसने सुरुवातीच्या काळामध्ये केली नव्हती. मात्र आता मात्र प्रशासनाबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर तशी मागणी होताना दिसते.'' असे ते म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
या वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने पर्रिकर अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यापूर्वी पर्रिकरांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सप्टेंबर महिन्यात पुन्हा अमेरिकेत उपचार घेऊन ते भारतात परतले आहेत.
या उपचारादरम्यान त्यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात "माझ्यावर सुरू असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यांत तुमच्यासोबत असेन," असं ते म्हणाले होते.
हे वाचलंत का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








