You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेरी कोमने रचला इतिहास : 6व्या वेळा बनली विश्वविजेती
पाच वेळा जागतिक बॉक्सिंग विजेती एम.सी. मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली आहे. मेरी कोमने48 कि.ग्रॅ. लाईट फ्लाईटवेट कॅटेगरीत युक्रेनच्या हेना ओखोटाचा पराभव केला.
35 वर्षीय मेरी कोमने शनिवारी नवी दिल्लीतील के. डी. जाधव इनडोअर स्टेडिअममध्ये एकतर्फी झालेल्या लढतीत हेनाला 5-0 ने मात दिली.
मेरी कोमने याआधी 2010 मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याशिवाय 2002, 2005, 2008 मध्येही त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.
या विक्रमाबरोबरच मेरी कोमने आयर्लँडच्या केटी टेलर यांच्या विश्वविजेतेपदाचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर विश्वविजेतेपदाच्या इतिहासात मेरीने पुरुष बॉक्सर फेलिक्स सेवनच्या सहा वेळा विश्वविजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
युक्रेनची हेना फक्त 22 वर्षांची आहे. तिच्यात आणि मेरीकोममध्ये 13 वर्षांचं अंतर आहे. हंटर या टोपणनावाने प्रसिद्ध असलेली हेना युरोपियन यूथ चँपिअनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)