'राज ठाकरे गुंड आहेत' : नाना पाटेकर प्रकरणात तनुश्री दत्ताचा मनसेवर हल्ला

तनुश्री दत्ता और नाना पाटेकर

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता

अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून मला धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तनुश्री दत्ताने आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन केला.

थेट मनसे आणि राज ठाकरेंवर हल्ला चढवत ती म्हणाली, "मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरे गुंड आहेत, त्यांनी आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत. राज ठाकरे त्यांना तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतात."

"लीडर न झाल्याचे खदखद त्यांच्या मनात आहे. कुणीच तुम्हाला लीडर बनवणार नाही. कारण लोकांना सरकार राज नकोय. लीडर तो असतो, जो गरजू लोकांची, महिलांची सुरक्षा करतो. महिलांवर दबाव टाकत नाही आणि महिलांच्या गाडीवर हल्ला चढवत नाही," असं तनुश्रीनं म्हटलं होतं.

तनुश्रीला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचंय, म्हणून ती असे बेताल विधानं करत आहे, असं मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर ABP माझाशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर

तनुश्रीचे हे आरोप एक "पब्लिसिटी स्टंट" असल्याचं सांगत, "आम्हाला काय गरज तिच्या गाडीची तोडफोड करायची? आम्हाला हेच शिकवलं आहे का राज साहेबांनी?" असं खोपकर बीबीसीशी बोलताना म्हणाले.

"नाना पाटेकरांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यासोबत मी काम देखील केलं आहे. ते कोणत्याही महिलेसोबत असा गैरव्यवहार करणार नाहीत," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

2008मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नव्याने केल्याने खळबळ उडली आहे.

नाना पाटेकर बॉलिवुडमधील अनेक महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, पण यावर कुणाची बोलायची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकावल्याचंही तनुश्रीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

तिने हेच आरोप काही वर्षांपूर्वीही केले होते, असं सांगण्यात येत आहे, मात्र तिच्या बोलण्याची दखल आता अधिक गांभीर्याने घेतली जात आहे.

नाना पोटेकर

फोटो स्रोत, Getty Images

नाना काय म्हणाले?

तनुश्रीचे हे आरोप नानाने फेटाळून लावले असून याप्रकरणी तनुश्रीला कोर्टात खेचणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "चित्रीकरण सुरू असताना माझ्याबरोबरच सेटवर अनेक लोक होते. मी काहीही केलेलं नाही, हे त्यांना माहिती आहे," ते टाइम्स नाऊबरोबर बोलताना म्हणाले.

"कुणी काय बोलावं यावर नियंत्रण कसं ठेवणार? तिच्या आरोपाबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा विचार मी करत आहे?" असं नाना पाटेकर म्हणाले.

बॉलिवूडमधूनही तनुश्रीला पाठिंबा

फोटो स्रोत, Getty Images

बॉलिवुडमधूनही तनुश्रीला पाठिंबा

तनुश्रीनं केलेल्या आरोपानंतर बॉलिवुडमध्ये याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. काही कलाकारांनी यावर बोलणं टाळलं असलं तरी काही कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.

सोशल मीडियावर #IBelieveYouTanushreeDutta हे हॅशटॅग वापरत अनेक कलाकार तिच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकरांनी तनुश्रीसोबत गैरवर्तन केलं, तेव्हा मी तिथंच होते, असा खुलासा पत्रकार जॅनिस सेक्वेरा हिनं केला आहे. एका ट्विटर थ्रेडमधून तिने संपूर्ण किस्सा सांगितला आहे, जो तनुश्रीने सांगितलेल्या घटनाक्रमाशी मिळताजुळता आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अभिनेता फरहान अख्तरनं जॅनिस सकीराचं ते ट्विट रीट्विट करतं तनुश्रीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर, प्रियांका चोप्रानं देखील फरहानच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनं 'तनुश्रीवर आरोप करण्यापूर्वी 'हे' ट्विट वाचा. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला सामोर जावं लागतं, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे,' असं म्हटलं आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे हिने तनुश्रीला "खूप धाडसी" म्हणत पाठिंबा दिला आहे. फेसबुकवर एका पोस्टमध्ये त्या लिहितात, "मी नाना पाटेकर किंवा तनुश्री दत्तासोबत काम केलेले नाही. मी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातही नव्हते. पण तनुश्रीच्या प्रकरणात अनेक असे मुद्दे आहेत, जे मी स्वत:शी जोडू शकते."

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

"नाना पाटेकर हे त्यांच्या रागीट स्वभावासोबतच शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दलही ओळखले जातात. गाण्याच्या शूटिंगदरम्यान कदाचित तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा नानांचा उद्देश नसेलही, पण जर ती स्टेप तनुश्रीला खटकत होती, नानांचा स्पर्श तिला खटकत होता, तर त्यात बदल करणं ही नानांसह दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर यांची जबाबदारी नव्हती का? एका स्टेपमध्ये बदल केल्याने चित्रपट फ्लॉप झाला असता का?" असे प्रश्न रेणुका शहाणे यांनी उपस्थित केले आहेत.

"तनुश्री जर त्या सेटवर उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याची मुलगी असती तर तिच्यासोबतही असंच घडलं असतं का? कदाचित स्वत:ची मुलगी असणं आणि मुलीसारखी असणं, यात हाच फरक असावा," असं रेणुका यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 2

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 2

या पोस्टनंतर रेणुका शहाणे यांनी 2008 मध्ये त्या घटनेनंतर तनुश्रीच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओसुद्धा फेसबुकवर शेअर केला. "24 वर्षांच्या तनुश्रीवर कशाप्रकारे दबाव टाकण्यात आला, तिला धमकावण्यात आलं, हे या व्हिडिओतून पाहायला मिळतं," असं त्यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)