You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबादमधील निजाम संग्रहालयातून 50 कोटींचा लंच बॉक्स चोरीला
हैदराबादमधील राजघराण्यातील हिरेजडित सोन्याचा लंचबॉक्स चोरीला गेला आहे. हैदराबाद पोलीस या प्रकरणी चोरांचा कसून शोध घेत आहे.
चोरट्यांनी रुबी आणि सोन्याचा चहाचा कप, बशी आणि चहाचा चमचा चोरला आहे. यांचं एकूण वजन 3 किलो इतकं आहे. या संपूर्ण ऐवजाची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे.
हा संपूर्ण ऐवज हैदराबादचा शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली खान यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या काळातील जगातील सर्वांत श्रीमंतापैकी ते एक होते.
सोमवारी सकाळी या चोरीचा उलगडा झाला. आदल्या दिवशी चोरी झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. या कुटुंबाच्या मालकीची असलेली तलवारही 10 वर्षांपूर्वी चोरीला गेली आहे.
या चोरीत दोन लोकांचा सहभाग आहे असा संशय पोलिसांनी बीबीसी तेलुगूकडे व्यक्त केला.
हिंदुस्तान टाइम्सच्या मते चोरीचं रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड केली. या वस्तू एका काचेचं आवरण असलेल्या एका कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी चोरट्यांनी कॅबिनेटचे स्क्रू काढून मग या वस्तू चोरल्या.
या सगळ्या वस्तू निजाम संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. हे संग्रहालय लोकांसाठी 2000मध्ये खुलं करण्यात आलं होतं. मीर उस्मान अली यांना 1937मध्ये मिळालेल्या भेटवस्तू तिथे संग्रहित करण्यात आल्या आहेत.
भारतातील तेव्हाच्या काळात सगळ्यात मोठ्या संस्थानावर खान यांनी राज्य केलं होतं. 1967मध्ये त्यांचं निधन झालं.
त्यांच्या अमाप संपत्तीत प्रसिद्ध जेकबच्या हिऱ्याचा समावेश होता. हा हिरा अंडाकृती होता. इतरही अनेक मौल्यवान दागिन्यांचा या संपत्तीत समावेश होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)