शेतकरी संप सोशल : 'मग बळीराजा किती पिढ्या फासावर टांगणार?’

फोटो स्रोत, Twitter
शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवस संपाचं हत्यार उपसलं आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यामुळेच हा पवित्रा घेण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर, सरकार दिलेली आश्वासनानं पाळत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
यावर भारिपचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी पवारांवर निशाणा साधत, "पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समूहांचे नेते आहेत," अशी टीका केली आहे. तर पवारांचं वक्तव्य चिथावणीखोर असल्याची टीका भाजप नेते पाशा पटेल यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या असून काहींनी शरद पवारांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राहुल शिंदे म्हणातात,"शरद पवार हे शेतकऱ्यांचे हितशत्रू आहेत. ते शेतमालाला कवडी मोल किंमतीत विकत घेऊ पाहणाऱ्या उद्योजकांचे प्रतिनिधी आहेत."

फोटो स्रोत, Facebook
राहुल शिंदे यांनी त्यांची सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यांच्या या प्रतिक्रियेशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे.
शरद पवार जे म्हणतात ते योग्य आहे, असं स्वप्नील पाटील यांना वाटतं.

फोटो स्रोत, Facebook
मिलिंद रविंद्र पाटील यांनीही सरकारवर टीका करत रोखठोक सवाल विचारला आहे.
ते म्हणतात, "मागच्या सरकारवर किती दिवस खापर फोडणार आहात? मागची सरकारं काही कामाची नव्हती म्हणून तुम्हाला सत्तेवर बसवलं, तर तुम्हीही तेच करतायेत. मग शेतकऱ्यांनी आपल्या किती पिढ्या फासावर लटकवायच्या?"
सचिनसिंह राजपुत यांनीही त्याचं मत सविस्तरपणे मांडलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"चारा छावण्या आणि टँकर मुक्त महाराष्ट्र केल्याबद्दल फडणवीस सरकारचे आभार मानायचं सोडून तुम्ही पाय ओढत आहेत, हे सर्व जनतेला दिसतं बरं," असं राजपुत यांनी पवारांना उद्देशून विचारलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
सुधीर जोशींनी मात्र तुरीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला चांगलचं धारेवर धारलं. तसंच फडणवीस सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Facebook
जयमाला धनकिकर यांनी सरकार बधीर झालं असल्याची टीका केली आहे. तसंच, ज्या सरकराला लोकांचं दुख: दिसत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपचं सरकार येण्यापूर्वी शेतकरी सोन्याच्या महालात राहत होता ना? असा सवाल सोनल वर्तक यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Facebook
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








