You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काय काय खास होतं या आठवड्यात; पाहा फोटो
कडाक्याच्या उन्हापासून थोडी उसंत मिळावी म्हणून चेन्नईतली या मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला.
अमृतसर शहराच्या सीमेवर असलेल्या वडाळी गावातल्या इंद्र कॉलनीतली मुलं कंदीलाच्या प्रकाशात वाचन करताना. 1970च्या दशकात सरकारच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या या कॉलनीमध्ये नियमितपणे वीज पुरवठा होत नाही.
आंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुलम जिल्ह्यातले लोक केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. तिथं झालेल्या हिमवर्षावामुळे ही मंडळी तब्बल 30 तास अडकून पडली.
बीएसएनएल वगळता इतर कोणत्याही टेलिफोन कंपनीचं नेटवर्क तिथं नव्हतं. शेवटी काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं ते सुखरूप परतले.
1857चा उठावाला 161 वर्ष झाल्याचं स्मरण म्हणून 10 मे 2018ला हैद्राबादमध्ये जनसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा राष्ट्रध्वज फडकवला.
चेन्नईतल्या एका बंदरावर साचलेला हा कचरा. या कचऱ्यातून वापरण्यायोग्य वस्तू शोधताना माणूस दिसतो.
कामगारांनी जालंधरच्या कालव्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा जाळला. त्याच कालव्याच्या पुलावरून जाणारी ही महिला.
अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा यांनी लग्नानंतर माध्यमांना अशी पोझ दिली. मुंबईत नुकतंच या दोघांचं लग्न पार पडलं.
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी कुटुंबीयांसोबत सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत जान्हवी कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मलूर गावात सायकलवरून प्रचार केला. मलूर हे बेंगळुरूपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.
राजस्थानमधल्या अजमेरमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर सकाळीच टिपलेला हा फोटो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)