You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'राज ठाकरे कर्ण, फडणवीस कुंभकर्ण आणि सोशल मीडिया नारदमुनी'
काँग्रेसचं 84 वं महाअधिवेशन दिल्लीत झालं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात मोदी सरकारवर टीका केली.
भाजप - काँग्रेसची लढाई ही कौरव- पांडवांच्या लढाईसारखी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या सत्तेसाठीच्या युद्धाला काँग्रेस सत्याच्या लढाईनं उत्तर देईल, असं ते म्हणाले.
हजारो वर्षांपूर्वी इथे कुरुक्षेत्रावर युद्ध झालं होतं. कौरव ताकदवान होते पण अहंकारी होते. तर पांडव नम्र होते. कौरवांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सत्तेसाठी लढण्याचं आहे. पांडवांप्रमाणे काँग्रेस सत्यासाठी लढत आहे, असंही ते पुढे म्हणाले.
याला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, 'कोण कौरव आणि कोण पांडव हे जनतेला चांगलं माहिती आहे.'
त्यापार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की, कोणता राजकीय नेता तुम्हाला पुराणातल्या कोणत्या पात्राच्या सर्वांत जवळचा वाटतो? वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
सुशील पवार यांनी महाभारतातल्या सगळ्या पात्रांची यादीच दिली आहे. त्यांना मोदी रावण वाटतात, तर फडणवीस कुंभकर्ण वाटतात. "काँग्रेस कृष्ण आहे तर भाजप भीम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नकुल आणि आपचा मात्र अर्जुन झालाय," असं त्यांना वाटत. मीडिया शकुनी मामा तर शिवसेनेनं मात्र कर्ण असंही ते म्हणतात.
मयुर गुंजाळ यांना राज ठाकरेंचा कर्ण झाला आहे असं वाटतं.
स्वप्नील कोळपे अमित शहांना शकुनी मामा म्हणतात. त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी दुर्योधन आहेत तर राहुल गांधी अभिमन्यू. शरद पवारांना त्यांनी भीष्म पितामहांच्या जागी बसवून टाकलं आहे.
संजय उजनीकरांना मात्र तसं वाटतं नाही. ते लिहितात, "शरद पवार धूर्त आहेत, पण ते चुकीच्या लोकांचं सारथ्य करतात. त्यामुळे त्यांना कृष्ण म्हणता येणार नाही. धृतराष्ट्र म्हणता येईल."
निवृत्ती पवारांना भाजप कौरवांच्या भूमिकेत दिसतो. "राहुल गांधी अर्जुन, शरद पवार कृष्ण, अडवाणी भीष्म पितामह तर मोदी धृतराष्ट्र आणि शहा शकुनी वाटतात.
महेश फडतरे यांचं वेगळंच मतं आहे. "महाभारताची तुलना राजकारण्यांशी कशाला?" असा प्रश्न ते विचारतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)