You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेघालयात काय होणार?
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्रिपुरात भाजपनं 25 वर्षांचा डाव्यांचा किल्ला भेदत यश मिळवलं. प्रथमच भारतीय जनता पक्षाला या छोट्या राज्यात मतदारांचा कौल मिळाला आहे.
मेघालयात स्थानिक पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामाना रंगला. नागालँडमध्ये 11 जागा भाजपला मिळाल्या आहेत.
तिन्ही राज्यांतील निकालांचं चित्र आणि कौल बीबीसी मराठीच्या या पानावर सतत अपडेट होत होता. आता हे लाईव्ह पेज बंद करत आहोत.
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जाहीर झालेले आकडे खालील प्रमाणे -
त्रिपुरा
भाजप-35, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) -16, पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा- 8
मेघालय
भाजप-2, काँग्रेस-21, नॅशनल पीपल्स पार्टी-19, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी-6
नागालँड
भाजप-11, नागा पीपल्स फ्रंट-27, नॅशनल प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी- 15,
(मतमोजणीचे कल, स्रोत : भारत निवडणूक आयोग)
नागालँडला वार्तांकनासाठी गेलेले बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी तिथल्या निकालाचा अर्थ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितला. ते पाहण्यासाठी क्लिक करा.
त्रिपुरातील कल
- विधानसभेच्या 59 मतदारसंघासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 23 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्रिपुरामध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत.
- चालीराम मतदारसंघातील CPMचे उमेदवार रामेंद्र देवर्मा यांच निधन झाल्यानं या जागेवर 12 मार्चला मतदान होईल.
मेघालयमधील कल
- 59 मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 372 उमेदवार मैदानात आहेत.
- मेघालयातील 59 मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत 84 टक्के मतदान झाले आहे.
नागालँडचे कल
- 59 मतदारसंघांमध्ये एकून 193 उमेदवार रिंगणात आहेत.
- विल्यमनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जोनाथन संगमा यांचं बाँबस्फोटात निधन झालं. त्यामुळे इथलं मतदान रद्द करण्यात आलं.
19.05 डाव्यांच्या जुलमाला नागरिकांनी मतदानानं उत्तर दिलं - मोदी
- भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आजवर हत्या करण्यात आली. निवडणुकीदरम्यान 500हून जास्त आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. पण त्यांचं रक्त वाया गेलेलं नाही.
- भय आणि भ्रमाचा आधार घेत आतापर्यंत माओवादी विचारांनी, डाव्यांनी जुलूम केला. त्यांच्या या जुलूमाला मतदानानं नागरिकांनी उत्तर दिलं आहे.
- मी एक गोष्ट ऐकली की, वास्तुशास्त्र असं समजतात की घराच्या रचनेत नॉर्थ इस्टचं महत्तव सर्वांत जास्त असतं. त्यामुळे आम्ही नॉर्थ इस्ट वर लक्ष केंद्रित केलं.
- काँग्रेस पक्षापासून आता आम्ही जास्तच सावध राहायला हवं. काँग्रेस कल्चर आपल्यात मिसळायला नको.
- आता 360 अंशाचा विचार करायला हवा. म्हणजे संपूर्ण देशात भाजपच्या सत्तेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत राहायला हवं.
- जनतेचे आशीर्वादाची आम्ही व्याजासहित परतफेड करणार.
19.00 अजानसाठी मोदी थांबले
पंतप्रधान मोदी यांनी ईशान्य भारताच्या भाजप विजयानंतर दिल्लीत भाषणाला सुरुवात केली. तेवढ्यात अजानची बांग ऐकू आली. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून दोन मिनिटं शांत राहण्यास सांगितलं. मोदींनी भाषणही या काळात थांबवलं.
17.30 मोदींच्या अजेंड्याला मतदारांची साथ असल्याचे हे संकेत - अमित शहा
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मिळालेला विजय पाच पिढ्यांना अपेक्षित विजय होता, अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नोंदवली आहे. आता कर्नाटकसह इतर राज्यांच्या निवडणुका लढवण्याचा उत्साह वाढला असल्याचंही ते म्हणाले.
"मेघालयातले निकाल अद्याप स्पष्ट नाहीत. पण उर्वरित राज्यांचा विचार केला तर आता देशातल्या 21 राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (NDA) सरकार आहे. भाजपचं हे यश म्हणजे मोदींच्या अजेंड्याला मतदारांची साथ असल्याचे हे संकेत आहेत", असं अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
"ही सर्व आदिवासी बहुल राज्यं आहेत. त्रिपुरातल्या 20 जागा आदिवासी भागातल्याच होत्या. त्या सर्व जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. हे भाजपसाठी शुभसंकेत. या पुढच्या निवडणुकांसाठी हा विजय उत्साह वाढणारा आहे", असं शहा म्हणाले.
ईशान्य भारताच्या जनतेला शांती पाहिजे. विकास हवा हे सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले. जनादेश थर्मामीटरसारखा असतो, असं सांगत त्यांनी भव्य विजयाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
15.45 त्रिपुरात भाजप सत्तेच्या जवळ
त्रिपुरात आतापर्यंत 19 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
भाजपला 7 जागी विजय मिळाला असून 28 जागी आघाडी मिळाली आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 7 जागी विजयी, तर 9 जागी आघाडीवर आहे.
पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा 5 जागी विजयी, तर 3 जागी आघाडीवर आहे.
15.35 मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीची काँग्रेसला टक्कर
निवडणूक आयोगाने मेघालयातल्या 26 जागांचे निकाल जाहीर केले आहेत.
त्यानुसार, भाजपला 2 जागांवर विजय मिळाला असून युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेवर पक्षाला आघाडी आहे. हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने 2 जागांवर विजय मिळवला आहे.
खरी लढत काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये झाली.
काँग्रेस -12 उमेदवार विजयी, 9 जागी आघाडीवर
नॅशनल पिपल्स पार्टी 5 उमेदवार विजयी, 14 जागी आघाडीवर.
15.30 : नागा पीपल्स फ्रंटला 10, भाजपला 3 तर NDPला 3 जागा
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नागालँडमध्ये 17 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
या आकडेवारीनुसार भाजपला 3 जागी विजय मिळाला असून 7 जागांवर त्यांना आघाडी आहे.
नागा पिपल्स फ्रंट 10 जागी विजयी, 14 जागांवर आघाडीवर
नॅशन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने 3 जागी विजयी, 12 जागांवर आघाडी मिळवली आहे
एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
15.00 : बीबीसी मराठीला दिसलेले 'नागा'रंग
गेले 12 दिवस बीबीसी मराठीची टीम (मयुरेश कोण्णूर, शरद बढे आणि शालू यादव) नागालँडमध्ये होती. निवडणुकीचं वार्तांकन करणाऱ्या या टीमला नागालँडचे अनेक रंग दिसले. त्यांनी काही धमाल गोष्टीही अनुभवल्या. या सगळ्याची झलक पाहण्यासाठी क्लिक करा.
14.45 : योगी आदित्यनाथ म्हणतात त्रिपुराचा विजय ऐतिहासिक कारण...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुराच्या विजयाला ऐतिहासिक म्हणून संबोधलं आहे.
"पंतप्रधानांनी पूर्वेकडच्या राज्यांच्या विकासाची योजना तयार केली आहे. पहिल्यांदाच कोणत्या तरी सरकारनं पूर्वेकडच्या राज्यांना प्राधान्य देऊन तशी योजना आखली आहे. तसंच प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला असं सांगण्यात आलं आहे की, त्यांनी पूर्वेकडील राज्यांत जावं, तिथल्या समस्या समजून घ्याव्यात. विकास फक्त निवडकांच्या खिशात नको राहायला तर तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवा", असं योगी म्हणाले.
14.30 : त्रिपुरातल्या भाजपच्या विजयामागे मराठी नाव
सुनील देवधर हे मराठमोळं नाव महाराष्ट्रात फारसं कुणाला माहीत नाही. पण ईशान्य भारतातल्या त्रिपुरा राज्यात हे नाव वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर झळकतंय. कारण ते फक्त राज्य भाजपचे प्रभारीच नाहीयेत, तर डाव्यांच्या 25 वर्षांपासूनचा बालेकिल्ला सर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.... सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
14.15 : 'त्रिपुरातल्या यशाचं श्रेय नरेंद्र मोदींना'
भाजपचे सरचिटणीस आणि ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव यांनी त्रिपुराच्या निकालांविषयी बोलताना या यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
मतमोजणीचे कल स्पष्ट होत असताना ते म्हणाले, "अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. पण या ऐतिहासिक यशाचं श्रेय पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना जातं. ईशान्येकडच्या जनतेनं यांच्या विचारांना स्वीकारलं आहे. याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचंही हे फळ आहे. या यशात भाजप अध्यक्ष बिप्लव देव, सुनील देवधर आणि हेमंत बिस्वा सरमा यांचा मोठा वाटा आहे."
13.40 : मेघालयमध्ये काँग्रेसची आघाडी
- मेघालयमध्ये काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झाले असून 13 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
- नॅशनल पिपल्स पार्टीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
- युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 2 उमेदवार तसेच नॅशनल अवेकनिंग मुव्हमेंट आणि हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
13.10 : नागालँडचे निकाल
- नागालँडमध्ये नागा पिपल्स फ्रंटनं खातं उघडलं आहे. या पक्षाचा एक उमेदवार विजयी घोषित करण्यात आला आहे.
- 21 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
13.05 : मेघालय - काँग्रेसचे 4उमेदवार विजयी
- मेघालयमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
- नॅशनल पिपल्स पार्टीचे 3 आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 2 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.
- तसेच आतापर्यंत नॅशनल अवेकनिंग मुव्हमेंट आणि हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
- 2 अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
13.00 : त्रिपुरा निकाल
- पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा पक्षाचा एक उमेदवार विजयी घोषित करण्यात आला आहे. या पक्षाचे सात उमेदवार सध्या मतमोजणीत आघाडीवर आहेत.
- भाजप 32 जागांवर तर CPM 19 जागांवर आघाडीवर आहे.
12.35 : त्रिपुरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
12.30 : कोण आहेत सुनील देवधर
त्रिपुरातल्या भाजपच्या मुसंडीत सुनील देवधर या मराठी माणसानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं केलेली ही बातचीत -
12.25 : मेघालयमध्ये काँग्रेसनं खातं उघडलं
काँग्रेसचा एक उमेदवार विजयी. 20 जागांवर घेतली आघाडी.
याशिवाय नॅशनल अवेकनिंग मुव्हमेंटचाही एक उमेदवार विजयी झाला आहे.
मेघालयातील 59 मतदारसंघापैकी सहा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत.
12.15 : पाहा भाजपच्या त्रिपुरा मुसंडीचं रहस्य
ज्येष्ठ पत्रकार संदीप फुकन यांच्याशी बातचीत केली बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी.
12.00: मेघालय आणखी निकाल
मेघालयमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 2 उमेदवार विजयी झाले असून हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. याशिवाय एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
11.35 : मेघालयमध्ये खाते उघडले
मेघालयमध्ये हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला असून आणखी एका जागेवर पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे.
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीनेही खातं उघडलं असून पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर चार ठिकाणी आघाडीवर आहेत.
11.30 : कौल कोणाला?
- त्रिपुरा - भाजप तब्बल 29 जागांवर आघाडीवर असून CPM 17 जागांवर आघाडीवर आहे. पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा 8 जागांवर पुढे आहे.
- नागालँड - नागा पिपल्स फ्रंट 16 जागांवर आघाडीवर असून त्याखालोखाल आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी 10 जागांवर आघाडीवर आहे. याठिकाणी भाजप 6 जागांवर पुढे आहे.
- मेघालय - मेघालयमध्ये काँग्रेसने 21 जागांवर आघाडी घेतली असून नॅशनल पिपल्स पार्टी 14 जागांवर पुढे आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी आणि भाजप प्रत्येकी 5 जागांवर आघाडीवर आहे.
11.20 : सरकारचा कल स्पष्ट?
त्रिपुरात भाजपची आघाडी, नागालँडमध्ये अटीतटीचा लढत आणि मेघालयमध्ये काँग्रेसची आघाडी.
10.50 : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
10.10 : त्रिपुरातसत्ता स्थापनेचा दोघांचाही दावा
त्रिपुरा निवडणुकीच्या निकालांवर भाजप आणि CPM हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करत आहेत.
10.00 : प्राथमिक कल
भारत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,
- त्रिपुरामध्ये CPM 7 जागांवर तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. पिपल फ्रंट ऑफ त्रिपुरा एका जागेवर आघाडीवर आहे.
- नागालँडमध्ये नागा पिपल्स फ्रंट आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी प्रत्येकी 5 जागांवर पुढे आहे. या ठिकाणी भाजप 4 जागांवर पुढे आहे. तर नॅशनल पिपल्स पार्टी 2 जागांवर पुढे आहे.
- मेघालयमध्ये काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे. इथे नॅशनल पिपल्स पार्टी 5 जागांवर पुढे असून युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट 3 जागांवर तर भाजप 2 जागांवर पुढे आहे.
मतमोजणीस सुरुवात
इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली.
857 उमेदवार रिंगणात
त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले.
तीन्ही राज्यांमध्ये एकूण 857 उमेदवार रिंगणात आहेत.
नागालँडमध्ये 59 जगांवर झालेल्या निवडणुकीत 193 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
त्रिपुराच्या 60 सदस्यीय विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत 292 उमेदवार रिंगणात उभे आहेत, ज्यात 23 महिला उमेदवारांचा समावेश आहे. CPMचे उमेदवार रामेंद्र नारायण यांच्या निधनामुळे चारीलाम मतदारसंघाची निवडणूक आता 12 मार्चला होणार आहे.
मेघालय विधानसभेच्या 59 जागांवर 372 उमेदवार मैदानात आहेत.
लक्ष त्रिपुराकडे
या तीनही राज्यांमध्ये सर्वांचंच लक्ष त्रिपुराकडे लागलं आहे. या राज्यात गेल्या 25 वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे.
केरळशिवाय फक्त याच राज्यात डाव्यांचं सरकार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)