गृहपाठ 2019 साठी? ईशान्य भारतात भाजपने कसे पाय रोवले?

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

त्रिपुरामध्ये रविवारी मतदान झालं. आता 27 फेब्रुवारीला मेघालय आणि नागालॅंडमध्ये विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ईशान्य भारतातील संघटन बांधणीवरील हा दृष्टिक्षेप.

दिसताना असं दिसतं जणू काही लाट सुरू आहे. अशा प्रकारचं वातावरण आणि समर्थन भाजपसाठी आसाम सोडून ईशान्य भारतातल्या इतर राज्यांत पूर्वी कधीच दिसलं नव्हतं.

अर्थात हे पाठबळ अचानक निर्माण झालेलं नाही. जाणकारांच्या मते, गेली काही वर्षं भाजपने ईशान्य भारतात पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याचाच हा परिणाम आहे.

2016 मध्ये भाजपने आसाम विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातही सरकार बनवण्यात पक्षाला यश मिळालं.

त्यातून पक्षाचा आत्मविश्वास वाढलाच, शिवाय पक्षाची महत्त्वाकांक्षाही वाढल्या.

पण हे होत असतानाच भाजपवर इतर पक्षांत फूट पाडल्याचे आरोपही होत आहेत, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये ओढून घेतल्याची टीका भाजपवर होत आहे.

पण पक्षाचे महासचिव राम माधव म्हणतात राजकारणात असली जोडतोड चालतच असते.

मेघालयनंतर त्रिपुरात पक्षाच्या संघटनेच्या विस्ताराची जबाबदारी सुनील देवधर यांच्याकडे देण्यात आली आहे. देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.

त्यांचं असं मत आहे की इतर राज्यांतील काँग्रेस आणि त्रिपुरातील काँग्रेस अशी तुलना करणं चुकीचं आहे.

पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते झुमु सरकार यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात ईशान्य भारतात पूर्वी जी काँग्रेस होती, तीच आता भाजप झाली आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर आसाममधल्या हेमंत बिस्वा सरमा आणि इतर ही काही नेत्यांचं देता येईल, जे आता भाजपमध्ये सहभागी आले आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं मात्र मत वेगळं आहे. ते म्हणतात, काँग्रेसमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. विरोधी पक्षात फूट पाडल्यानंतर भाजप आता बूथ पातळीवर पक्षाचं संघटन बांधण्याचं काम सुरू आहे.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागो, 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र भाजपने नक्कीच गृहपाठ केला आहे.

तुम्ही हे बघीतलं का?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)