सोशल : ‘सिनेमागृहात राष्ट्रगीत लावल्याने देशभक्ती वाढेल की उलट परिणाम होईल?’

चित्रपटगृह

फोटो स्रोत, DOMINIQUE FAGET/GETTY IMAGES

आपली देशभक्ती सिद्ध करायला लोकांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभं राहण्याची गरज नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला. तसंच केंद्र सरकारला चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याच्या सक्तीबाबतही पुन्हा विचार करण्यास सांगितलं.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की "चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याबाबत तुम्हाला काय वाटतं?"

वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. त्या चर्चेचा हा गोषवारा.

मुळात चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची गरजच काय, असं नीरज निंदाळकर यांचं मत आहे.

नयन खिडबिडे म्हणतात, "राष्ट्रगीत चालू असताना उभं राहिलंच पाहिजे. पण प्रत्येक चित्रपटाच्या आधी ते वाजवण्याची गरज नाही."

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं, हे अंजली रामटेके यांना अतार्किक वाटतं. "हा प्रघात का सुरू केला आहे गरज नसताना? नवीन अनावश्यक नियम सुरू करायचे आणि नवीन समस्यांना जन्म घालायचा..."

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

संजय सदलगेकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे : "ज्या आदेशाचं पालन करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही, तो आदेश अस्तित्वात असला काय अन नसला काय? त्याने व्यवहारात काहीच फरक पडत नाही. शिवाय, जबरदस्ती करून देशभक्ती वाढेल की उलट परिणाम होईल?"

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

नंदिनी पाथारे-शेट्ये यांच्यामते सगळ्यांनी राष्ट्रगीताचा मनापासून आदर राखायला हवा. साधारण याच प्रकारचं मत स्वाती पांढरे यांनी व्यक्त केलं. त्या म्हणतात, "राष्ट्रगीतासाठी उभं राहायलाच हवं. नाहीतर वाजवू नका."

मनिषा राऊत म्हणतात की चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणं कृपा करून थांबवा. रविंद्र तिवारी म्हणतात की ते "चित्रपटगृहात फक्त सिनेमा पाहाण्यासाठी" जातात.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

शिरीष औतूरकर यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात की चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवायला हवंच.

काही वाचकांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजीही दाखवली आहे.

अमित जागटे म्हणतात की असं असेल तर मग कोर्टात सुद्धा न्यायाधीश आल्यावर सर्वांनी उभं रहाण्याची गरज नाही. श्रीनिवास वारुंजीकर म्हणतात की न्यायालयाचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी आता याचिका दाखल करायची गरज आहे.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

चित्रपटगृहात लोकं मनोरंजनासाठी जातात, तिथं राष्ट्रगीत वाजवणं हा राष्ट्रगीताचा अपमान आहे, असं शुभम गौराजे म्हणतात.

व्हीडिओ कॅप्शन, तेलंगणातल्या जम्मीकुंटा गावात रोज राष्ट्रगीत गायलं जातं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)