विनेश फोगाट 'आमदार' बनली, भाजप उमेदवाराला पराभूत केल्यानंतर काय म्हणाली?

विनेश फोगाट

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विनेश फोगाट

हा मजकूर पाहण्यासाठी जावा स्क्रिप्ट आणि स्थिर इंटरनेट असणं आवश्यक आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. दोन्ही राज्यांमधील निकाल जवळपास स्पष्टही झालेआहेत.

हरियाणात भाजपनं सत्ता राखल्याचं चित्र दिसतंय, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं सत्ता खेचून आणल्याचं दिसतंय.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटदेखील विजयी झाले आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, जम्मू-काश्मीरमधील मतमोजणीच्या ताज्या कलांनुसार नॅशनल कॉन्फरन्स 41 जागांवर, भाजप 29, काँग्रेस 6, पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 90 जागांवर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? पाहा चर्चा :

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

हरियाणामध्ये भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी, इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पक्ष यांच्यात लढत होती, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, 9 एसटी आणि 7 एससी प्रवर्गाच्या जागा आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून त्यांपैकी 73 खुल्या आणि 17 एससी प्रवर्गातील आहेत.

सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी दिलेल्या एका निर्णयामध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते.

विनेशची पहिली प्रतिक्रिया

प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून विजयी झालीय. तिने भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला आहे.

आता यापुढे खेळ आणि राजकारणातील नेमकं काय निवडणार, असा प्रश्न विनेशनला विचारलं असता, ती म्हणाली, "राजकारणात आले आहे तर आता पूर्णवेळ इकडेच लक्ष देणार आहे. लोकांनी एवढे प्रेम दिले आहे. त्यामुळे लोकांचे काम करावे लागणार."

विनेश पुढे म्हणाली की, "राजकारण आणि कुस्ती या दोन्ही गोष्टी मी करू शकते."

विनेश फोगाटचा संपूर्ण प्रवास तुम्हाला इथे वाचता येईल :विनेश फोगाट : वडिलांची हत्या, आईचा कॅन्सर, कुस्तीपटू ते आता आमदार, असा आहे प्रवास

केजरीवाल म्हणाले, 'अति आत्मविश्वास बाळगू नये, हाच या निकालतून धडा'

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि जम्मू-कश्मीरच्या निवडणुकांच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे.

केजरीवाल म्हणाले की, कधीही अति आत्मविश्वास बाळगू नये, हाच या निकालांमधून मिळालेला धडा आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

ते पुढे असंही म्हणाले की, "जेवढं मिळालं आहे, तेवढ्यात देशाची सेवा करा. कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायला नको. आजच्या निवडणुकीचा हाच धडा आहे. कधीही अति आत्मविश्वास मनात असू नये."

"प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक जागा अवघड असते. कष्ट करा. कोणत्याही प्रकारचे अंतर्गत वाद नसले पाहिजेत. सगळ्यांनी मेहनत करा," असंही ते पुढे म्हणाले.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

हरियाणा विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु असताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेचे आकडे जाहीर करत असताना निवडणूक आयोगाला उशीर होत असल्याचं जयराम रमेश म्हणाले आहेत.

जयराम रमेश यांची तक्रार

फोटो स्रोत, x/jairamramesh

जयराम रमेश यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर)वर पोस्ट करून लिहिलं की, "निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल अपलोड व्हायला उशीर होतो आहे. लोकसभा निवडणुकीत देखील असाच प्रकार घडला होता. चुकीचे कल घोषित करून भाजप निवडणूक आयोगावर दबाव आणू पाहतंय का? निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावं."

जयराम रमेश

फोटो स्रोत, Getty Images

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, "आम्हाला आशा आहे की निवडणूक आयोग आमच्या तक्रारीला प्रतिसाद देईल. आत्तापर्यंत मतमोजणीच्या 10-12 फेऱ्या झाल्या आहेत, मात्र केवळ तीन-चार फेऱ्यांचे निकाल अपडेट करण्यात आले आहेत."

निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात जयराम रमेश यांनी नऊ ते अकरा या वेळेत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर निकाल अपडेट करण्यास विलंब होत असल्याचे म्हटले आहे.

यामुळे चुकीची माहिती प्रसारित करण्याची संधी मिळेल आणि संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया खराब होईल. ही समाजकंटकांकडून मतमोजणी प्रभावित करण्यासाठी या चुकीच्या माहितीच्या प्रसाराचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती आम्हाला वाटते.

सुरुवातीच्या पिछाडीनंतर विनेशचं कमबॅक, 6 हजार मतांनी आघाडीवर

प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून 6 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहे. सुरुवातीच्या 7 फेऱ्यांपर्यंत या जागेवरून भाजपचे योगेश कुमार आघाडीवर होते.

जुलाना मतदारसंघातून 65080मते मिळवून विनेश विजयी झाली, तिच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या योगेश कुमार यांना 59065 मतं मिळाली.

विनेश फोगट यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत कुस्तीपटू बजरंग पुनियानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विनेश फोगट

फोटो स्रोत, ANI

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांनी बीबीसी हिंदीला सांगितले होते, "काँग्रेस पक्षाने आम्हाला वाईट काळात साथ दिली होती. दीपेंद्रभाई साहेब प्रत्येक पावलावर त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जेव्हा पोलिस आमच्याशी झटापट करत होते. दीपेंद्रभाई रात्री एकटेच घरी आले होते. त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं."

ज्या दोन जागांवर ओमर अब्दुल्ला लढले तिथे काय परिस्थिती आहे?

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे बडगाम आणि गांदरबल या दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, ओमर अब्दुल्ला हे बडगाममध्ये 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि पीडीपीचे सय्यद मुतन्झीर मोहम्मद 8700 हून अधिक मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Getty Images

2014 मध्ये उमर यांनी बडगाम मतदारसंघाला लागून असलेल्या बीरवाह मतदारसंघातून निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला होता. ओमर यांचे आजोबा शेख अब्दुल्ला आणि वडील फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली गांदरबल मतदारसंघाचे नेतृत्व आहे.

गांदरबलमध्ये ओमर अब्दुल्ला 10,700 मतांनी आघाडीवर आहेत. पीडीपीचे बशीर अहम पीर ६२०० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा काय म्हणाले?

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप काँग्रेसपेक्षा पुढे आहे.

या सुरुवातीच्या मतमोजणीनंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी दावा केला आहे की त्यांचा पक्ष राज्यात सरकार स्थापन करेल.

सध्या भाजप 46 जागांवर तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.

भूपिंदर सिंग हुड्डा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भूपिंदर सिंग हुड्डा

श्रीनगरमधून बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव काय म्हणाले?

बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव म्हणाले की, "जम्मू काश्मीरच्या मतमोजणीत आलेल्या सुरुवातीच्या कलांप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स 30 जागांवर आघाडीवर दिसत आहे. भारतीय जनता पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 6 आणि पीडीपी सध्या 2 जागांवर आघाडीवर आहे. ही निवडणूक दहा वर्षानंतर होत आहे. जम्मू काश्मीरमधील शेवटची विधानसभेची निवडणूक 2014मध्ये झाली होती."

राघवेंद्र राव पुढे म्हणाले की, "शेवटच्या निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं. मात्र 2018मध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळलं. 2019 साली जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आलं. 2020 मध्ये मनोज सिन्हा यांना लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं. आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वात प्रशासन काम करत आलं आहे. यामुळेच ही निवडणूक महत्त्वाची आहे."

बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव
फोटो कॅप्शन, बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव

राघवेंद्र राव म्हणाले की, "नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली आहे. तर पीडीपी आणि भाजपने स्वतंत्रपणे लढवली आहे. जम्मू मध्ये 43जागा आहेत तर काश्मीर खोऱ्यात 47 जागा आहेत. भूतकाळात भाजपने जम्मू मध्ये चांगली कामगिरी केली होती, यंदा मात्र काश्मीर खोऱ्यात भाजपला काही जागा मिळू शकण्याची अंदाज वर्तवला जातो आहे. प्रादेशिक पक्षांचं या निवडणुकीत प्राबल्य असेल असं अनेकांचं म्हणणं आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे."

हरियाणाचे भाजप नेते अनिल विज यांनी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर काय म्हटले?

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, हरियाणातील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले आणि राज्यातील पक्षाचा मोठा चेहरा समजले जाणारे अनिल विज यांनी आपण मुख्यमंत्री बनण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

अनिल विज हे हरियाणातील अंबाला कँट मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. राज्यात विधानसभेच्या 90 जागा असून गेल्या 10 वर्षांपासून येथे भाजपचे सरकार आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

कुस्तीपटूंच्या रोषाचा परिणाम यावेळी निवडणुकीत दिसून येईल का, असा प्रश्न अनिल विज यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, काही भागात त्याचा परिणाम होऊ शकतो पण संपूर्ण राज्यात नाही.

मतमोजणीवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल विज म्हणाले की, हायकमांडची इच्छा असेल तर आम्ही नक्कीच करू.

निवडणूक निकालापूर्वी काय म्हणाले हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी?

हरियाणा निवडणुकीच्या निकालापूर्वी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, "येथे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल."

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये एक निश्चित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "भाजपने हरियाणात पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे. आज हरियाणातील तरुणांना रोजगार मिळत आहे. चांगले शिक्षण मिळत आहे. यावेळीही जनता भाजपच्या चांगल्या कामाचा विचार करून त्यांना कौल देईल, असा आम्हाला विश्वास आहे."

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी कुरुक्षेत्र येथील लाडवा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

नायब सिंग सैनी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नायब सिंग सैनी

हरियाणातील सुरुवातीचे कल, भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरी जमले समर्थक

अभिनव गोयल,, बीबीसी प्रतिनिधी

हरियाणातील रोहतक येथील भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरी त्यांचे समर्थक येऊ लागले आहेत. घराबाहेर सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर आहेत, ज्यामध्ये दीपेंद्र हुडा आणि त्यांचे वडील भूपेंद्र देखील ठळकपणे दिसत आहेत.

यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार येणार असून पक्षाला 60 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा लोक करत आहेत.

त्याचवेळी दीपेंद्र हुड्डा यांना आपले नवे मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील 'या' नेत्यांचं काय होणार?

हरियाणा काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. यामध्ये भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश आहे.

भूपेंद्र सिंग हुडा

भूपेंद्र सिंह हुड्डा 80 च्या दशकापासून सक्रिय राजकारण करत आहेत. 2005 ते 2014 या काळात ते हरियाणाचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत.

कुमारी शैलजा

कुमारी शैलजा या हरियाणातील सिरसा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. राज्याच्या राजकारणातील त्या एक प्रमुख दलित चेहरा आहेत. त्या माजी केंद्रीय मंत्रीही होत्या.

रणदीप सुरजेवाला

रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसने यावेळी त्यांचे पुत्र आदित्य सुरजेवाला यांना कैथलमधून तिकीट दिले आहे.

भूपेंद्र सिंग हुडा

फोटो स्रोत, x/Bhupinder S Hooda

दुसरीकडे नायबसिंग सैनी आणि अनिल विज यांची भाजपमध्ये जोरदार चर्चा केली जात होती.

नायबसिंग सैनी

नायबसिंग सैनी हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. ते कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर ते मुख्यमंत्री झाले.

अनिल विज

भाजपने अंबाला कँटमधून अनिल विज यांना उमेदवारी दिली होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे.

ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर इल्तिजा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, रविंदर रैना आणि इंजिनियर राशीद यांची नावं चर्चेत होती.

इल्तिजा मुफ्ती

इल्तिजा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या आहेत. त्यांनी पहिल्यांदाच श्रीगुफवारा-बिजबेहारा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

ओमर अब्दुल्ला

ओमर अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत. या विधानसभा निवडणुकीत ते गंदरबल आणि बडगाम या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत.

रविंदर रैना

जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रैना दीर्घकाळापासून संघाशी निगडीत आहे.

रशीद अहमद शेख

दिल्लीच्या तिहार तुरुंगातून नुकतेच जामिनावर सुटलेले खासदार रशीद अहमद शेख हे इंजिनियर रशीद म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अवामी इत्तिहाद पक्षाचे अध्यक्ष आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.