You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ममता बॅनर्जी यांना 'गंभीर दुखापत,' तृणमूल काँग्रेसने पोस्ट केले फोटो
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर गंभीर जखम झाल्याचे तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे.
गुरुवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या पक्षाने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन ममता बॅनर्जी यांचे तीन फोटो टाकले होते. त्यात त्यांच्या कपाळावर जखम झाल्याचे दिसत आहे.
ममता बॅनर्जी यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ममता बॅनर्जी आता रुग्णालयाबाहेर पडल्या आहेत. त्यानंतर आता त्यांना एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले.
त्यांना जखम कशी झाली याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आली नाही.
पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या समवेत अनेक नेते आणि मंत्रीमंडळातले सदस्य देखील रुग्णालयात आले होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर टाकून ममता बॅनर्जी लवकर बऱ्या व्हाव्यात अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंंत्री एम. के. स्टालिन यांनी देखील ट्वीट करत म्हटले की ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीमुळे मला धक्का बसला आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी देखील ट्वीट केले आहे. ममता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी मी प्रार्थना करतो असे मोदी म्हणाले आहेत.