तब्बल 74 दिवस 'तो' समुद्र तळाशी राहिला, कारण...

फोटो स्रोत, Reuters
- Author, माल्डालीन हाल्पर्ट
- Role, बीबीसी न्यूज
एका अमेरिकन संशोधकाने पाण्याखाली जास्तीत जास्त काळ राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
प्राध्यापक जोसेफ डिटोरी असं या संशोधकाचं असून तो 30 फूट पाण्याखाली तब्बल 74 दिवस होता. फ्लोरिडातील ज्युली अंडरसी लॉज याठिकाणी त्याने ही करामत करून दाखवली.
जोसेफ 74 दिवस तिथे राहिले असले तरी एकूण 100 दिवसांपर्यंत तिथे राहण्याच्या विचारात ते आहेत.
या लॉजमध्ये पाणबुडीसारखी पाण्याचा दबाव नियंत्रित करण्याची यंत्रणा नाही, हे विशेष.
याविषयी बोलताना प्रा. जोसेफ म्हणतात, "पुढच्या पीढीला प्रेरणा देण्याचा माझा उद्देश आहे. समुद्री जीवनावर संशोधन करत असलेल्या शास्त्रज्ञांच्या मला मुलाखती घ्यायच्या आहेत. वाईट हवामानाचा मानवी शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, हे मला जाणून घ्यायचं आहे.
2014 मध्ये दोन प्राध्यापकांनी पाण्याखाली जास्तीत जास्त काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.
त्यानंतर आता प्रा. जोसेफ गेल्या 1 मार्चपासून हा विक्रम आपल्या नावे करण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी ज्युली अंडरसी लॉजमध्ये ते ठाण मांडून बसले होते.
20,000 लीग्ज अंडर द सी हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्युल्स व्हर्ने यांच्या नावाने हे हॉटेल उभारण्यात आलं आहे.

प्रा. जोसेफ हे मानवी शरीरावर एक संशोधन करत आहेत. यामध्ये मानवी शरीर उच्च दबावाच्या वातावरणात कशा प्रकारे प्रतिक्रिया करतं, याचा अभ्यास त्यांना करायचा आहे.
प्रोजेक्ट नेपच्यून 100 असं या प्रयोगाचं नाव आहे.
55 वर्षीय प्रा. जोसेफ यांच्या तब्येतीचं निरीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची फौज तैनात आहे. तसंच इतका काळ एकटे राहिल्याने प्रा जोसेफ यांच्यावर होणाऱ्या मानसशास्त्रीय परिणामांचाही ते अभ्यास करत आहेत.
प्रा. जोसेफ यांनी अमेरिकेच्या लष्करात 28 वर्षं नोकरी केली. त्यानंतर आता ते युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा येथील बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
द युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाच्या माहितीनुसार, प्रा. जोसेफ हे सध्या पाण्याखाली राहण्याचा प्रयोग करत असून तिथूनच ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवत आहेत.
पाण्याखाली राहत असलेले प्रा. जोसेफ हे रोज सकाळी पाच वाजता उठतात. सकाळी व्यायामाने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ उदा. अंडे आणि मासे हे त्यांचं जेवण असतं. पाण्याखाली त्यांना जेवण बनवता यावं यासाठी तिथे एक मायक्रोवेव्ह ठे वण्यात आलेलं आहे.
प्रा. जोसेफ म्हणतात, मला लवकरच जमिनीवर येऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घ्यायचा आहे. मला पुन्हा एकदा आकाशाकडे खुल्या डोळ्यांनी पाहायचं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








