ऑस्टिओपोरॉसिस : हाडांशी संबंधित हा आजार काय आहे? तो टाळण्यासाठी काय करावं?

ऑस्टिओपोरॉसिस फक्त म्हाताऱ्या लोकांना होतो असा एक समज आहे. मात्र जीवनशैली आणि इतर खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तो होण्याची शक्यता आहे.
पण मुळात ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे काय? त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज का आहे?
ऑस्टिओपोरॉसिस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडे त्यांची ताकद गमावतात आणि सामान्यत: किरकोळ झटका किंवा पडल्यानंतर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.
हाडांची ताकद कमी झाल्यामुळे होणार्या फ्रॅक्चरचे वर्णन 'नाजूक फ्रॅक्चर' असं केलं जातं आणि यापैकी बरेचसे फ्रॅक्चर ऑस्टिओपोरोसिसमुळे होतात. दोन महिलांपैकी एका महिलेला आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पाच पुरुषांपैकी एकाला फ्रॅक्चरचा अनुभव येतो, हाडांची ताकद कमी झाल्यामुळे ही अवस्था होते. शरीराच्या विविध भागांमध्ये छोटे फ्रॅक्चर होऊ शकतात, परंतु मनगट, नितंब आणि पाठीचा कणा या ठिकाणी सर्वांत जास्त फ्रॅक्चर होतात.
35 वर्षांच्या वयानंतर हाडांच्या घनतेचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे हाडांच्या ऊतीचं प्रमाणही कमी होत जातं. याला 'बोन लॉस' असं संबोधलं जातं. याचा अर्थ तुमची हाडं बाहेरून वेगळी दिसतात असं नाही, तर मात्र आतलं आवरण बारीक होत जातं आणि तुटतं, कालांतराने ते छिद्र मोठं होत जातं. म्हणून या अवस्थेला ऑस्टिओपोरॉसिस असं म्हणतात.
'पोकळ हाड' असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो.
जसं जसं वय वाढत जातं तसं हाडाचा दर्जा बदलत जातो. त्यामुळे म्हातारवयात हाडं नाजूक होतात आणि लवकर फ्रॅक्चर होतात. हाडं तुटण्यासाठी किंवा पोकळ होण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. त्यापैकी काही गोष्टींवर नजर टाकूया.
जनुकं- हाडाचं आरोग्य हे जनुकीय असतं. त्यामुळे हाडांचं आरोग्य बऱ्यापैकी आपल्या पालकांवर अवलंबून असतं.
वय- आपण जसे मोठे होत जातो तसंतसं हाडं ठिसूळ होत जातात आणि ती तुटण्याची शक्यता जास्त असते.
लिंग- बायकांना या रोगाचा धोका जास्त प्रमाणात असतो. कारण त्यांची हाडं छोटी असतात. मेनॉपॉझच्यावेळी हाडांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं.
शरीराचं कमी वजन- जर तुमचा BMI 19 kg/m2 असेल तर फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपॉरोसिसचा धोका असतो.
धूम्रपान- तुम्ही आता धूम्रपान करत असाल तुम्हाला होण्याचा धोका जास्त आहे.
मद्यपान- अतिरिक्त दारू प्यायल्याने फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त आहे.
काही वैद्यकीय गोष्टी- संधीवात, बायकांमध्ये इस्ट्रोजेनचं प्रमाण असणं, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असणं, थायरॉईड, स्ट्रोक असे आजार असतील तर ऑस्टिओपॉरोसिसचा धोका जास्त असतो.
काही औषधांमुळेसुद्धा ही स्थिती निर्माण होते.
हाडं तयार होण्यासाठी महत्त्वाची वेळ कोणती?

फोटो स्रोत, Getty Images
हाडांची शक्ती वाढण्याची खरी वेळ ही बालपण, पौगंडावस्था आणि तारुण्य ही आहे. त्यावेळी शरीराची वाढ होत असते. त्यावेळी हाडांवर काम केल्यास शरीराचा आकार योग्य होतो आणि वय वाढल्यानंतर हाडाचं नुकसान होत नाही.
वजन उचलण्याचा व्यायाम करून लहान मुलं हाडांची क्षमता वाढवू शकतात. तसंच संतुलित, कॅल्शियमयुक्त आहार घेतला तर हाडांची क्षमता वाढते.
हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम महत्त्वाचं आहे मात्र त्याचबरोबर संतुलित आहार ज्यात व्हिटामिन्स, मिनरल्स आणि इतर अन्नघटकांचा समावेश असलेला आहार घ्यावा. फळं, भाज्या, कार्बोहायड्रेट्स तसंच प्रथिनांचा समावेश असलेला आहार घ्यावा. या आहारघटकांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या
1. कॅल्शियम
मजबूत दात आणि हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे त्यामुळे दातांना त्यांना ताकद आणि कडकपणा येतो.
बहुतांश लोकांना अतिरिक्त पूरक आहाराची गरज न पडता, निरोगी खाण्याद्वारे पुरेसे कॅल्शियम मिळवता आलं पाहिजे.
2. व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं आणि स्नायू मजबूत ठेवतं, ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये पडणं टाळण्यास मदत होते. सूर्यप्रकाशाद्वारे, विशिष्ट खाद्यपदार्थ आणि पेयं किंवा पूरक आहारातून तुम्हाला व्हिटामिन डी मिळू शकतं सूर्यप्रकाशाशिवाय 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला दररोज 15 मायक्रोग्रॅम (15 μg किंवा 600IU) व्हिटॅमिन डी मिळायला हवं. (एक वर्षाखालील सर्व लहान मुलांसाठी 8.5 - 10 मायक्रोग्रॅम) .
तुम्हाला पुरेसं व्हिटामिन डी मिळत नसल्यास किंवा तुम्ही पूरक आहार घेण्याचा विचार करत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
3. दारू
जास्त प्रमाणात मद्यपान ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरसाठी महत्त्वाचा घटक असल्याचे दिसते. जर तुम्ही प्रौढ असाल, तर अल्कोहोलचा किरकोळ नशा देखील अपघातांना आमंत्रण देऊ शकतो. ज्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं
4. व्यायाम
हाडांच्या आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे, कारण तो तुमचा सांगाडा मजबूत होण्यास मदत करतो. वजन उचलण्याचा व्यायाम विशेष उपयुक्त आहे आणि जॉगिंग, एरोबिक्स, टेनिस, नृत्य आणि वेगवान चालणे या सक्रिय राहण्याच्या व्यायाय प्रकारांचा समावेश होतो.
पोहणे, बागकाम, गोल्फ यांसारख्या व्यायामाबरोबरच वयानुसार सक्रिय राहिल्यास स्नायूंची ताकद, संतुलन आणि समन्वय सुधारतं आणि दुखापतीचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
ज्या लोकांना ऑस्टिओपोरॉसिसचे निदान झाले आहे त्यांनी उच्च क्षमतेचा व्यायाम करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. याबाबतीत डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या.
5. धूम्रपान

फोटो स्रोत, Getty Images
धूम्रपानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. धूम्रपानामुळे हाडं तयार करणार्या पेशी, ऑस्टिओब्लास्ट्सचे काम मंद होत असल्याचं दिसून आले आहे.
धूम्रपान केल्याने स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती लवकर होऊ शकते आणि नंतरच्या आयुष्यात तुमचा कमरेचं हाड तुटण्याचा धोका वाढू शकतो. जे धूम्रपान सोडतात त्यांच्यामध्ये फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.
6. शरीराचे वजन

निरोगी शरीराचे वजन संतुलित राखण्याचं ध्येय ठेवा, कारण कमी वजन किंवा जास्त वजनामुळे ऑस्टिओपोरॉसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो.
तुम्हाला तुमच्या वजनाबद्दल काळजी वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला.रजोनिवृत्तीनंतरही, निरोगी वजन असलेल्या स्त्रियांमध्ये त्वचेखालील आवरणांमध्ये हाडांचे संरक्षण करणारे इस्ट्रोजेन कमी प्रमाणात तयार होऊ शकतं.
जास्त वजन असणे हाडांसाठी उपयुक्त नाही - यामुळे तुमचा फ्रॅक्चरचा धोका वाढतोच तसंच इतर अनेक वैद्यकीय आजार होण्याचा धोका वाढतो.
हाडांची घनता स्कॅन (DXA) म्हणजे काय?
हाडांची घनता स्कॅन, डेन्सिटोमेट्री एक्स-रे (DXA) तुमच्या हाडांत किती 'बोन मिनरल' आहे हे मोजते - संशोधनात असे दिसून आले आहे की तुमची हाडांची घनता जितकी कमी असेल तितका तुमचा फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो.
हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक बाबी
व्यायाम आणि सक्रिय राहणं, पुरेसं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सह निरोगी, संतुलित आहार घेणं, व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं, धूम्रपान थांबवणं आणि जास्त मद्यपान टाळणं यासह वर वर्णन केलेल्या जीवनशैलीत बदल केले तर ऑस्टिओपोरॉसिसचा धोका कमी होतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








