करण थापर यांच्याशी संबंधित फेक न्यूज प्रकरणात बीबीसीची प्रतिक्रिया

करण थापर

“हा बीबीसीचा मजकूर नाही, याची आम्ही खात्री करतो. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या बातम्या विश्वसनीय स्त्रोताकडून मिळत असल्याची खात्री करण्यासाठी लिंक्स आणि यूआरएल तपासून घ्याव्यात.”

बीबीसीच्या प्रवक्त्याने एका वेब पेजबाबत हे वक्तव्य केलंय.

या वेबपेजवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना कथित प्रकरणी एका पैसे कमावण्याच्या योजनेचा प्रचार करताना दाखवण्यात आलंय.

करण थापर यांनी या वेबपेजबाबत यापूर्वीच प्रतिक्रिया दिली असून पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

करण थापर यांनी याला 'खोटं आणि बनावट' म्हणत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे, जेणेकरून "ही बदनामीकारक आणि द्वेषयुक्त पोस्ट वेब पेजवरून काढून टाकली जाईल."

यासोबतच करण थापर यांनी हेही स्पष्ट केलंय की, वेब पेजवर नमूद केल्याप्रमाणे मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही.

करण थापर

त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, "माझ्या मित्रांकडून आणि हितचिंतकांकडून मला अशी माहिती मिळाली आहे की, बीबीसी इंडिया आणि सन टीव्हीचे नाव वापरून बनावट वेब पेज आणि फेसबुक पोस्टवर माझ्याबद्दल द्वेषयुक्त आणि बदनामीकारक मजकूर शेअर केला जातोय."

ते म्हणाले, " octequiti.com वर दाखवलेल्या या वेब पेजवर माझ्या आणि सन टीव्हीच्या पूजिता देवराजू यांच्यातील कथित संभाषणाचे वर्णन करत पैसे कमावणाऱ्या एका फसवणूक करणाऱ्या वेबसाइटला 'वन क्लिक बेट' या शीर्षकासह प्रमोट केलं गेलंय.”

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

थापर यांनीही "सोशल मीडियावर शेअर केला जाणारा अपमानास्पद आणि वाईट भावनेने मजकूर खोटा आणि बनावट आहे," असं विधान केलंय.

करण थापर यांनीही आपल्या निवेदनात म्हटलंय की, एक जबाबदार नागरिक या नात्याने माझ्या या निवेदनात नेमकी वस्तुस्थिती सर्वसामान्यांसमोर मांडणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून, सर्वप्रथम मी या बदनामीकारक मजकुराचं खंडन करतो जो खोटा आणि बनावट आहे. सामान्य नागरिकांना विनंती आहे की त्यांनी यावर विश्वास ठेवू नये आणि यासंबंधी आणखी कोणतीही पावलं उचलू नयेत.”

करण थापर म्हणाले, "मी या मजकुराबद्दल फेसबुककडे आधीच तक्रार केली आहे. आणि त्याबद्दल बीबीसी इंडिया आणि सन टीव्हीला देखील कळवलंय आणि सदर मजकूर त्वरित काढून टाकण्यासाठी योग्य कारवाई करण्याची विनंतीसुद्धा केली आहे."

त्यांनी सामान्य नागरिकांना विनंती केलेय की त्यांच्या (करण थापर) नावाने सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कोणत्याही मजकुरावर कार्यवाही करण्याआधी मजकुराची सत्यता जरूर पडताळून पाहावी किंवा स्वत:च्या जोखमीवर पुढील पावलं उचलावीत.

सध्या ही वेबसाइट ब्लॉक करण्यात आली आहे..

करण थापर 'द वायर’साठी एका कार्यक्रमाचं निवेदन करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)