बीबीसी व्हॉट्सअॅप चॅनेल आणि कम्युनिटीज गोपनीयता सूचना

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

आमच्यासाठी तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ बीबीसी तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा संरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही हा वैयक्तिक डेटा कसा आणि का वापरत आहोत याची जाणीव होण्यासाठी आपण ही सूचना वाचणे महत्त्वाचे आहे.

ही गोपनीयता सूचना विदा संरक्षण कायद्यानुसार (Data Protection Law) असून तुमच्याशी संबंधित विदा किंवा डेटा तुम्ही आमच्या बरोबर असताना आणि नंतरही आम्ही कसा गोळा करतो आणि कसा वापरतो याबद्दल आहे.

बीबीसी कोणता वैयक्तिक डेटा संकलित करेल आणि आम्ही त्याचा कसा वापर करू?

आमच्या चॅनेल आणि कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ते फॉलो करण्याचा भाग म्हणून तुम्ही मान्यता दिलेली तुमची वैयक्तिक माहिती BBC संकलित करेल आणि त्यावर प्रक्रिया करेल.

या माहितीमध्ये खाली दिलेल्या यादीतील काही किंवा सर्व डेटाचा समावेश असू शकतो.

पर्सनल डेटा

तुमची वैयक्तिक माहिती संकलित केली जाऊ शकते.

उदाहरणार्थ-

  • तुमचे व्हॉट्सअॅप प्रोफाइलवरील नाव किंवा हँडल
  • तुमचा संपर्क क्रमांक, जसा की मोबाईल नंबर
  • डिस्प्ले पिक्चर्स

तुमच्या प्रायव्हसी सेटिंग्ज अनुसार आणि तुमच्या डिस्प्ले पिक्चरच्या स्वरूपानुसार शक्यता आहे की, काही संवेदनशील माहिती जी कधी स्पेशल कॅटेगरी डेटा म्हणून ओळखली जाते आणि जी उघड करण्यास तुम्ही मान्यता दिलेली असते, अशी माहिती बीबीसी गोळा करू शकते आणि त्यावर प्रक्रिया करू शकते. उदाहरणार्थ:

  • तुमची जात, धर्म किंवा वांशिकता
  • तुमच्या आरोग्याविषयी माहिती
  • तुमची धार्मिक श्रद्धा किंवा वैचारिक बैठक
  • तुमची लैंगिकता
  • तुमचे राजकीय विचार
  • Whatsapp डिस्प्ले पिक्चरचे सेटिंग प्रायव्हेट करणे

कृपया लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या WhatsApp चे डिस्प्ले पिक्चर पाहण्याची परवानगी सर्वांना दिल्यास, BBC देखील ही माहिती पाहू शकेल.

तुम्ही शक्यतो WhatsApp सेटिंग्जमध्ये बदल करून काँटॅक्ट्स ओन्ली म्हणजे केवळ संपर्कातील लोकांपुरतीच मर्यादित ठेवली पाहिजेत म्हणजे त्यातील कमीत कमी वैयक्तित माहिती आमच्यापर्यंत शेअर होईल.

डेटावर कोणाचे नियंत्रण आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तुमचा जो डेटा बीबीसीच्या यंत्रणेत आणि डिव्हायसेसमध्ये स्टोअर झालेला आहे अशा तुम्ही पुरवलेल्या आणि आमच्यापर्यंत पोहोचलेल्या कुठल्याही वैयक्तिक माहितीचे बीबीसी हे स्वायत्त डेटा कंट्रोलर आहेत.

Whatsapp द्वारे तुम्ही पाठवलेल्या माहितीसाठी त्यांचे अॅप हे एक स्वतंत्र डेटा कंट्रोलर आहे. कृपया हे लक्षात घ्या की, तुमच्यासाठी अशा वेळी व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी पॉलिसी आणि त्यांच्या नियम व अटीदेखील WhatsApp’s Privacy Policy and Terms of Service लागू आहेत.

व्हॉट्सअॅप तुमचा डेटा त्यांच्या इतर Meta कंपन्यांमध्ये शेअर करू शकते.

प्रत्येक नियंत्रक तुमची वैयक्तिक माहिती कशासाठी वापरली जाते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी कशी प्रक्रिया केली जाते यावर स्वतंत्रपणे निर्णय घेतो आणि ते डेटा संरक्षण कायद्याअनुसार जाहीरही केलं जातं. याविषयी आणखी शंका टाळण्यासाठी, BBC WhatsApp चॅनेलमध्ये सामील होणाऱ्या आणि फॉलो करत असलेल्यांना या प्रायव्हसी नोटिसमध्ये नमूद केलेल्या उद्देशांसाठी तुमची वैयक्तिक माहिती BBC द्वारे गोळा केली जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल.

डेटा संरक्षण कायद्याचे पालन करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहणे ही प्रत्येक नियंत्रकाची जबाबदारी आहे.

आपल्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी कायदेशीर आधार

तुमच्याबद्दलचा वैयक्तिक डेटा वापरण्यासाठी तुमच्या संमतीवर आम्ही अवलंबून आहोत. कारण तुम्ही आमच्या WhatsApp चॅनेल ब्रॉडकास्टसाठी तुमच्या मर्जीने ही निवड केली आहे. जर तुम्हाला हे ब्रॉडकास्ट मिळणे थांबवायचे असेल तर तुम्ही चॅनलमधून कुठल्याही वेळी बाहेर पडू शकता आणि कधीही तुमची संमती मागे घेऊ शकता.

आपली माहिती शेअर करताना...

बीबीसी तुमची वैयक्तिक माहिती कुठल्याही थर्ड पाटीला तुमच्या संमतीशिवाय शेअर करणार नाही.

तुमची माहिती शाबूत ठेवणे

या प्रायव्हसी नोटीसमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी आवश्यकता असेल तेवढ्या काळापुरती बीबीसी तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करेल.

तुमचे हक्क आणि अधिक माहिती

यूके डेटा संरक्षण कायद्यानुसार तुम्हाला अधिकार आहेत. जोपर्यंत आम्ही हा डेटा आमच्यापाशी ठेवतो तोपर्यंत तुम्ही बीबीसीने तुमच्याबद्दल साठवलेल्या डेटाच्या प्रतीची विनंती आमच्याकडे करू शकता, ज्यामध्ये तुमच्या बीबीसी अकाउंट डेटा आणि वर दिलेला इतर डेटा समाविष्ट आहे.

तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधू शकता [email protected]. तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा तुम्हाला तुमच्या अधिकारांबद्दल अधिक तपशील जाणून घ्यायचे असल्यास, कृपया BBC च्या प्रायव्हसी अँड कुकीज पॉलिसी पेजला http://www.bbc.co.uk/privacy येथे भेट द्या.

बीबीसीने तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळली आहे याबद्दल तुम्हाला चिंता असल्यास, तुम्ही यूकेमधील पर्यवेक्षी प्राधिकरण supervisory authority माहिती आयुक्त कार्यालय (ICO) https://ico.org.uk/ कडे तुमची शंका मांडू शकता.

गोपनीयता सूचनेबाबत अपडेट

आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कसा वापरतो यामध्ये महत्त्वापूर्ण बदल झाल्यास आम्ही गोपनीयतेच्या सूचना सुधारित स्वरूपात प्रसिद्ध करू.