व्हॅजिनिस्मसः जेव्हा तुमचं शरीरच शरीरसंबंध ठेवू देत नाही...

फोटो स्रोत, THE OTHER RICHARD
- Author, नेस्टा मॅकग्रेगोर
- Role, न्यूजबिट रिपोर्टर
"तुमच्या मनात असो वा नसो तुमच्या शरीरावर तुमचे नेहमीच नियंत्रण असेल असं नाही."
इस्ले लिन यांनी आपल्या पहिल्या शरीरसुखाच्या अनुभवाबद्दल सांगताना हे वरचं वाक्य वापरलं होतं. हा अनुभव घेतल्यावर हे (सेक्सचा अनुभव) आपल्यासाठी कधीच योग्य नाही असं त्याचं मत झालं.
"मला ते अत्यंत दुःखदायक वाटलं. मी अगदी मोडून पडलेय असं मला वाटलं. माझा काहीही दोष नसताना मीच दोषी आहे असं मला वाटत होतं."
सेक्सच्या पहिल्या अनुभवाच्यावेळेस आपल्यापैकी अनेकांना अवघडल्यासारखं किंवा सेक्सचं अज्ञान असल्यासारखा अनुभव येऊ शकतो. परंतु इस्ले यांचा अनुभव वेगळा होता. त्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

फोटो स्रोत, THE OTHER RICHARD
इस्ली या आता 30 वर्षांच्या आहेत आणि त्यांना व्हॅजिनिस्मस हा आजार आहे. आपल्या अनुभवावर त्यांनी 'स्कीन अ कॅट' हे नाटक लिहिले आहे.
योनीमध्ये काहीही आत जाण्याबद्दल म्हणजे पेनिट्रेशनबद्दल भीती वाटून शरीर ज्याप्रकारे आपोआप प्रतिसाद देतं त्याला 'व्हॅजिनिस्मस' असं म्हणतात, असं युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या आरोग्यसेवेने म्हटलं आहे.
यामध्ये योनीचे स्नायू अत्यंत जास्तप्रमाणात आकुंचित होतात, त्यावर त्या स्त्रीचे नियंत्रण नसते.
काही महिलांना रक्तस्राव शोषून घेण्यासाठी योनीत सरकवली जाणारी गुंडाळी (टॅम्पॉन) असो वा सेक्स करताना योनीमध्ये अत्यंत जोरात वेदना होतात आणि जळजळ, दाह होतो.

फोटो स्रोत, Getty Images
इस्ले सांगतात, “मी 10 वर्षांची असताना पहिल्यांदा टॅम्पॉन योनीमार्गात सरकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रकार अत्यंत वेदनादायक होता. तेथे छिद्रच नाही असं वाटत होतं. तिथं एखादी अडथळ्यासारखी भिंत आहे असं मला वाटत होतं.”
“पहिल्या बॉयफ्रेंडनंतर माझी ही स्थिती खरंच काहीतरी गंभीर आहे असं मला समजलं होतं.”
या स्थितीमुळे इस्ले यांच्या नातेसंबंधांवर मोठा भावनांचा भारही पडला होता.
"यामुळे आपल्या जोडीदाराला मी त्यांच्याकडे लैंगिकदृष्ट्या आकृष्ट झालेले नाही किंवा माझं त्यांच्यावर प्रेम नाही असं वाटेल या भावनेमुळे मी भयभीत व्हायचे," असं त्या सांगतात.
व्हॅजिनिस्मस पौंगडावस्थेच्या शेवटच्या वर्षांमध्ये इस्ले यांना व्हॅजिनिस्मस असल्याचं निदान झालं होतं.
त्यांच्यावर ट्रेनर्स आणि फिजिओथेरपिस्टनी उपचार केले आणि त्या मार्गातील स्नायू प्रसरण पावण्यासाठी उपचार केले.
'माझा आनंद कशात आहे याची मला जाणीव झाली'
इस्ले सांगतात, उपचाराचे प्रयत्न केल्यावर त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचं आणि दीर्घकाळ आपला आनंद टिकून राहाण्यासाठी ठोस असा काही उपाय नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्या सांगतात, “शेवटी एका थेरपिस्टने मला थांबवलं आणि मला सामान्य वाटेल अशा कोणत्या पातळीपर्यंत ती स्थिती हवी आहे असं विचारलं. हा संवाद मी लहिलेल्या नाटकात शेवटी दिसतो. थेरपिस्ट तिला तिच्या लैंगिक जीवनातून काय हवे आहे ते परिभाषित करण्यास सांगतात".
"तेव्हा मला (नाटकातल्या पात्राला) कळले की मला इतरांप्रमाणे लैंगिक जीवनाचा आनंद लुटण्याची गरज नाही.
"तिला कळते की तुम्ही आयुष्यात तुमची स्वतःची स्क्रिप्ट लिहिली पाहिजे आणि तुम्हाला ज्यातून जसा आनंद मिळेल ते करा."

फोटो स्रोत, Getty Images
यूकेमध्ये किती स्त्रियांना व्हॅजिनिस्मस आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, जरी अलीकडील संशोधन असे सूचित करते की जवळजवळ 10 पैकी एका ब्रिटfश स्त्रीला लैंगिक संबंध वेदनादायक वाटतात.
हे व्हॅजिनिस्मस विविध कारणांमुळे होऊ शकते.
'सेक्स करतानाच्या वेदना आणि या वेदनात फरक'
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील क्वीन एलिझाबेथ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. व्हेनेसा मॅके स्पष्ट करतात, "व्हॅजिनिस्मस हा सेक्स करताना होणाऱ्या वेदनांपेक्षा वेगळा असतो, कारण ती शरीराची आपोआप घडणारी प्रतिक्रिया असते.
"किती स्त्रियांना ही स्थिती आहे याची गणना करणे कठीण आहे कारण बहुतेक स्त्रिया ज्या लैंगिक समस्या अनुभवत आहेत त्या त्याबद्दल बोलत नाहीत," मॅके सांगतात.
या समस्येच्या बाह्य बाजूकडे लक्ष देण्यापेक्षा उपचारांचा भर मानसशास्त्रीय बाजूवर असला पाहिजे. सेक्समध्ये पुरुष लिंग आत जाण्याची भीती का वाटते यावर लक्ष दिलं पाहिजे.
मॅके म्हणतात, लैंगिकशास्त्रज्ञांसोबतचे समुपदेशन अनेकदा येथे उपयोगी पडते. "लोकांना त्यांच्या शरीराबद्दलच्या भावना समजून घेण्यास आणि बदलण्यात मदत करण्यासाठी ही एक प्रकारची टॉक थेरपी असते."
"रिलॅक्सेशनचे तंत्र योनिमार्गाचे स्नायू मोकळे करण्यास मदत करतात. योनिमार्गावर उपचार करण्यासाठी पेल्विक फ्लोर व्यायाम देखील केला जाऊ शकतो."
उपचाराचा भाग म्हणून योनि डायलेटर्सचा वापर करण्याचाही डॉक्टरांनी उल्लेख केला आहे.
"ते टॅम्पॉन्ससारखे आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या रुंदी आणि आकारात येतात , जेणेकरून तुम्हाला तुमच्या योनीमध्ये काहीतरी ठेवण्याची सवय होईल."
तेरेसा या 23 वर्षांच्या असून त्यांनाही हाच आजार आहे, त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार करण्यात आले.

फोटो स्रोत, Teresa
तेरेसा सांगतात, “एका समुपदेशकांनी मला हिप्नॉसिसचे तंत्र वापरण्यास सुचवले मात्र ते मला आजिबात लागू झाले नाही. माझा स्वभाव थोडा संशयी असल्यामुळे त्याचा मला उपयोग होईल का नाही हा प्रश्न सतत सतावत राहिला.”
“मला ग्रेडेड डायलेटर्सचा अपयोग झाला. त्यामुळे तुम्हाला ते वापरुन विश्रांतावस्थेत कसं राहायचं हे समजतं.”
त्या म्हणतात, “आयुष्य हे खरंच सुंदर आहे. मी दररोज त्याची काळजी करत बसत नाही. मी निवांत आणि अगदी आनंदी आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं पण तुम्ही या अडथळ्यावर तुम्हाला लागू पडेल असा उपाय शोधून आयुष्य सोपं करू शकता.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








