पर्सिड उल्कावर्षाव : आकाशात ताऱ्यांचा सोहळा कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या

उल्कावर्षाव

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मॅडी मोलॉय
    • Role, क्लायमेट-सायन्स रिर्पोटर

खगोलप्रेमींना या वर्षातील सर्वात सुंदर आकाशीय सोहळा पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे.

यंदाचा पर्सिड उल्कावर्षाव (Perseid meteor shower) पाहण्याचा सर्वोत्तम काळ जवळ आला आहे. पण हवामानामुळं त्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीस आकाश स्वच्छ राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरणामुळं उल्कांची चमक थोडीशी कमी जाणवू शकते.

चला तर, जाणून घेऊया या जादुई रात्रीचा अनुभव कधी आणि कुठे घेता येईल!

तेजस्वी, वेगानं प्रवास करणाऱ्या उल्कांना अनेकदा 'शुटिंग स्टार्स' म्हटलं जातं.

परंतु, अलीकडच्या स्टर्जन चंद्राच्या (पूर्ण चंद्र) तेजस्वी प्रकाशामुळे दृश्यता कमी होऊ शकते, त्यामुळं फिकट किंवा क्षीण झालेली उल्का पाहणं कठीण होईल.

पर्सिड उल्कावर्षाव उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. परंतु स्थानिक हवामान यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळं बाहेर जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज जरूर तपासायला हवा.

पर्सिड उल्कावर्षाव म्हणजे नक्की काय?

जेव्हा पृथ्वी धूमकेतू किंवा लघुग्रहांनी मागे सोडलेल्या धूळ आणि अवशेषांच्या पट्ट्यातून जाते, तेव्हा उल्कावर्षाव होतो.

पर्सिड उल्कावर्षाव स्विफ्ट–टटल नावाच्या धूमकेतूपासून होतो. तो दर 133 वर्षांनी एकदा सूर्याभोवती फेरी मारतो.

धूमकेतूमधील धुळीचे कण सुमारे प्रति सेकंद 37 मैल (59 किलोमीटर) वेगानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात.

हे कण वातावरणात शिरताना जळून जातात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तेजस्वी प्रकाशाला आपण उल्का म्हणतो.

उल्कावर्षाव

फोटो स्रोत, Getty Images

पर्सिड उल्कावर्षाव जवळपास 2,000 वर्षांपासून पाहिला जात आहे. त्याची सुरुवातीची नोंद प्राचीन चीनमध्ये आढळून येते.

त्यांना पसियस या तारकासमूहावरून किंवा नक्षत्राच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे, कारण उल्का जणू त्याच दिशेने येताना दिसतात.

उल्कावर्षाव कधी आणि कसं पाहता येईल?

रॉयल ऑब्झर्व्हेटरी ग्रीनविचचे सायन्स कम्युनिकेटर फिन बरीज यांच्या मते, 2025 मध्ये पर्सिड उल्कावर्षावाचा शिखर काळ हा 11-12 आणि 12-13 ऑगस्टच्या रात्री असेल.

त्यांनी सांगितलं की, 12 ऑगस्टला उल्कांची हालचाल थोडी जास्त असली तरी, दोन्ही रात्री पाहण्यासाठीची परिस्थिती साधारण सारखीच असेल.

उल्कांची संख्या मध्यरात्रीनंतर वाढते आणि सूर्योदयाआधी पाहण्याची वेळ सर्वात चांगली असते, तर काही उल्का रात्री लवकरही दिसू शकतात.

यंदा उल्कावर्षावाचा शिखर काळ तेजस्वी स्टर्जन (पूर्ण चंद्र) चंद्राशी जुळतोय, जो 9 ऑगस्टला पूर्ण चंद्राच्या अवस्थेत होता आणि अजूनही खूप चमकदार किंवा उजळणार आहे.

"या वर्षी उल्कावर्षावाचा शिखर काळ पूर्ण चंद्राशी जुळल्यामुळे, अगदी अंधाऱ्या आकाशातही प्रति तास 100 उल्कांचा पूर्ण अनुभव घेणं अशक्य आहे," असं बरीज यांनी सांगितलं.

"परंतु, (स्टर्जन मून) उल्कावर्षाव पाहायला न जाण्याचं कारणच नाही. पूर्ण चंद्र असूनही, दर तासाला किमान 1-2 तेजस्वी उल्का पाहायला मिळतील," असं त्यांनी सांगितलं.

उल्कावर्षाव

फोटो स्रोत, Getty Images

अंधाऱ्या आणि गडद आकाशात 16 ते 26 ऑगस्टच्या दरम्यानच्या रात्रीही उल्का पाहता येतील, पण त्यावेळी उल्कांची संख्या कमी असणार आहे.

"उल्कावर्षावाच्या शिखर काळाच्या जवळच्या तारखा पाहण्यासाठी सर्वोत्तम असतात, पण त्या वेळी पूर्ण चंद्र असतो," असं बरीज यांनी सांगितलं.

"पूर्ण चंद्रानंतरचे दिवस पाहण्यासाठी चांगले असतात, कारण चंद्र रात्री उशिरा उगवतो. म्हणून मी उल्कावर्षावाच्या मुख्य रात्री तसेच 16 आणि 17 ऑगस्टच्या आठवड्याचा सुट्टीचा दिवस पाहण्याचा सल्ला देतो," असं त्यांनी म्हटलं.

बरीज यांनी "शूटिंग स्टार पाहण्याच्या शक्यता वाढवण्यासाठी" काही टिप्स दिल्या आहेत.

  • शक्य तितकं आकाश स्पष्टपणे पाहू शकाल याची काळजी घ्या, कोणतीही इमारत, झाड किंवा डोंगर यामुळं अडथळा येणार नाही, याची खात्री करा.
  • पाठीवर झोपा आणि आकाशाकडे पाहा, कारण उल्का आकाशात कुठेही दिसू शकतात.
  • शहरे किंवा गावातील तेजस्वी दिव्यांपासून दूर कुठूनही पाहा. पण तुमच्याकडे पाणी, चार्ज केलेला फोन असावा आणि तुम्ही कुणाला तरी तुमचं ठिकाण सांगूनच निघा.
  • धीर धरा. जितका जास्त वेळ तुम्ही बाहेर घालवाल, तितक्या जास्त उल्का दिसण्याची शक्यता असते. डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी किमान 20 मिनिटं लागतात.

हवामान साथ देईल का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बऱ्याच ठिकाणी यूकेमध्ये सोमवारच्या पहिल्या अर्ध्या भागात आकाश थोडे ढगाळ असेल, परंतु काही ठिकाणी, विशेषतः नॉर्दर्न आयर्लंड, उत्तर-पश्चिम इंग्लंड आणि दक्षिण स्कॉटलंडमध्ये स्वच्छ आकाशही दिसेल.

कधी कधी पावसाच्या काही सरीही पडण्याची शक्यता आहे, खास करून वेल्स आणि उत्तरेकडील स्कॉटलंडमध्ये.

रात्री उशिरा मात्र, ढग हळूहळू निघून गेल्यामुळे बहुतेक ठिकाणी हवामान सुधारण्याची शक्यता आहे.

म्हणून, बहुतेक लोकांसाठी पसिड उल्कावर्षाव पाहण्याची सर्वोत्तम संधी मंगळवारी (12 ऑगस्ट) पहाटे असेल.

मंगळवारी सायंकाळी, यूकेच्या बहुतेक भागात एकतर पूर्णपणे स्वच्छ आकाश असेल किंवा जास्त वेळ ते स्वच्छ असू शकेल.

सूर्यास्तानंतर, काही काळासाठी नॉर्दर्न आयर्लंड आणि इंग्लंडच्या अतिशय उत्तर-पश्चिम भागात ढग आणि विरळ असा पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो नंतर मध्य आणि दक्षिण स्कॉटलंडकडे सरकू शकतो.

दक्षिण इंग्लंड आणि दक्षिण वेल्सच्या काही भागांमध्ये हळूहळू ढगाळ वातावरण पसरून आकाश अस्पष्ट होईल.

रात्रभर स्वच्छ आकाश राहण्याची शक्यता असलेले भाग, उत्तर इंग्लंड, उत्तर-पूर्व वेल्स, मिडलँड्स आणि इस्ट अँग्लिया आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)