मासे खाल्ल्यावर दूध प्यायलं तर त्वचेवर डाग पडतात का? डॉक्टर म्हणतात...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहम्मद सुहैब
- Role, बीबीसी उर्दू
प्रत्येक संस्कृतीमध्ये जेवणाविषयीच्या, त्यांच्या चवी विषयींच्या काही धारणा काही मान्यता असतात. आणि या धारणा पूर्वापार चालत आल्या असल्यामुळे बऱ्याचदा खऱ्या मानल्या जातात.
आता वातावरणात गारठा वाढलाय, त्यामुळे मासे खाण्याचा ट्रेंड वाढतो. पण माशांविषयीच्याही काही धारणा आहेत.
यातली एक म्हणजे मासे खाल्ले की त्यावर दूध पिता येत नाही. जर तुम्ही माशांवर दूध प्यायलात तर तुम्हाला त्वचेवर पांढरे डाग किंवा मोतीबिंदू होऊ शकतो. मात्र या चर्चा कितपत खऱ्या असतात?
त्वचारोगाला दुसरं नाव आहे विटिलिगो. यात त्वचेच्या काही भागांवरील पिंगमेंटेशन निघून जातं आणि अंगावर पांढरे चट्टे दिसू लागतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आता ही चर्चा पुन्हा सुरू झाली ती एका ट्विटमुळे. उझैर रिझवी नावाच्या एका ट्विटर युजरने याविषयीचं एक ट्विट केलं होतं.
मासे खाल्ले आणि त्यावर दूध प्यायचं म्हटलं की, आई आजही घाबरते असं ट्विट त्याने केलंय.
त्याने ट्विट मध्ये आणखीन एक प्रश्न केलाय की, हा मुद्दा फक्त भारतीय आणि पाकिस्तानी मातांशीच संबंधित आहे का? (की सर्वांनाच हे वाटतं.)
तर काही लोक सांगतात की, ज्यू लोकांच्या एका संप्रदायात ही काळजी घेतली जाते. हा संप्रदाय मासे खाल्ल्यावर दूध पित नाही.
तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करताना म्हटलंय की, हे खरं तर युनानी औषधशास्त्राचं म्हणणं आहे.
तर काहींची अशी धारणा आहे की, यामुळे पोटदुखी, सूज, मळमळ, उलट्या असा त्रास होतो.
पण हल्ली रेस्टॉरंटमध्ये दूध वापरून माशांचे पदार्थ तयार केले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञ काय म्हणतात?
दूध आणि मासे एकत्र खावेत की नाही याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी उर्दूने काही तज्ज्ञांशी संपर्क केला.
यावर पाकिस्तान मधील एक त्वचारोगतज्ज्ञ डॉ. ऊर्मिला जावेद सांगतात की, हे एक मिथक आहे.
त्या सांगतात की, त्वचेवर पांढरे डाग येण्याचा आणि दूध किंवा मासे एकत्र खाण्याचा काहीएक संबंध नाहीये. किंबहुना त्वचारोगाचा अन्नाशी संबंधच नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. उर्मिला पुढे सांगतात की, "हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. तुमची इम्युन सिस्टीम तुमच्या मेलनिनच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते."
"अँटीबॉडीज ज्या भागात हल्ला करतात त्या भागातील मेलनिनचं नुकसान होतं, आणि आपल्या त्वचेवर चट्टे दिसू लागतात."
आहारतज्ज्ञ काय सांगतात?
यासंबंधी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी उर्दूने न्यूट्रिशनिस्ट डॉ.जैनब यांच्याशीही चर्चा केली. यावर डॉ. झैनब सांगतात की, ही आपली धारणा आहे मात्र यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाहीये.
त्या सांगतात की, "दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचेवर पांढरे चट्टे येतीलच असं काही नसतं."
डॉ.जैनब पुढे सांगतात की, हा विषय फक्त मासे आणि दूध यांच्यापुरताच मर्यादित नाहीये. इतर खाद्यपदार्थांच्या बाबतीतही या गोष्टी आहेत. जसं की थंड आणि गरम असे पदार्थ एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात की, न्यूट्रिशनिस्ट नेहमीच अन्नाच्या प्रमाणावर भर देत असतात. कोणते खाद्यपदार्थ थंड आहेत की गरम हे जास्त महत्वाचं नसून तुम्ही त्याचं किती प्रमाणात सेवन करताय हे महत्त्वाचं असतं.
डॉ जैनब सांगतात की, "जर तुम्ही एखादा खाद्यपदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो."
त्यामुळे काही खाद्यपदार्थांमुळे लोकांना त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. याबाबत बोलताना डॉ.उर्मिला जावेद सांगतात की, काही लोकांना काही विशिष्ट अन्नपदार्थांची अॅलर्जी असते.
हवाबंद अन्न, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा खाद्यपदार्थांच्या रंगामुळेही अॅलर्जी होण्याची शक्यता असते..
दूध आणि मासे एकाच पॅनमध्ये...
काही लोक दूध आणि मासे एकत्र शिजवतात, या रेसिपीला पोच फिश असं म्हणतात.
मासे आणि दूध एकत्र शिजवल्याने घट्टसर अशी क्रिमी ग्रेव्ही तयार होते. आणि हीच ग्रेव्ही डिश सर्व्ह करताना माशांवर टाकली जाते.
ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला दोन कप दूध (400 मिली), थोडं मीठ आणि स्वच्छ केलेल्या माशांचे छोटे तुकडे घ्यायचे आहेत.
सर्वात आधी एक पॅन घ्या, त्यात दूध आणि चिमूटभर मीठ घालून उकळी काढा. दूध वर यायला लागलं की गॅसची फ्लेम बारीक करून त्यात माशाचे तुकडे टाका.
लक्षात असू द्या की, माशांचे तुकडे दुधात बुडालेले असले पाहिजेत. हे मिश्रण साधारण आठ ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. हे माशांचे तुकडे दूध शोषून घेतील.
शेवटी, माशांचे तुकडे पॅनमधून प्लेटमध्ये घ्या, आणि उरलेलं दूध माशांवर ओतून पोच फिश ही डिश सर्व्ह करा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








