रेल्वे रुळावरून जाताना 4 महिन्यांचं बाळ हातातून सटकलं आणि नाल्यात पडलं
मुंबईत बुधवारी (19 जुलै) मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक रखडली. ठाकुर्ली – कल्याण दरम्यान लोकल ट्रेन बराच वेळ खोळंबली होती. लोकलमधून उतरून रुळावरून चालत जाताना एका महिलेचं बाळ हातून निसटलं.
रुळाशेजारच्या अरुंद पट्ट्यांवरून चालत जाताना बाळ नाल्यात पडलं. आसपासचे लोक या बाळाला शोधण्यासाठी प्रयत्न करत होते.





