लोकसंख्येत भारत सर्वांत पुढे, पण महिलांचं नोकऱ्यांमध्ये स्थान किती?

लोकसंख्या

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अरुणोदय मुखर्जी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या महिन्यात भारत चीनपेक्षा लोकसंख्येच्या बाबतीत पुढे गेला आहे. याचा तरुण पिढीला काय फायदा होणार आहे असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे.

मात्र इतकी लोकसंख्या असली तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या अतिशय कमी आहे.

लावण्या उलगनाथन यांनी 2014 मध्ये बाळंतपणासाठी नोकरीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या अतिशय निराश आणि हतबल झाल्या.

त्या तामिळनाडूनमध्ये एचआर क्षेत्रात काम करत होत्या. जेव्हा त्यांनी ब्रेक घेतला तेव्हा त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर होत्या. मात्र कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवायचा हे त्यांनी ठरवलं होतं.

चार वर्षानंतर त्यांना दोन मुलं झाल्यावर त्यांना नोकरीवर परत जावंसं वाटू लागलं, मात्र नोकरी शोधणं अतिशय कठीण होऊन बसलं.

त्यांना अनेक ठिकाणाहून नकार आला. त्यांना अतिशय कमी पगार देऊ करण्यात आला. ब्रेक घेतल्यानंतर त्या अशा अपेक्षा करू शकत नाही, असं त्यांना सांगण्यात आलं.

“मला करिअरमध्ये खूप मोठा फटका बसला,” त्या सांगतात.

उलगनाथन असा झटका सहन करणाऱ्या एकट्या नाहीत. भारतात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे. मात्र गेल्या दोन दशकात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या अतिशय रोडावली आहे.

जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2000 मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाण 31 टक्के होतं. 2018 मध्ये हे प्रमाण 21 टक्के झालं.

लोकसंख्या
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यासाठी अनेक कारणं आहे. भारत अजूनही बहुतांश पुरुषसत्ताक आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आठपट घर सांभाळण्यात घालवतात अशी माहिती नॅशनल टाईम सर्व्हे 2019 मध्ये देण्यात आली आहे. जागतिक पातळीवर हा आकडा तीनपट आहे.

सुरक्षेची कारणं, नोकरीची जागा ऑफिसच्या जवळ नसणं, ही नोकरी न करण्याची कारणं आहेत.

अनेक महिने नोकरी शोधल्यावरही उलगनाथन यांना एका दुचाकी तयार करण्याच्या कंपनीत नोकरी मिळाली.

ब्रेक घेऊन परत येणाऱ्या स्त्रियांसाठी त्या कंपनीत एक योजना तयार केली होती- त्यांना कामाचे हवे तसे तास, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली.

उलगनाथन यांच्या मते या सगळ्या सुविधांचा फायदा झाला.

“जर तुम्हाला नव्या दमाने पुन्हा कामावर यायचं असेल तर अशा योजनांचा चांगलाच फायदा होतो.” त्या म्हणाल्या.

अधिकृत माहितीनुसार 32 टक्के महिला लग्नानंतर नोकरी करतात. त्यातील बहुतांश महिला शेती क्षेत्रात काम करतात.

अश्विनी देशपांडे या अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात की ग्रामीण भागात रोजगाराच्या आणखी काही संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात जेणेकरून शेती क्षेत्रात स्त्रियांना नोकऱ्या मिळतील.

“भारतात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाकडून जास्तीत जास्त काम करवून घ्यायचं असेल तर स्त्रियांना जास्तीत जास्त प्रमाणात नोकऱ्या द्यायल्या हव्यात,” त्या म्हणाल्या.

सध्या भारताच्या उत्पादन क्षेत्रात 20 टक्के महिला आहेत. काही बदल दिसताहेत. विशेषत:तामिळनाडूच्या होसूर भागात.

बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर होसूर नावाचं एक इंडस्ट्रिअल हब आहे. गुंतवणुकीसाठी तो एक महत्त्वाचा परिसर मानला जातो.

लोकसंख्या

फोटो स्रोत, Getty Images

सहा वर्षांपूर्वी रोशनी लुगून यांनी त्यांचं घर सोडलं. त्या ओडिशात राहतात. त्या होसूरच्या एका फॅक्टरीत इंजिनिअर म्हणून कामाला आल्या. त्यांनी दुचाकी आणि तीनचाकीसाठी शॉक अब्झॉर्बर तयार केले. आता त्या स्टाफ सुपरवायझर आहेत.

“मला काहीतरी नवीन करायचं होतं. जर मी घरी बसले असते तर माझी इतकी प्रगती कधीच झाली नसती. आज मी जे अचिव्ह केलं आहे ते मी कधीही करू शकले नसते,” त्या सांगतात.

लुगून यांच्यासारख्या अनेक बायका या पुरुषसत्ताक सेटअपमध्ये काम करतात. कंपन्या सुद्धा अधिकाधिक स्त्रियांना कामावर ठेवू पाहत आहेत.

होसूरमध्ये गॅब्रिएल इंडिया नावाची एक कंपनी आहे. त्यांच्याकडे 20 टक्के कर्मचारी या महिल्या आहेत. व्यापारी दृष्टीकोनातूनही याचा फायदा होतो असं कंपनीचं मत आहे.

“आमच्या अंतर्गत सर्वेक्षणात असं कळलं आहे की बायकांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी असतं,” असं या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय उपसंचालक अतुल जग्गी म्हणतात.

“कंपनी त्यांची इथे राहण्याची व्यवस्था करते, वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात त्यामुळे अधिकाधिक महिला कामासाठी येतात.”

लगून जग्गी यांच्याशी सहमत आहेत. “भारताची अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासाठी पुरुषांनीच काम करायला पाहिजे असं कुठे आहे?आम्ही सुद्धा मदत करू शकतो” त्या म्हणतात.

या कामाने त्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. या कामाचा हा सगळ्यांत महत्त्वाचा भाग आहे असं त्या सांगतात.

“जेव्हा मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाते तेव्हा मला एखादी गाडी दिसते. त्याचे पार्ट्स मी बसवलेले असतात. मी म्हणते. बघा मी ते केलं आहे. त्यामुळे मला आनंद होतो आणि गर्व वाटतो,” त्या म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)