ब्रिटिशांना सत्ता मिळवून देण्यासाठी मदत करणारा नागा साधू

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ते एक निर्भय कमांडर होते, ते नग्न योद्ध्यांचे सेनापती होते, पायदळ सैनिक होते आणि युद्धभूमीवर सैन्य घेऊन जाणारे होते. हे वर्णन आहे अनुपगिरी गोसाईन यांचं.

अनुपगिरी गोसाईन संत होते. ते शंकराचे भक्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते नागा साधू होते.

गोसाईन हे योद्धा संत होते, असं 'Warrior Ascetics and Indian Empires' पुस्तकाचे लेखक विल्यम पिंच म्हणतात.

नागा साधू अतिशय निर्भय असल्याची त्यांची प्रतिमा होती. फरक एवढाच आहे की, 18 व्या शतकातील नागा साधू अतिशय शिस्तबद्ध आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज होते, असं पिंच यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

विल्यम पिंच हे वेस्लियन विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स स्किनर यांनी 19 व्या शतकात नागा साधूंचं एक पोट्रेट काढायला सांगितलं होतं.

त्या पोट्रेटनुसार, तो माणूस अनवाणी होता. त्याच्या तलवारीला आधार देणारा एक बेल्ट होता. त्यात गनपावडर होती, शस्त्र होती. त्या माणसाचे केस घनदाट आणि गुंता झालेले होते. तसेच ते एखादं हेल्मेट असावं अशी त्या केसांची गुंडाळी करून डोक्यावर बांधले होते. हातात एक रायफल होती आणि कपाळावर एका टिळा होता.

“नागा साधूंची तेव्हा प्रतिमा चांगली होती.ते विना शस्त्र लढू शकायचे. अनुपगिरी यांच्या नेतृत्वात पूर्ण क्षमतेचे सैन्य तयार झालं होते. कोणत्याही प्रकारचे युद्ध खेळायला ते तयार असायचे.” असं पिंच म्हणाले.

18 व्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात अनुपगिरी आणि त्यांचा भाऊ उमरावगिरी यांनी जवळजवळ 20,000 सैनिकांचं नेतृत्व केलं होतं. 18 व्या शतकाच्या शेवटी या योद्ध्यांची संख्या कमालीची वाढली.

लेखक आणि इतिहासकार विल्यम डॅल्रमपल यांनी अनुपगिरी यांचं वर्णन ‘निर्भय नागा कमांडर’ असं केलं होतं. त्यांना मुघलांनी हिम्मत बहादूर अशी उपाधी दिली होती.

या सगळ्या गोंधळात ईस्ट इंडिया कंपनी भारताता आली.

डॅल्रमपल यांनी मिर्झा नजफ खान यांच्या इतिहासाबद्दलही लिहिलंय. नजफ खान हा मुघल योद्धा होता. त्यांना अनेक सैनिक येऊन मिळाले. त्यात अनुपगिरी गोसाईन यांच्या सैन्याचाही समावेश होता. 6,000 नग्न योद्धे किंवा नागासाधू त्यांच्या एका जहाजासकट आले.

अनुपगिरी यांच्या सेवांचाही त्यात उल्लेख आहे.

“10 हजार गोसाईन सैनिक घोड्यावर आणि पायदळ आहे, त्यांच्याबरोबर पाच जहाज, अनेक बैलगाड्या होत्या, तंबू आणि 12 लाख रुपये होते.”

अनुपगिरी हे 18 व्या शतकातील सर्वात यशस्वी सैनिकी उद्योजक म्हणून गणले जातात. त्या काळात अनेक राजांनी खासगी सैन्य त्यांच्या कामासाठी ठेवले होते.

“अनुपगिरी यांच्यासारखी भाषा बोलणाऱ्यांनी सांगितलं की अनुपगिरी असे होते की ते एकदा नदी ओलांडायला उभे राहिले की ते दोन्ही नावांवर बोट ठेवून ओलांडायचे म्हणजे जी बोट बुडत असेल तिला ते ढकलून द्यायचे अशी नोंद थॉमस ब्रुक यांनी नोंदवून ठेवलं होतं. ते बनारस शहरात न्यायाधीश होते.

या नागा योद्ध्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला होता.

“अनुपगिरींची महती सर्वदूर पोहोचली होती. ते सगळ्यांना हवेहवेसे होते. त्यांची गरज का लागते ही अपरिहार्य बाब होती म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची. जेव्हा लोकांना सैन्याची गरज लागायची तेव्हा लोक त्यांच्याकडे जायचे. त्यांचा संपर्क प्रगाढ होता. वाटाघाटी करण्यात ते पटाईत होता आणि एखादं वाईट कामही ते सफाईनं करायचे.” असं पिंच लिहितात.

अनुपगिरी यांनी अनेक युद्ध केली. 1761 मध्ये पानिपतच्या युद्धात ते मुघलांच्या बाजूने लढले आणि मराठ्यांच्या विरोधात ते अफगाणांच्या बाजूने लढले. तीन वर्षानंतर बक्सारच्या लढाईत ते ब्रिटिशांच्या विरोधात मुघलांच्या बाजूने उभे होते. नजफ खान यांच्या उद्धारातही अनुपगिरी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. नजफ खान दिल्लीतला पर्शियन प्रवासी होता. त्यानंतर अनुपगिरी यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली. त्यामुळे ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करणं सोयीचं झालं, असं पिंच यांचं मत आहे.

“मुघल आणि मराठा यांच्या अस्ताची गाथा पाहिली आणि ब्रिटिशांच्या उदयाची गाथा पाहिली तर अनुपगिरी गोसाईन यांचं महत्त्व लक्षात येतं,” पिंच सांगतात.

1734 मध्ये बुंदेलखंड मध्ये अनुपगिरींचा जन्म झाला.

अनुपगिरी यांच्या वडिलांच्या निधनानंतर अनुपगिरी यांच्या आईने त्यांना आणि त्यांच्या भावाला युद्धाला जुंपलं.

अनुपगिरी लहानपणी मातीचे सैनिक तयार करायचे अशीही एक दंतकथा आहे.

काही दंतकथा असंही सांगतात की, 16 व्या शतकात अनुपगिरी यांना मुसलमानांचा हल्ला परतवून लावण्यासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती. पिंच यांनी लावलेल्या शोधानुसार अनुपगिरी यांनी शाह आलम आणि अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली च्या बाजूने मराठ्यांविरुद्ध युद्ध केलं.

अनुपगिरी यांच्यावर लिहिलेल्या कवितांमध्ये मुस्लिम सैनिकांचा उल्लेख येतो.

“अनुपगिरी यांना युद्धाचं चांगलं ज्ञान होतं. केव्हा युद्ध करायचं आणि केव्हा थांबवायचं याची त्यांना चांगलीच जाण होती.” असं पिंच म्हणाले.

“ज्यांच्याविरुद्ध युद्ध करतोय आणि ज्यांच्यासाठी युद्ध करतोय त्यांची बाजू कशी घ्यायची याची त्यांना चांगलीच कल्पना होती.”

ते योद्धा होते आणि संत होते. त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे अशी लोकांची धारणा होती.

डॅल्रमपल यांनी बक्सरच्या युद्धाचं वर्णन केलं आहे. त्यामुळे बंगाल आणि बिहारवर ब्रिटिशांना सत्ता मिळवता आली होती.

अनुपगिरी यांच्या मांडीला या युद्धात मोठी दुखापत झाली होती. त्यांनी मुघल योद्धा सिराज-उद-दौला यांना युद्धभूमी सोडण्याची विनंती केली होती.

“ही मरण्याची वेळ नाही. आपण पुढेही विजय मिळवून आरामात सूड उगवू शकू,” असं ते म्हणाले.

अशा प्रकारे अनुपगिरी आणखी एक नागा योद्धा आणखी एक युद्ध खेळण्यास सज्ज झाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)