You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL : 52 दिवस, 10 संघ, 74 सामने, जाणून घ्या कोण आहे कुठल्या संघात...
31 मार्च 2023 पासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 13 टीम्स खेळणार आहेत. त्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, पंजाब किंग्स, सनराइजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स और गुजरात टायटन्स.
यावेळी एकूण 74 मॅच खेळल्या जाणार आहेत. त्यापैकी 70 लीग मॅच आणि 4 प्लेऑफ होणार आहेत.
अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला अशा एकूण 12 शहरांमध्ये यंदाच्या मॅचेस होणार आहेत.
लीग मॅचमध्ये सर्व टीम्स एकूण 14 मॅच खेळतील. त्यापैकी 7 त्यांच्या होम स्टेडिअमवर होतील तर उरलेल्या 7 मॅचेस प्रतिस्पर्धी टीमच्या होम ग्राउंडवर होतील.
त्यानंतर 24 ते 27 मे प्लेऑफ मॅच होतील. तर 29 मे रोजी आयपीएलची फायनल खेळली जाणार आहे.
कुठल्या टीमकडून यंदा कुठले खेळाडू मैदानात उतरणार आहेत यावर एक नजर टाकूया.
गुजरात टायटन्स
कॅप्टन - हार्दिक पंड्या
कोच - आशीष नेहरा
होम ग्राउंड - नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद
टीम - हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मोहम्मद शमी, राशिद ख़ान, राहुल तेवतिया, शिवम मावी, मैथ्यू वेड, केन विलियम्सन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, के.एस. भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर. साई किशोर, अभिनव सदरंगानी, अव्जारी जोसेफ, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साई सुदर्शन.
चेन्नई सुपर किंग्स
कॅप्टन - महेंद्रसिंह धोनी
कोच - स्टीफन फ्लेमिंग
होम ग्राउंड – चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
टीम - महेंद्र सिंह धोनी (कप्तान), डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाति रायुडू, रवींद्र जडेजा, सुभ्रांशु सेनापती, मोइन अली, शिवम दूबे, राजवर्धन हँगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश ठीकशाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, काइल जेमिसन, अजय मंडल आणि के. भगत वर्मा.
मुंबई इंडियन्स
कॅप्टन - रोहित शर्मा
कोच - महेला जयवर्धने
होम ग्राउंड - वानखेडे स्टेडियम, मुंबई
टीम - रोहित शर्मा (कॅप्टन), डेवल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, एन तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेविड, जसप्रीत बुमराह, कैमरून ग्रीन, जे. रिर्चडसन, कुमार कार्तिकेय सिंह, ट्रिस्टन स्टब्स, पीयूष चावला, विष्णू विनोद, डुआन जानसेन, कैमरून ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल आणि राघव गोयल.
दिल्ली कॅपिटल्स
कॅप्टन - डेविड वॉर्नर
कोट - रिकी पॉन्टिंग
होम ग्राउंड - अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
टीम - डेविड वॉर्नर ( कॅप्टन, पृथ्वी शॉ, यश ढुल, रोवमॅन पॉवेल, सर्फराज खान, रिले रोसॉव, फिलिप सॉल्ट, मनीष पांडे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, ललित यादव, विक्की ओस्तवाल, रिपल पटेल, मिशेल मार्श, एनरिच नार्जे, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, प्रवीण दुबे, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, अमन हकीम खान, ईशांत शर्मा और मुकेश कुमार.
पंजाब किंग्स
कॅप्टन - शिखर धवन
डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स - अनिल कुंबळे
होम ग्राउंड - पंजाब क्रिकेट एसोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली
टीम - शिखर धवन (कॅप्टन), भानुका राजपक्षे, शाहरुख खान, हरप्रीत सिंह भाटिया, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा, जॉनी बेयरस्टो, बलतेज ढांडा, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, सिकंदर रजा, मोहित राठी, शिवम सिंह, अर्शदीप सिंह, ऋषि धवन, राज अंगद बावा, नाथन एलिस, अथर्व तायडे, हरप्रीत बराड, राहुल चाहर, कगिसो रबाडा आणि विध्वथ कावेरप्पा.
राजस्थान रॉयल्स
कॅप्टन - संजू सॅमसन
कोच - कुमार संगकारा
होम ग्राउंड - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
टीम - संजू सॅमसन (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, जॉस बटलर, जो रूट, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, केसी करियप्पा, कुलदीप सेन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, ओबेड मॅककॉय, केएम आसिफ, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, मुरुगन अश्विन, युजवेंद्र चहल, आकाश वशिष्ठ, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड आणि अब्दुल पीए.
सनराइजर्स हैदराबाद
कॅप्टन - एडन मार्कराम
कोच- टॉम मूडी
होम ग्राउंड - राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद
टीम - एडन मार्कराम (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, वाशिंगटन सुंदर, हॅरी ब्रूक, अनमोलप्रीत सिंह, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, नीतीश रेड्डी, उपेंद्र यादव, अब्दुल समद, मार्को जानसेन, मयंक डागर, विवरांत शर्मा, संवीर सिंह, समर्थ व्यास, उमरान मलिक, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील होसेन, मयंक मारकंडे आणि आदिल राशिद.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू
कॅप्टन - फाफ डुप्लेसी
कोच - संजय बांगर
होम ग्राउंड – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरू
टीम - फाफ डुप्लेसि ( कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, सुयश एस प्रभुदेसाई, फिन एलेन, अनुज रावत, दिनेश कार्तिक, डेविड विली, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, मनोज भांडगे, विल जैक, सोनू यादव, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, जोश हेजलवुड, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टॉपले, राजन कुमार, अविनाश सिंह आणि हिमांशु शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स
कॅप्टन - नितीश राणा
कोच - चंद्रकांत पंडित
होम ग्राउंड - ईडन गार्डन, कोलकाता
टीम - नीतीश राणा (कॅप्टन), रिंकू सिंह, मनदीप सिंह, लिटन दास, एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण, अनुकुल रॉय, नितीश राणा, शाकिब अल हसन, वैभव अरोरा, डेविड विसे, वरुण चक्रवर्ती, टिम साउदी, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, लॉकी फ़र्ग्यूसन, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, हर्षित राणा.
लखनऊ सुपर जायंट्स
कॅप्टन - केएल राहुल
कोच - एंडी फ्लॉवर
होम ग्राउंड - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकान क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
टीम - केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, मनन वोहरा, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, काएल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, प्रेरक मांकड, डेनियल सैम्स, नवीन-उल-हक, युद्धवीर सिंह चरक, स्वप्निल सिंह, रवी बिष्णोई, मोहसिन खान, मयंक यादव, आवेश खान, मार्क वुड, जयदेव उनदकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, अमित मिश्रा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)