राणी लंकेंविरोधात पारनेरमधून अजित पवारांनी उमेदवार उतरवला, राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

फोटो स्रोत, Facebook/Ajit Pawar
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केलीय. या यादीत गेवराई, फलटण, निफाड आणि पारनेरच्या उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.
पारनेरमधून अजित पवारांनी काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होईल. कारण इथून शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे राणी लंके विरुद्ध काशिनाथ दाते अशी लढत या मतदारसंघात होईल.
तिसऱ्या यादीत चार नावं
- गेवराई - विजयसिंह पंडित
- फलटण - सचिन पाटील
- निफाड - दिलीपकाका बनकर
- पारनेर - काशिनाथ दाते
अजित पवारांनी पहिली यादी 38 उमेदवारांची, तर दुसरी यादी 7 उमेदवारांची होती. आता तिसरी यादी 4 उमेदवारांची असल्यानं अजित पवारांच्या पक्षानं आतापर्यंत 49 उमेदवार घोषित केले आहेत.
दुसऱ्या यादीत प्रामुख्यानं नवाब मलिकांची कन्या सना मलिक, झिशान सिद्दिकी आणि संजय काका पाटील, प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावांचा समावेश आहे.
पहिल्या यादीत अजित पवारांनी त्यांच्यासोबतच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली होती. बारामती मतदारसंघातून स्वत: अजित पवार पुन्हा एकदा उतरले आहेत.
सुनील टिंगरेंचा दुसऱ्या यादीत समावेश
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नवाब मलिक आणि सुनील टिंगरे यांची नावे नव्हती.
मात्न रवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना यांना तिकिट देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाही दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
मात्र, वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकदेखील इच्छुक होते, त्यामुळं त्यांच्या नावाचीही चर्चा जोरदार होती.
अजित पवारांची 38 उमेदवारांची पहिली यादी
- बारामती - अजित पवार
- येवला - छगन भुजबळ
- आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
- कागल - हसन मुश्रीफ
- परळी - धनंजय मुंडे
- दिंडोरी - नरहरी झिरवळ
- अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
- श्रीवर्धन - आदिती तटकरे
- अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
- उदगीर - संजय बनसोडे
- अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
- माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
- वाई - मकरंद पाटील
- सिन्नर - माणिकराव कोकाटे
- खेड-आळंदी - दिलीप मोहिते
- अहमदनगर शहर - संग्राम जगताप
- इंदापूर - दत्तात्रय भरणे
- अहमदपूर - बाबासाहेब पाटील
- शहापूर - दौलत दरोडा
- पिंपरी - आण्णा बनसोडे
- कळवण - नितीन पवार
- कोपरगाव - आशुतोष काळे
- अकोले - किरण लहामटे
- बसमत - चंद्रकांत नवघरे
- चिपळूण - शेखर निकम
- मावळ - सुनील शेळके
- जुन्नर - अतुल बनके
- मोहोळ - यशवंत माने
- हडपसर - चेतन तुपे
- देवळाली - सरोज आहिरे
- चंदगड - राजेश पाटील
- इगतपुरी - हिरामण खोसकर
- तुमसर - राजू कोरमोरे
- पुसद - इंद्रनील नाईक
- अमरावती शहर - सुलभा खोडके
- नवापूर - भरत गावित
- पाथरी - निर्मला विटेकर
- मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला


7 जणांची दुसरी यादी
- इस्लामपूर - निशिकांत पाटील
- तासगाव - कवठे महांकाळ - संजयकाका रामचंद्र पाटील
- अणुशक्ती नगर - श्रीमती सना मलिक
- वांद्रे पूर्व - झिशान सिद्दिकी
- वडगाव शेरी - सुनील टिंगरे
- शिरुर - ज्ञानेश्वर कटके
- लोहा - प्रताप पाटील चिखलीकर
या 18 जणांना अजित पवारांनी वाटले होते एबी फॉर्म
1) संजय बनसोडे - उद्गीर
2) चेतन तुपे - हडपसर
3) सुनील टिंगरे - वडगाव शेरी
4) दिलीप वळसे पाटील - आंबेगाव
5) दौलत दरोडा - शहापूर

6) राजेश पाटील - चंदगड
7) दत्तात्रय भरणे - इंदापूर
8) आशुतोष काळे - कोपरगाव
9) हिरामण खोसकर - इगतपुरी
10) नरहरी झिरवळ - दिंडोरी
11) छगन भुजबळ - येवला
12) भरत गावीत - नंदुरबार

फोटो स्रोत, Facebook
13) बाबासाहेब पाटील- अहमदपूर
14) नितीन पवार - कळवण
15) इंद्रनील नाईक- पुसद
16) अतुल बेनके - जुन्नर
17) बाळासाहेब अजबे- आष्टी
18) यशवंत माने - मोहोळ
वाटप करण्यात आलेल्या एबी फॉर्ममध्ये प्रामुख्यानं सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











