You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, अंबानी कोणत्या स्थानावर?
ब्लूमबर्गने जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली असून यामध्ये वॉल्टन कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे.
वॉल्टन परिवार हे वॉलमार्ट सुपरमार्केटचे मालक असून सॅम वॉल्टन यांनी सहा दशकांपूर्वी पहिला सुपरमार्केट सुरू केला होता. आता त्यांचे वंशज आधीपेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत.
यामागील कारण म्हणजे त्यांच्या मल्टीनॅशनल कंपनीमधील शेअर्सची उत्कृष्ट कामगिरी हे आहे. या शेअर्सच्या किमतीत 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या श्रीमंतांच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या बहुतांश कुटुंबाना शेअर मार्केटचा मोठा फायदा झाला आहे.
यामध्ये 25 कुटुंबांना संधी मिळाली असून यामध्ये टॉप टेन कोण आहेत? भारतातील उद्योगपती अंबानी कोणत्या स्थानावर आहेत? हे बघूयात.
1. वॉल्टन कुटुंब
- कंपनी – वॉलमार्ट
- एकूण संपत्ती – 432 अब्ज अमेरिकन डॉलर
- देश – अमेरिका
- पिढी – तिसरी
वॉल्टन यांच्याकडे सुपरमार्केटचा जवळपास 46 टक्के हिस्सा आहे. यामुळेच ते इतके श्रीमंत आहेत.
या कंपनीचे मालक सॅम वॉल्टन यांनी आपल्या संपत्तीचा सारखा हिस्सा (शेअर्स) मुलांना वाटून दिला होता जेणेकरून त्यांच्या संपत्तीवर सगळ्या कुटुंबाचं नियंत्रण राहू शकेल.
2. अल नाह्यान कुटुंब
- कुटुंब – अल नाह्यान
- सेक्टर – औद्योगिक
- देश – संयुक्त अरब अमीरात
- संपत्ती – 323 अब्ज अमेरिकन डॉलर
- पिढी – तिसरी
नाह्यान यांनी तेलाच्या व्यवसायातून इतकी संपत्ती जमवली आहे. त्यांच्याच परिवारातील शेख मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान यूएईचे राष्ट्रपती आहेत.
3. अल थानी कुटुंब
- कुटुंब – अल थानी
- संपत्ती – 172 अब्ज अमेरिकन डॉलर
- सेक्टर – औद्योगिक
- देश – कतार
- पिढी – 8
थानी कुटुबांचा राजकारणात सक्रीय असून त्यांचा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये व्यवसाय आहे. तसेच याआधी त्यांचं कुटुंब तेल आणि वायूच्या क्षेत्रात व्यवसाय करत होतं.
4. हर्मीस परिवार
- कुटुंब – हर्मीस
- संपत्ती – 170 अब्ज अमेरिकन डॉलर
- देश – फ्रान्स
- पिढी – सहावी
या परिवारातील सहावी पिढी फ्रेंच लग्जरी फॅशन कंपनीची मालक असून त्यांच्या कुटुंबात 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत. यापैकी काही महत्वपूर्ण पदांवर असून एक्सेल दुमास हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
5. कोक परिवार
- कुटुंब – कोक
- संपत्ती – 148 अरब अमेरिकन डॉलर
- देश – अमेरिका
- पिढी – तिसरी
फ्रेडरिक, चार्ल्स, डेव्हिड आणि विल्यम कोच यांना त्यांचे वडील फ्रेड यांच्याकडून तेल कंपनीचा वारसा मिळाला, परंतु वादानंतर केवळ चार्ल्स आणि डेव्हिड या व्यवसायात राहिले.
त्यांचा व्यवसाय तेल, केमिकल्स, एनर्जी, मिनिरल्स, क्लाउड कंप्युटींग, फायनान्स अशा इतर क्षेत्रांमध्ये पण पसरला आहे.
6. अल सौद परिवार
- कुटुंब – अल सौद
- सेक्टर – औद्योगिक
- सपंत्ती – 140 अब्ज अमेरिकन डॉलर
- देश – सौदी अरब
- पिढी – तिसरी
सौदी अरेबियाच्या या राजघराण्यानं तेल कंपनीपासून व्यवसायाला सुरुवात केली. ब्लूमबर्गनं गेल्या 50 वर्षात राजघराण्यातील सदस्यांना रॉयल दिवानकडून मिळालेल्या संपत्तीच्या आधारे एकूण संपत्तीचा अंदाज व्यक्त केला आहे.
क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याजवळ एक अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक खासगी संपत्ती आहे.
7. मार्स परिवार
- कुटुंब – मार्स
- कपंनी – मार्स इंक
- संपत्ती – 133 अरब अमेरिकन डॉलर
- देश – अमेरिका
- पिढी – पाचवी
मार्स कंपनी प्रामुख्यानं एम अँड एम, मिल्की वे आणि स्निकर्स बार्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीचा निम्म्याहून अधिक महसूल पाळीव प्राण्यांसाठी तयार केलेल्या उत्पादनातून येतो.
8. अंबानी परिवार
- कुटुंब – अंबानी
- कंपनी – रिलायन्स इंडस्ट्रीज
- संपत्ती – 99 अब्ज अमेरिकन डॉलर
- देश – भारत
- पिढी – तिसरी
मुकेश अंबानी जगातील सगळ्यात मोठ्या तेल रिफायनरीचे मालक आहेत. मुकेश अंबानी मुंबईत अँटिलिया हाऊस इथं राहतात.
हे जगातील सगळ्यात महागडं घर असल्याचं बोललं जातंय. त्यांना आणि त्यांच्या भावाला वारशानं संपत्ती मिळाली होती. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी संपत्तीमध्ये अधिक भर टाकली, तर त्यांचे बंधू अनिल अंबानी मात्र इतकी प्रगती करू शकले नाहीत.
9. वर्थाइमर परिवार
- कुटुंब – वर्थाइमर
- कंपनी – शनेल
- संपत्ती – 88 अब्ज अमेरिकी डॉलर
- पिढी – तिसरी
ॲलन आणि जेरार्ड वेर्थेइमर वर्थाइमर शनेलचे मालक असून त्यांना त्यांच्या आजोबांकडून वारसा हक्कानं ही संपत्ती मिळाली होती.
10. थॉमसन्स परिवार
- कुटुंब – 87 अब्ज अमेरिकन डॉलर
- देश - कॅनडा
- पिढी – तिसरी
थॉमसन रॉयटर्स ही कंपनी आर्थिक माहिती देण्याचं काम करत असून या कंपनीत या कुटुंबाचा जवळपास 70 टक्के हिस्सा आहे.
कॅनडातील या सर्वात श्रीमंत कुटुंबानं 1930 च्या दशकात संपत्ती जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा रॉय थामसन यांनी ओंटारियोमध्ये रेडिओ स्टेशन उघडलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)