‘द केरला स्टोरी’- वास्तव की प्रोपागंडा फिल्म? या सिनेमावरून का सुरू आहे वाद?

केरळ

फोटो स्रोत, The Kerala Story

'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून सध्या बरेच वाद सुरू आहेत. या सिनेमावरून सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून येत आहेत.

दरम्यान, चित्रपटाच्या टीझर डिस्क्रिप्शनमधील (प्रस्तावना) मजकुरात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता झाल्याचं यात म्हटलं होतं, पण आता नव्या बदलानंतर हा आकडा तीनवर आणण्यात आला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आत्तापर्यंत 1.8 कोटी वेळा पाहिला गेलाय.

ज्या दिवशी या चित्रपटाचा टीझर समोर आला होता, त्या दिवसापासूनच त्यावरची चर्चा सुरू झाली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती.

केरळमधून 32 हजार मुली बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या या चित्रपटामुळे लोकांमध्ये दोन गट पडले असून अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

काहीजणांच्या मते हा चित्रपट एक प्रोपागंडा फिल्म आहे, तर दुसऱ्या गटाच्या मते यातून केरळमधील वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

रविवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 'द केरला स्टोरी'च्या निर्मात्यांवर टीका केली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पिनाराई विजयन म्हणले की, चित्रपट निर्मात्यांकडून 'लव्ह जिहाद'चा मुद्दा पुढे करुन संघ परिवाराचा प्रचार केला जातोय.

लव्ह जिहादसारखे मुद्दे न्यायालय, तपास यंत्रणा आणि अगदी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळून लावले असल्याचं त्यांनी म्हटलंय.

संघाचा अजेंडा

केरळ स्टोरी

फोटो स्रोत, @Adah_Sharma

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, या चित्रपटाचा ट्रेलर जातीय ध्रुवीकरण आणि राज्याविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या कथित उद्देशाने जाणूनबुजून तयार केलेला दिसतो.

'लव्ह जिहाद'सारखे मुद्दे न्यायालय, तपास यंत्रणा आणि अगदी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत. जगासमोर केरळची बदनामी हा चित्रपटाचा मुख्य आधार म्हणून दाखवण्यात आल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

विजयन पुढे म्हणाले की, अशा प्रकारचा प्रोपागंडा चित्रपट आणि त्यात दाखवलेला मुस्लिमांबद्दलचा द्वेष याकडे केरळमध्ये राजकीय फायदा मिळवण्याच्या संघ परिवाराच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पाहिले पाहिजे.

केरळमध्ये धार्मिक सलोखा नष्ट करण्याचा आरोपही त्यांनी संघ परिवारावर केलाय.

काही दिवसांपूर्वी केरळमधील सत्ताधारी माकप आणि विरोधी काँग्रेस या दोघांनीही केरळ स्टोरी चित्रपटावर जोरदार टीका केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात जातीयवादाची विषारी बीजे पेरू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं.

केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी 'द केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, असं म्हटलं होतं.

केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सतीशन म्हणले की, "32,000 मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्या इस्लामिक स्टेटच्या सदस्य बनल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आलाय. या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती द्यायला हवी. त्यांना नेमकं काय दाखवायचं आहे हे चित्रपटाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होतंय."

समाजातील अल्पसंख्याकांना एकटं पाडण्याचा संघ परिवाराचा जो अजेंडा आहे त्याचा प्रभाव या चित्रपटावर असल्याचं सतीशन यांनी म्हटलंय.

यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सतीशन यांनी केलाय.

या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची टीका सत्ताधारी सीपीआय (एम) ची युवा शाखा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे.

सीपीआय (एम) चे राज्यसभा खासदार ए. ए. रहीम म्हणाले की, "खोट्या माहितीवर आधारित हा चित्रपट म्हणजे निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी आसुसलेल्या संघ परिवाराचा अजेंडा आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने या चित्रपटाचं समर्थन केलं आहे.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटलंय की, "द केरला स्टोरी हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित आहे. हा एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा चित्रपट आहे."

ते पुढे लिहितात, "केरळमध्ये झपाट्याने होणारं इस्लामीकरण आणि इस्लामिक स्टेटमध्ये काम करण्यासाठी निष्पाप मुलींचा होणारा वापर याचं चित्रीकरण यात करण्यात आलंय. लव्ह जिहाद ही वास्तविकता असून ती धोकादायक आहे. हा धोका वेळीच ओळखला पाहिजे."

निर्मात्यांचा बचाव

केरळ स्टोरी

फोटो स्रोत, The Kerala story

चित्रपटाबाबतच्या गदारोळात चित्रपटाचे कलाकार आणि निर्मात्यांनी बचावात्मक पवित्रा घेत म्हटलंय की, लोकांनी चित्रपट बघून मग त्याबद्दलच मत बनवायला हवं.

चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माने एएनआयशी संवाद साधला. यावेळी अदा म्हणाली, "ही एक भीतीदायक आणि धक्कादायक गोष्ट आहे. लोक याला अपप्रचार म्हणत आहेत किंवा गायब झालेल्या मुलींच्या संख्येच्या आकडेवारीची चर्चा करीत आहेत हे आणखीनच भीतीदायक आहे. मुली गायब होण्याच्या मुद्द्यावर बोलण्याआधी लोक त्यांच्या संख्येविषयी बोलत आहेत. हे खरं तर उलट असायला हवं होतं."

अदा शर्मानेही आपण अशा मुलींना भेटल्याचा दावा केला आहे.

ती म्हणते की, "मी अशा काही मुलींना भेटले आहे. मी त्यांचं दुःख शब्दात सांगू शकत नाही, एक-दोन ओळी बोलून त्यांच्या वेदनांना न्याय मिळणार नाही."

दुसरीकडे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे, त्यांनी या चित्रपटाच्या कथेवर सात वर्षे काम केलं असून त्यांनी पीडित मुलींचीही भेट घेतली, त्यांच्या मुलाखती घेतल्या.

पीडितांचा खरा आकडा जाणून घेण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

निर्माता विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी मिळून या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. त्यांनी या चित्रपटात 32,000 पीडित मुलींचं दुःख मांडलं आहे.

बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर आम्ही हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं निर्माता विपुल अमृतलाल शाह यांनी सांगितलं.

विपुल शाह म्हणाले की, या चित्रपटात अशी सत्यकथा मांडण्यात आली आहे जी याआधी कोणीही सांगण्याची हिंमत केली नव्हती.

माध्यमांशी बोलताना विपुल शाह म्हणाले, "कट्टरतावाद आपल्या देशातील महिलांसाठी धोका आहे. या महिला

कट्टरतावादाला कशा बळी पडल्या हे चित्रपटात दाखवण्यात आलंय. यातून भारताविरुद्ध रचल्या जाणाऱ्या षडयंत्राबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आहे."

या महिलांचं धर्मांतर करून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आलं. नंतर त्यांना भारत आणि जगातील इतर देशांमध्ये दहशतवादी मोहिमांवर पाठवल्याचा दावा चित्रपटात करण्यात आलाय.

हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)