'नवऱ्याचा खून कसा करावा' लिहिणाऱ्या लेखिकेलाच झालेली पतीच्याच हत्येप्रकरणी जन्मठेप

फोटो स्रोत, DAVE KILLEN / THE OREGONIAN / POOL
कल्पना कधीकधी सत्यात उतरतात. कल्पना एक प्रेरणा म्हणून काम करते. आणि त्यातून अशा गोष्टी देखील घडतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
अमेरिकेतील 71 वर्षीय लेखिका नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफीला तेथील स्थानिक न्यायालयाने तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जून 2018 मध्ये पतीची हत्या केल्याचा आरोप नॅन्सीवर लावण्यात आला होता. गेल्या महिन्यात म्हणजे मे 2022 मध्ये क्रॅम्प्टन ब्रॉफी यांना न्यायालयाने पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
या प्रकरणात सर्वांत जास्त चर्चिलेली गोष्ट म्हणजे नॅन्सीने तिच्या ब्लॉगवर लिहिलेली एक पोस्ट. लेखिका असलेल्या ब्रॉफीने तिच्या ब्लॉगवर एक विचित्र गोष्ट लिहिली होती. तिच्या या ब्लॉगचं शीर्षक होतं - 'हाऊ टू मर्डर युवर हसबंड' म्हणजेच आपल्या पतीची हत्या कशी करावी.
'मी हत्या केली नाही.. मी फक्त लिहिण्यासाठी प्रेरणा शोधत होते.'
या ब्लॉगमध्ये नॅन्सीने हत्येसाठी आवश्यक असलेल्या पाच हेतू आणि हत्यारांबद्दल लिहिलंय.

फोटो स्रोत, DAVE KILLEN / THE OREGONIAN / POO
जर रोमँटिक कादंबरीतील एक पात्र तिच्या पतीची हत्या करणार असेल तर त्यामागे तिचे कोणते पाच हेतू असू शकतील आणि हत्या करण्यासाठी कोणती हत्यारं वापरणं योग्य ठरेल याविषयी नॅन्सीने आपल्या ब्लॉगवर लिहिलं आहे.
तिने आपल्या 63 वर्षीय पती डेनियर ब्रॉफीचवर दोन गोळ्या झाडल्या. म्हणून ऑरेगनमधील पोर्टलँड ज्युरीने तिला सेकंड डिग्री मर्डरसाठी दोषी ठरवलं आहे.
तिच्यावर हत्येचा आरोप करणारे वकील शॉन ओव्हरस्ट्रीट सांगतात की, हत्या करण्यापूर्वी लेखिका आर्थिक अडचणींना तोंड देत होती. तिने पतीच्या हत्येची जी योजना आखली होती त्यासंबंधीचे पुरावे ओव्हरस्ट्रीट यांनी कोर्टात सादर केले.
ओव्हरस्ट्रीट खटल्यादरम्यान म्हणाले, "हे फक्त पैशाशी संबंधित प्रकरण नव्हतं. नॅन्सीला जी लाइफस्टाइल हवी होती ती देण्यासाठी तिचा नवरा असमर्थ ठरला त्यामुळेचं हे प्रकरण घडलं."
यावर नॅन्सी म्हणते की, तिने पतीची हत्या केली नाही. घटनास्थळावर जे सेक्युरिटी कॅमेरे आहेत त्यातून समजेल की मी लिहिण्यासाठी प्रेरणा शोधत होती.
वकील ओव्हरस्ट्रीट म्हणतात की, "हत्येसाठी वापरलेली बंदूक गहाळ झाली आहे. तर पोलिसांना वाटतं की, एका मालिकेसाठी ही बंदूक खरेदी करण्यात आली होती. नॅन्सीच्या पतीने लाखो डॉलर्सचा विमा उतरवला होता. आणि नॅन्सीला आपल्या पतीची हत्या करून हे पैसे मिळवायचे होते, असा दावाही पोलिसांनी केलाय."
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, नॅन्सी गेल्या आठवड्यात म्हणाली होती की तिच्या पतीच्या मृत्यूच्या खूप आधीच तिची आर्थिक चणचण संपली होती.
खटला चालू असताना नॅन्सी म्हणाली की, "माझ्या लिखाणावरून तुम्ही हत्येचा संदर्भ जोडत आहात. पण ते वाचून तुम्हीच सांगा की यात हत्येचा हेतू कुठं दिसतोय. कोणताही संपादक ब्लॉग वाचल्यावर म्हणेल की, तुम्हाला या कथेवर जास्तीची मेहनत घेण्याची गरज आहे. या कथेत मोठा गॅप आहे."
नॅन्सीला असं म्हणायचंय की, ही निव्वळ कल्पना आहे आणि यातून काही हत्या घडलेली नाही.
नॅन्सीला या शिक्षेशी संबंधित कोणतीही औपचारिक नोटीस मिळालेली नाही. मात्र या प्रकरणात तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. द ऑरेगोनियन या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नॅन्सीचे वकील याविरोधात अपील करणार आहेत.
नॅन्सीच्या कथेमध्ये वापरण्यात आलेल्या पद्धती
नॅन्सीने रोमँटिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. यामध्ये स्त्री-पुरुषांमधील नातं कसं बिघडतं याचं तिने वर्णन केलंय. त्याचप्रमाणे सस्पेन्सने भरलेल्या या कथांमध्ये कोणालाही संशय येऊ नये असा, पती किंवा पत्नीला मारण्याचा उत्तम मार्ग कोणता याचा ही उल्लेख करण्यात आलायं.
'द राँग कॉप' नावाच्या कादंबरीत तिने एका स्त्रीबद्दल लिहिलंय. ती स्त्री आपल्या वैवाहिक आयुष्यातील प्रत्येक एक दिवस आपल्या पतीला मारण्याच्या नवीन पद्धतींची कल्पना करण्यात घालवत असते.
'द राँग हसबंड' कादंबरीतील मुख्य पात्र असलेली स्त्री स्वतःच्या हत्येचा बनाव रचून मारहाण करणार्या नवर्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करते.
पण 'हाऊ टू मर्डर युवर हसबंड' मध्ये लेखिकेने अजून पुढचा टप्पा गाठलाय. यामध्ये आपल्या पतीच्या हत्येसाठी मारेकरी पाठवू नका असा सल्ला ती देते. ती म्हणते, "हे मारेकरी पोलिसांसमोर तुमचं नाव उघड करू शकतात. या प्रकरणात प्रियकरावर विश्वास ठेवण्याची आयडिया पण वाईट आहे."
यामध्ये पतीला विष घालून मारण्याविषयीचा सल्ला पण तिने दिलेला नाही. ती लिहिते की "जर पतीची हत्या करून मला जर मुक्तचं व्हायचं आहे तर हत्या करून मी तुरुंगाची हवा खाण्यासाठी तर नक्कीच जाणार नाही."
नॅन्सीचा नवरा डॅनियल ब्रॉफी एका कुकिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचा. नॅन्सीने तिच्या पतीबरोबर 27 वर्ष संसार केला. नॅन्सीने तिच्या ब्लॉगमध्ये पतीसोबतच्या नात्यातील रोमँटिक गोष्टींवर सुद्धा खुलेपणाने लिहिलंय.

फोटो स्रोत, NANCY BROPHY SITE
त्यांच्या नातेसंबंधात चढ-उतार होते, त्यांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस पाहिले असं ही ती मानते.
डॅनियलच्या विद्यार्थ्यांनी हायस्कूलच्या किचनमध्ये डॅनियलचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहिला तेव्हा सर्वजण थक्क झाले. काय करावं हे कोणालाच काहीच कळत नव्हतं.
नॅन्सीने स्वतः लिहिलंय की "आता काय करावं हे तिलाही समजत नव्हतं." घडलेल्या प्रकाराने नॅन्सी उदास झाली आहे हे तिच्या शेजारी आणि नातेवाईकांच्या लक्षात आलं.
'हाऊ टू मर्डर युवर हसबंड' यात लेखिकेने पतीच्या हत्येच्या पद्धती आणि कारणांची माहिती दिली आहे. वर्णन केलेल्या पद्धतींमध्ये बंदुकीचा वापर केलाय. यासोबतच पतीच्या हत्येमागे आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचं ही सांगितलं आहे.
त्या ब्लॉगमध्ये लेखिकेने आवाज होणाऱ्या हत्यारांचा वापर करायला सांगितला आहे. आणि पुढे म्हटलंय की ही हत्यार चालविण्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे.
नॅन्सी लिहिते, "जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा मर्यादेबाहेर त्रास होतो तेव्हाच आपण हत्या करण्याचा विचार करतो असं मला वाटतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








