गीतांजली श्री मुलाखत: 'रेत समाधीच्या बुकर पुरस्काराने इतर भारतीय भाषांनाही प्रेरणा मिळेल'

गीतांजली श्री

'रेत समाधी' या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळणं, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराने हिंदीच नव्हे तर इतर भारतीय भाषांनाही प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांनी दिली आहे.

गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टाँम्ब ऑफ सँड' या इंग्रजी पुस्तकाला यंदाच्या वर्षीच्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या निमित्ताने बीबीसी न्यूजच्या प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी त्यांची मुलाखत घेतली. बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी ती जशीच्या तशी.

प्र. बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

उत्तर - मला खूप आनंद वाटला की मला ही ओळख मिळाली. बुकर खूप मोठा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे तुमची आणि तुमच्या साहित्याची ओळख एका विस्तृत अशा जगात होते. त्यामुळे मी आनंदी असण्याची अनेक कारणे आहेत.

बुकर पुरस्कार मिळणारं, पहिलं पुस्तक बनण्याचा मान या पुस्तकाला मिळाला. मी त्याचं निमित्त होऊ शकले, याचाही मला खूप आनंद होत आहे.

गीतांजली श्री यांची बुकर पुरस्कारप्राप्त रेत समाधी कादंबरी

फोटो स्रोत, THE BOOKER PRIZES

फोटो कॅप्शन, गीतांजली श्री यांची बुकर पुरस्कारप्राप्त रेत समाधी कादंबरी

सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जगाने हे लक्षात घ्यावं की हिंदी साहित्य क्षेत्र हे एक वेगळं असं जग आहे, जिथं खूप काही घडत आहे. याची नोंद त्यांनी घ्यावी. त्याचा आनंद घेण्याची गरज आणि संधी जगाला आहे.

फक्त हिंदीच नव्हे तर बाकीच्या भारतीय भाषा आणि दक्षिण आशियाई भाषांना या पुरस्कारातून प्रेरणा मिळेल. या निमित्ताने नवनव्या गोष्टी जगासमोर येऊ शकतील.

प्र. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी यांची काय प्रतिक्रिया होती?

उत्तर - ते खूप आनंदी झाले. माझे नातेवाईक वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेले आहेत. ते त्यांच्या त्यांच्या प्रमाणवेळेनुसार कालचा पुरस्काराचा कार्यक्रम पाहत होते, याचा मला खूप आनंद वाटला. त्यांच्या आनंदामुळे माझा आनंद कित्येक पटींना वाढला आहे.

प्र. नव्या लेखकांना तुम्ही काय संदेश द्याल?

उत्तर - ज्यांना लिहायचं आहे, त्यांनी अतिशय मनापासून लिहावं. त्यांनी इतर कोणत्याही गोष्टींमध्ये अडकून वेळ घालवू नये. फक्त लिहित राहा, त्याचा आनंद घ्या. तोच प्रयत्न नेहमी कायम ठेवा.

प्र. तुमचा भविष्यातील उपक्रम काय आहे?

उत्तर - लिहिणं हाच माझा भविष्यातला उपक्रम आहे. भविष्यातलाच नव्हे तर वर्तमानाला उपक्रमही तोच आहे. मी माझ्या लेखनात डुंबून त्याचा आनंद घेत राहीन.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)