भीम जयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे दुर्मिळ फोटो कदाचित तुम्ही पाहिले नसतील
- Author, संजीव चंदन
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुन्हा पहिल्यासारखीच धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. त्यानमित्तानं बीबीसीनं केलेली ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.

फोटो स्रोत, OTHER
डावीकडून मुलगा यशवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्नी रमाबाई आंबेडकर, वहिनी लक्ष्मीबाई, भाचा मुकुंदराव आणि त्यांचा लाडका कुत्रा टॉबी. (फेबृवारी 1934)

फोटो स्रोत, OTHER
मुंबईच्या कान्हेरी गुहेत डॉ. आंबेडकर फेरफटका मारताना. (1952-53)

फोटो स्रोत, OTHER
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथी 'बौद्ध भ्रातृ संघ' परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान नेपाळचे राजे महेंद्र आणि महस्थवीर चंद्रमणी यांच्या उपस्थित डॉ. आंबेडकरांनी 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' हे प्रसिद्ध भाषण केलं होतं.
गंमत म्हणजे त्यांच्या भाषणाचा मूळ विषय 'बौद्ध धर्मातील अहिंसेची तत्वं' असा होता. पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी तो विषय बदलून 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' असा केला. ( 20 नोव्हेंबर 1956)

फोटो स्रोत, OTHER
औरंगाबादमध्ये महाविद्यालयाचं भूमीपूजन केल्यानंतर डॉ. आंबेडकर आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद वेरुळची लेणी पाहताना. (1 सप्टेंबर 1951)

फोटो स्रोत, OTHER
कायदामंत्री म्हणून डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिलावर संसदेत चर्चा करताना.

फोटो स्रोत, OTHER
कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले. (18 नोव्हेंबर, 1951) या दरम्यान, मुंबई प्रदेश 'शेड्यूल कास्ट्स फेडरेशन' आणि समाजवादी पक्षाच्यावतीनं बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर डॉ. आंबेडकरांच स्वागत करण्यात आलं.
त्यावेळी रायबहादूर सी. के. बोले यांना बसायला जागा नसल्यानं डॉ. आंबेडकरांनी त्यांना मांडीवर बसवलं. शेजारी माई आंबेडकर.

फोटो स्रोत, OTHER
औरंगाबाद बार असोसिएशननं डॉ. आंबेडकर यांना आमंत्रित केलं होतं. (28 जलै 1950)

फोटो स्रोत, OTHER
विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलल्या विद्यार्थी संसदेत हिंदू कोड बिलाच्या समर्थनात भाषण केलं होतं. (11 जून, 1950)

फोटो स्रोत, OTHER
अखिल भारतीय दलित फेडरेशनचे निवडणूक घोषणापत्र. (1946)

फोटो स्रोत, OTHER
चक्रवर्ती सी. गोपालचारी यांची भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलपदी निवड झाल्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्नेहभोजन ठेवलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नेहरू यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि इतर मंत्री. (जून 1948)

फोटो स्रोत, OTHER
30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली. हे समजताच, डॉ. आंबेकडरांनी बिर्ला हाऊसकडे लगेचच धाव घेतली. त्यावेळी काँग्रेसचे नेते शंकरदेव यांच्याशी चर्चा करताना.

फोटो स्रोत, OTHER
डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी.

फोटो स्रोत, OTHER
स्वतंत्र मजूर पक्षाच्यावतीनं डॉ. आंबेडकर यांनी मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळची निवडणूक पत्रिका. डॉ. आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह 'माणूस' होतं.

फोटो स्रोत, OTHER
कामगार मंत्री झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीत जाऊन आभार व्यक्त केले होते. (9 डिसेंबर 1943)
सर्व छायाचित्रं दीक्षाभूमी नागपूर आणि लोकवाड्.मय प्रकाशन यांच्या सौजन्यानं प्रकाशित केली आहेत.
तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








