पाकिस्तान: 'कोअर कमांडरचा मोर, तो चोरणार चोर आणि जाळपोळ’

फोटो स्रोत, social media
- Author, मोहम्मद हनीफ
- Role, पत्रकार आणि विश्लेषक
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. काही समर्थकांनी लाहोरच्या कोअर कमांडरच्या घरात घुसून अनेक वस्तू लुटल्या.
मात्र एका आंदोलकाने कमांडरच्या घरात घुसून मोर चोरला. याचे अनेक व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते.
त्या चोराला हवं असतं तर त्याने कोअर कमांडरच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या असत्या. भिंतीवर टांगलेलं घड्याळ, छतावर लावलेलं झुंबर, किचनमध्ये पडलेला डिनर सेट नेला असता. फ्रिजमध्ये ठेवलेला कोर्मा किंवा थंड स्ट्रॉबेरीही तो खाऊ शकला असता.
सोफ्याच्या डिझायनर कुशन, भिंतींवरची महागडी पेंटिंग, तलवारी, कमांडरच्या घरात भिंतीवर सजवलेल्या बंदुका नेऊ शकला असता.
पैसे, महागडे परफ्यूम, फुलदाण्या, क्रिस्टल अॅशट्रे, रेशमी पडदे, टेबल लॅम्प, ऐतिहासिक प्रसंगांची आठवण करून देणारे फोटो अशा कित्येक गोष्टी त्याला चोरता आल्या असत्या.
पण या सर्वच्या सर्व गोष्टी त्याने कोअर कमांडरच्या घराच्या अंगणात ठेऊन दिल्या. त्याऐवजी त्याने मोर उचलला. सगळं सामान जसंच्या तसं सोडून त्याने आपल्यासोबत मोर घेतला.
एका कॅमेरामनने मोर चोरणाऱ्या त्या व्यक्तीला विचारलं, 'हे तू काय करतोयस?' त्यावर अगदी शांतपणे तो म्हणाला, 'त्यांनी आमची संपत्ती चोरली होती, ती परत घेऊन चाललोय.'
पाकिस्तानच्या इतिहासात आजवर असं कधीच घडलं नसल्याचं लोकांचं म्हणणं होतं. म्हणजे वृत्तपत्रात ठळकपणे छापून येतील अशा कित्येक घटना पाकिस्तानच्या इतिहासात घडल्या आहेत.
जसं की, इथले पंतप्रधान तुरुंगात येऊन जाऊन असतात, कधी पंतप्रधानांना फाशी होते, तर कधी नेते शहीद होतात तर कधी याच नेत्यांना आपल्या देशातून परागंदा व्हावं लागतं.
आज या देशातील कित्येक राजकारणी तुरुंगात खितपत पडलेत, पण कोणत्याही न्यायाधीशाने त्यांना त्यांचा गुन्हाच विचारलेला नाही.
पण इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी पाकिस्तानच्या कोअर कमांडरचं घर आतून कसं दिसतं ते पाहिलंय. त्यांच्या घरात लावलेले फोटो, स्विमिंग पूल, बाग सगळ्या गोष्टी त्यांना पाहता आल्या.
हे एकेकाळी देशाचे कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना यांचं घर होतं. त्यामुळे याला 'जिना हाऊस' असंही म्हटलं जायचं. लोकांना हे देखील आत गेल्यावर कळलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
जमात-ए-इस्लामी, तहरीक-ए-लब्बैक आणि मुस्लिम लीग हे सगळेच्या सगळे स्वतःला कायद-ए-आझमचे खरे वारस असल्याचं सांगतात.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की, ते द्वितीय कायद-ए-आझम असल्यासारखेच आहेत. पण खरा वारस तोच असतो ज्याला कायद-ए-आझम नंतर त्याची संपत्ती मिळते.
मोराची चोरी करणाऱ्याला हीच संपत्ती मिळाली. त्यामुळे कायदे आझम यांचा खरा वारस कोण याबाबत कुणालाही शंका नसावी. लाहोरचे कोअर कमांडर मात्र कायदे आझम यांनी विकत घेतलेल्या घरात राहतात.
लाहोरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाहबाज शरीफ बसलेले असोत किंवा चौधरी, बुजदार असोत लाहोरचे खरे बादशाह तर कोअर कमांडरच आहेत. म्हणूनच त्याच्या घराच्या भव्यतेवर आणि समृद्धीवर शंका घेता कामा नये.
पण या दयाळू राजाला स्वतःचं घर वाचवता आलं नाही. आपल्या लाडक्या मोराला चोरांच्या स्वाधीन करणारा हा राजा निर्दयी कसा असेल? असे प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत.
श्रीमंत आणि जिज्ञासू लोक आपल्या घरी मोर पाळतात. या लोकांच्या घरासमोर मोठमोठ्या बागा असतात. या बागांमध्ये मोरांना फिरताना पाहून त्यांना ते छोटे मोठे मुघल सम्राट असल्यासारखं वाटतं.
कुत्रा, मांजरी सारखे पाळीव प्राणी आपलं शेपूट हलवून मुलांबरोबर खेळतात. पण मोर तसा नसतो, तो लोकांपासून लांब लांब पळतो. तो म्हणतो, 'माझ्याकडे बघा मी किती सुंदर आहे.' मोर चांगल्या मानसिक अवस्थेत असला की आपले पंख पसरून आकाश व्यापतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कोअर कमांडरच्या घरचा मोर पळवून नेणारा चोर शांत स्वभावाचा होता. जर कधी घरात आग लागली असती, घराची तोडफोड झाली असती, लोकांनी येऊन घोषणाबाजी केली असती तर कदाचित मोर पण असंच बोलायला शिकला असता. पण कमांडरच्या घराच्या बागेत मोरानं हे सगळं कधी ऐकलंच नाही.
त्यामुळे ज्याने मोराची चोरी केली तो स्वतःला मोराला कैदेतून सोडवणारा देवदूत समजत असावा. चेहऱ्यावर मास्क घातलेला हा चोर सरळ आणि जबाबदार दिसतो. तो एक मोठ्या मनाचा माणूस असावा ज्याने एवढ्या मोठ्या महालात शिरून फक्त एक मोर घेतला आणि निघाला.
सध्या पाकिस्तानच्या न्यायालयात हजारो भ्रष्टाचाराचे खटले सुरू आहेत. कोअर कमांडरच्या घरात घुसून गोंधळ घालणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं जातंय. पण हे लोक क्रांती घडवण्यासाठी गेले होते.
बलुच आणि सिंधी लोक कधीच करू शकले नाही ते लाहोरवासियांनी करून दाखवलंय, त्यामुळे त्यांची स्तुती केली जात आहे.
तर एखाद्या बिगर पंजाब्याने असं केलं असतं तर रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला असता असं म्हणत काहीजण लाहोरवासियांनी टोमणे देखील मारत आहेत.

फोटो स्रोत, social media
पण या सगळ्या चर्चेत मला चिंता वाटते ती मोर आणि मोराच्या चोराची. नव्या घरात मोराला खायला अन्न मिळेल का? तो एवढ्या छोट्या घरात आरामात राहील का? कारण नवं घर नक्कीच कमांडरच्या घरापेक्षा लहान असेल. त्यामुळे मला मोराची जास्त काळजी वाटते.
जळत्या घरातून एका प्राण्याला वाचवल्याबद्दल त्या चोराचं कौतुक केलं पाहिजे. पण आता पोलिस त्याच्या मागावर आहेत. मला वाटतंय की, या चोराला पोलीस स्टेशन माहीत नसावं, त्याने ते कधी पाहिलंही नसावं. आता पोलिसांबद्दल सांगायचं तर ते मोराचा शोध घेत आहेत. पण आता या चोराचं भविष्य काय असेल?
पाकिस्तानमध्ये कोणाला इम्रान खान यांच्या जीवाची चिंता आहे तर कोणाला सरकारच्या भवितव्याची. तर काहींना कमांडरच्या जळलेल्या घराची काळजी आहे.
पण मला काळजी वाटते ती मोर आणि चोराची. या दोघांनीही आमच्या जळणाऱ्या घरात आशेचा किरण दाखवला आहे.
देशात क्रांती आणायची असेल तर आणा, निवडणुका घ्यायच्या असतील तर घ्या, पण मोर आणि त्याच्या चोराला एकटं पडू देऊ नका.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








