ऑस्कर पुरस्कार : 'अनोरा' ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

2025 च्या ऑस्कर पुरस्कारांचे सध्या लॉस एंजेलिसमध्ये वितरण आज झाले. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सेक्स वर्करच्या कथेवर आधारित 'अनोरा' हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

चित्रपटातील अभिनेत्री मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेता अ‍ॅड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.

अनोरा चित्रपटाला आतापर्यंत पाच श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील समाविष्ट आहे.

शॉन बेकरला 'अनोरा'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे, तसेच सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कारदेखील या चित्रपटाने पटकावला आहे.

'द ब्रुटलिस्ट' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मूळ संगीत आणि सर्वोत्कृष्ट छायांकनासाठीही ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात 'द ब्रुटलिस्ट' ला तीन, 'विकेड' ला दोन, 'एमिलिया पेरेझ' ला दोन आणि 'ड्यून: पार्ट टू' ला दोन पुरस्कार मिळाले आहेत.

तर, ब्राझीलच्या 'आय ॲम स्टिल हिअर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

हा चित्रपट ब्राझीलच्या राजकारणी रूबेन्स पाइवा यांच्या रहस्यमरित्या बेपत्ता होण्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पुरस्काराची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

या सोहळ्यात 'ड्यून: पार्ट टू' ला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि दुसरा सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी मिळाला आहे.

'ड्यून: पार्ट टू' हा चित्रपट फ्रँक हर्बर्ट यांची प्रसिद्ध कादंबरी 'ड्यून'वर आधारित आहे. या चित्रपटाला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.

झोई सल्डानाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेत्री झोई सल्डानाचा हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे. तिला 'एमिलिया पेरेझ' या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर झोई सल्डाना भावूक झाली होती.

झोई म्हणाली, "मी डोमिनिकन वंशाची पहिली अमेरिकन आहे, जिला हा पुरस्कार मिळाला आहे आणि मला विश्वास आहे की हा पुरस्कार जिंकणारी मी शेवटची व्यक्ती नसेन."

इतर कोणाला मिळाले पुरस्कार?

या वर्षीच्या 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'अनोरा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच, पॉल टाझवेल यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा (Best Costume Design) ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे. या श्रेणीत एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, इराणी चित्रपट निर्माते हुसेन मोलेमी आणि शिरीन सोहानी यांना 'द शॅडो ऑफ द सायप्रस' या ॲनिमेटेड लघुपटाच्या श्रेणीतील (Best Animated Short Film) ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

तर लॅटेव्हियन चित्रपट 'फ्लो' ला सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशन (Best Animation) या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. विशेष म्हणजे लॅटव्हियन चित्रपटाला ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाहा संपूर्ण नामांकनाची यादी –

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture)

  • अनोरा ( विजेता)
  • द ब्रुटलिस्ट
  • ए कम्प्लिट अननोन
  • कॉन्क्लेव्ह
  • ड्यून : पार्ट टू
  • एमिलिया पेरेझ
  • आय एम स्टिल हिअर
  • निकेल बॉईज
  • द सबस्टान्स
  • विकेड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • मिकी मॅडिसन - अनोरा ( विजेती)
  • सिंथिया एरिव्हो - विकेड
  • कार्ला सोफिया गॅस्कॉन - एमिलिया पेरेझ
  • डेमी मूर - द सबस्टन्स
  • फर्नांडा टोरेस - आय एम स्टिल हिअर

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor)

  • अ‍ॅड्रियन ब्रॉडी – द ब्रुटलिस्ट ( विजेता)
  • टिमोथी चालमेट – अ कम्प्लिट अननोन
  • कोलमन डोमिंगो – सिंग सिंग
  • राल्फ फायन्स - कॉनक्लेव्ह
  • सेबॅस्टियन स्टॅन – दि अप्रेंटिस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Best Supporting Actress)

  • झोई सल्डाना – एमिलिया पेरेझ ( विजेती)
  • मोनिका बार्बारो - अ कम्प्लिट अननोन
  • एरियाना ग्रांडे - विकेड
  • फेलिसिटी जोन्स – दि ब्रुटलिस्ट
  • इसाबेला रोझेलिनी - कॉनक्लेव्ह

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (Best supporting actor)

  • किरन कल्किन – अ रिअल पेन ( विजेता)
  • युरा बोरिसोव्ह - अनोरा
  • एडवर्ड नॉर्टन – अ कम्प्लिट अननोन
  • गाय पियर्स – द ब्रुटलिस्ट
  • जेरेमी स्ट्रॉंग - दि अप्रेंटिस

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best director)

  • शॉन बेकर - अनोरा (विजेता)
  • जॅक ऑडियार्ड - एमिलिया पेरेझ
  • ब्रॅडी कॉर्बेट - द ब्रुटलिस्ट
  • कोरली फारगेट - द सबस्टन्स
  • जेम्स मॅंगोल्ड - अ कम्प्लिट अननोन

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट (Best international feature)

  • आय एम स्टिल हिअर - ब्राझील (विजेता)
  • द गर्ल विथ द नीडल - डेन्मार्क
  • एमिलिया पेरेझ - फ्रान्स
  • द सिड ऑफ सेक्रेड फिग - जर्मनी
  • फ्लो – लॅटव्हिया

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म (Best animated feature)

विजेता: फ्लो

नामांकने :

  • इनसाइड आऊट
  • मेमोइर ऑफ अ स्नेल
  • वॉलेस आणि ग्रोमिट: व्हेंजन्स मोस्ट फॉल
  • द वाइल्ड रोबोट

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (Best original screenplay)

विजेता: अनोरा - शॉन बेकर

नामांकने :

  • द ब्रुटलिस्ट - ब्रॅडी कॉर्बेट आणि मोना फास्टवोल्ड
  • द रिअल पेन - जेसी आयझेनबर्ग
  • सप्टेंबर 5 - मोरिट्झ बाइंडर, टिम फेहलबॉम, अ‍ॅलेक्स डेव्हिड
  • द सबस्टन्स - कोराली फारगेट

सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा (Best adapted screenplay)

विजेता: कॉन्क्लेव्ह - पीटर स्ट्रॉघन

नामांकने :

  • अ कम्प्लिट अननोन - जे कॉक्स आणि जेम्स मॅनगोल्ड
  • एमिलिया पेरेझ - जॅक ऑडियार्ड
  • निकेल बॉईज - रॅमेल रॉस आणि जोस्लिन बार्न्स
  • गा गा - क्लिंट बेंटले आणि ग्रेग क्वेडार

सर्वोत्कृष्ट गाणे (Best original song)

विजेता: एल माल - एमिलिया पेरेझ

नामांकने :

  • नेव्हर टू लेट - एल्टन जॉन: नेव्हर टू लेट
  • मि कॅमिनो - एमिलिया पेरेझ
  • लाईक अ बर्ड – सिंग सिंग
  • द जर्नी - द सिक्स ट्रिपल एट

सर्वोत्तम ओरिजनल स्कोअर (Best original score)

  • विजेता: द ब्रुटलिस्ट

नामांकने :

  • कॉन्क्लेव्ह
  • एमिलिया पेरेझ
  • विकेड
  • द वाइल्ड रोबोट

सर्वोत्कृष्ट माहितीपट (Best documentary feature)

विजेता: नो अदर लँड

नामांकने :

  • ब्लॅक बॉक्स डायरीज
  • पोर्सिलेन युद्ध
  • साउंडट्रॅक टू अ कूप डी'टॅट
  • शुगरकेन

सर्वोत्तम वेशभूषा डिझाइन (Best costume design)

विजेता: विकेड

नामांकने :

  • नोस्फेराटू
  • अ कम्प्लिट अननोन
  • कॉन्क्लेव्ह
  • ग्लॅडिएटर 2

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलिंग (Best Make-up and Hair styling)

विजेता : द सबस्टान्स - पीयरे ऑलिव्हर पर्सिन, स्टेफनी गुलियन आणि मेरिलिन स्कार्सेली

नामांकने :

  • अ डिफ्रंट मॅन
  • एमिलिया पेरेझ
  • नोस्फेराटू
  • विकेड

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन (Best Production Design)

विजेता: विक्ड

नामांकने :

  • द ब्रुटलिस्ट
  • ड्यून: पार्ट टू
  • नोस्फेराटू
  • कॉन्क्लेव्ह

सर्वोत्कृष्ट ध्वनी (Best Sound)

विजेता: ड्यून: पार्ट टू

नामांकने :

  • अ कम्प्लिट अननोन
  • एमिलिया पेरेझ
  • विकेड
  • द वाइल्ड रोबोट

सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन (Best Film Editing)

विजेता: अनोरा

नामांकने :

  • द ब्रुटलिस्ट
  • कॉन्क्लेव्ह
  • एमिलिया पेरेझ
  • विकेड

सर्वोत्कृष्ट छायांकन (Best Cinematography)

विजेता: द ब्रुटलिस्ट

नामांकने :

  • ड्यून: पार्ट टू
  • एमिलिया पेरेझ
  • मारिया
  • नोस्फेराटू

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स (Best Visual Effects)

विजेता: ड्यून: पार्ट टू

नामांकने :

  • एलियन: रोम्युलस
  • बेटर मॅन
  • किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स
  • विकेड

सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट (Best Live Action Short)

विजेता: आय ॲम नॉट अ रोबोट

नामांकने :

  • अनुजा
  • द लास्ट रेंजर
  • ए लीन
  • द मॅन व्हू कुड नॉट रिमेन सायलेंट

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड लघुपट (Best Animated Short)

विजेता: इन द शॅडो ऑफ द सायप्रस

नामांकने :

  • ब्युटिफुल मेन
  • मॅजिक कँडिस
  • वॅन्डर टू वॉन्डर
  • यक!

सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट फिल्म (Best Documentary Short)

विजेता: द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा

नामांकने :

  • डेथ बाय नंबर्स
  • आय ॲम रेडी, वॉर्डन
  • इन्सिडेन्ट
  • इंस्ट्रुमेंट्स ऑफ अ बिटिंग हार्ट

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.