You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर, मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...
1. कर्नाटकच्या निवडणुकांचा भारतीय राजकारणावर काय परिणाम होईल?
कर्नाटकच्या निवडणुकीतल्या पराभव किंवा विजयाचा भाजपपेक्षा काँग्रेस पक्षावर राष्ट्रीय पातळीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
याचा अर्थ भाजपासाठी ही निवडणूक आव्हानात्मक नाही असा त्याचा अर्थ होत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
भारतातील आघाडीचे निवडणूक विश्लेषक संजय कुमार आणि योगेंद्र यादव यांच्या मते कर्नाटक निवडणुकीतील विजय हा काँग्रेससाठी मोठी संजीवनी असेल.
2. शाहू महाराजांच्या काळात घडलेले वेदोक्त प्रकरण काय होते?
वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द महाराष्ट्रात अनेकदा कानावर पडतात. सध्या त्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. बहुतांश लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण यांचा संदर्भ ऐकून माहिती असतो.
वेदोक्त प्रकरणामुळे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय मन ढवळून निघाले होते. यावर दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप होत राहिले होते.
त्यांच्याबाबतीत घडलेले हे वेदोक्त प्रकरण काय आहे, याचा थोडक्यात आढावा तुम्ही इथं वाचू शकता.
3. एकेकाळी ‘हमालांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारं रुई आता देतंय इतर लोकांना रोजगार
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रुई गावाला आता महाराष्ट्रातलं ‘रेशीम हब’ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. कारण, रुई गावात तब्बल1200 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आलीय.
गावात प्रवेश करताना रेशीम शेतीसाठी उभारण्यात आलेले शेड तुम्हाला सगळीकडे दिसतील.
पाण्याचा कुठलाही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे 2010 पर्यंत इथले शेतकरी कापूस हेच मुख्य पीक घेत होते. आता मात्र त्यात अमुलाग्रह बदल झाला आहे. वाचा या गावाची ही यशोगाथा.
4. महाराष्ट्रासह देशातल्या 70 कोटी लोकांच्या डेटाची चोरी
देशातील 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेल्याची माहिती उघड झाली आहे. 24 राज्यं आणि देशातील 8 महानगरांमधल्या लोकांचा डेटा हा सायबर गुन्हेगारांनी चोरला असल्याचं समोर आलं आहे.
तुम्हाला जर का टेलीमार्केटींगवाल्यांचे सतत फोन येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
5. बद्धकोष्ठता म्हणजे काय? पोट साफ राहाण्यासाठी काय करावं?
बद्धकोष्ठता किंवा ज्याला इंग्रजीत Constipation कॉन्स्टिपेशन म्हणतात, हे शब्द आपल्या कानावरुन गेले नाहीत असं होणारच नाही.
रोजचा शरीर-मनाचा क्रम सुरळीत राहाण्यासाठी पोट साफ होणं, भूक लागणं, नीट आणि पुरेशी झोप येणं या क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)