चंद्रयान-3 ने शोधलेल्या 'या' गोष्टी ठरू शकतात भारतासाठी महत्त्वाच्या

इस्रो, चंद्रयान

फोटो स्रोत, ISRO

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, दिल्ली

गेल्या महिन्यात, भारतानं इतिहास घडवला जेव्हा चंद्र मोहिमेवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला.

चंद्रयान-3 चं विक्रम आणि प्रज्ञान नावाचं लँडर आणि रोव्हर यांनी या प्रदेशात सुमारे 10 दिवस घालवले, डेटा आणि छायाचित्र एकत्र करून विश्लेषणासाठी पृथ्वीवर परत पाठवलं.

चंद्रावर सूर्य मावळू लागला की कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी, लँडर-रोव्हरला त्यांच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

इस्रोनं सांगितलं की चंद्रावर दिवस उजाडल्यावर ते 22 सप्टेंबरच्या सुमारास लँडर-रोव्हर पुन्हा जागृत होतील अशी आशा आहे.

लँडर आणि रोव्हरच्या हालचाली तसंच निष्कर्ष आणि त्यांनी घेतलेली छायाचित्र इस्रोनं प्रसिद्ध केली आहेत.

या अद्ययावत माहितीमुळं अनेक भारतीयांना उत्साहित केलं आहे, परंतु इतर लोक या शोधांचं महत्त्व विचारत आहेत.

बीबीसीनं नासाच्या माजी शास्त्रज्ञ आणि दिल्लीस्थित स्पेस एज्युकेशन कंपनी स्टेम अँड स्पेसच्या सह-संस्थापक मिला मित्रा यांना चांद्रयान-3 चे काही प्रमुख निष्कर्ष निवडण्यास आणि त्यांचं महत्त्व स्पष्ट करण्यास सांगितलं.

अंतर कापलं आणि खड्डे टाळले

इस्रोनं सांगितलं की, चंद्रावर अंधार पडण्याआधी प्रज्ञान रोव्हरनं 2 सप्टेंबरच्या काही तास आधी, 100 मीटर [328 फूट] पेक्षा जास्त अंतर पार केलं आहे आणि ते सुरूच आहे".

सहा-चाकांच्या रोव्हरसाठी खूप लांबचा प्रवास आहे, जे प्रति सेकंद एक सेंटीमीटर (1cm) च्या वेगानं फिरतं.

मित्रा सांगतात की, सुरक्षित राहणं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात असलेल्या विवरांमध्ये न पडता पुढे जाणं हेदेखील महत्त्वाचं आहे.

चंद्रयान 3

फोटो स्रोत, ISRO

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या म्हणतात की, रोव्हरमध्ये एक विशेष चाक यंत्रणा आहे. ज्याला 'रॉकर बोगी' म्हणतात. याचा अर्थ असा आहे की, त्याची सर्व चाकं एकत्र फिरत नाहीत, ज्यामुळं ते वर आणि खाली जाण्यास मदत होते, परंतु जर रोव्हर विवर किंवा खोल खडड्यात पडलं तर ते बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळं खोल खड्डा किंवा विवर दिसल्यास त्याला वळसा घालून पुढे जाणं किंवा माघारी फिरणं हा पर्याय आहे.

मित्रा या पुढे सांगतात की, कमांड सेंटरमधील शास्त्रज्ञ हे रोव्हरच्या डोळ्यांनी चंद्र पाहत आहेत. रोव्हर स्वयंचलित नाही आणि त्याच्या हालचाली कमांड सेंटरमधून नियंत्रित केल्या जातात. जे रोव्हरनं पाठवलेल्या चित्रांच्या आधारावर कार्य करतात.

"त्यांनी घेतलेल्या प्रदक्षिणा मार्गामुळे कमांड सेंटर पर्यंत माहिती पोहोचण्यास थोडा विलंब झाला आहे. प्रज्ञान रोव्हर माहिती लँडरकडे पाठवतो आणि लँडरकडून ती माहिती ऑर्बिटरकडे जाते आणि मग ती पृथ्वीवर पाठवली जाते."

कमांड रोव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत ते विवराच्या काही पावलं जवळ आलं होतं.

पण चंद्रावरील दोन विवरांच्या आसपास सुरक्षितपणे मार्ग शोधण्यास ते यशस्वी झालं आहे. यावरून असं स्पष्ट होतं की ते कमांड सेंटरशी त्वरीत संवाद साधण्यास सक्षम आहेत, असं मित्रा सांगतात.

चंद्राच्या तापमानातील फरक

विक्रम लँडरच्या ऑनबोर्ड प्रोबमधून चंद्रावरील माती आणि पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी (4 इंच) खोलीपर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या पहिल्या संचानं पृष्ठभागाच्या अगदी वर आणि खाली तापमानात तीव्र फरक दर्शविला.

पृष्ठभागावरील तापमान जवळजवळ 60 सेल्सिअस (60 C) असताना, ते पृष्ठभागाच्या खाली झपाट्यानं घसरलं, ते जमिनीच्या खाली 80 मिली मीटर (80mm) (सुमारे 3 इंच) उणे 10 सेल्सिअस (-10C) पर्यंत खाली घसरलं.

चंद्रावरील तापामान हे कमालीचं विषम असतं - नासाच्या मते, चंद्राच्या विषुववृत्ताजवळ दिवसाचं तापमान उकळत्या 120 सेल्सिअस (120C) पर्यंत पोहोचतं, तर रात्रीचं तापमान उणे 130 सेल्सिअस (-130C ) पर्यंत खाली जाऊ शकतं. आणि उणे 250 सेल्सिअस (-250C) तापमान हे खड्डे आणि विवरामध्ये नोंदवलं गेलं आहे. ज्यांना कधीही सूर्यप्रकाश मिळत नाही आणि ते कायमचं सावलीत राहतात असा हा प्रदेश आहे .

चंद्रयान

फोटो स्रोत, ISRO

परंतु, मित्रा सांगतात, “ तापमानातील ही तफावत लक्षणीय आहे कारण ती दर्शवते की चंद्राची माती - ज्याला चंद्राचा ‘रेगोलिथ’ म्हणतात. जो एक अतिशय चांगला विद्युतरोधक आहे.

“ याचा वापर उष्णता, थंडी आणि किरणोत्सर्गाला बाहेर ठेवण्यासाठी अवकाश वसाहती तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळं ते निवासस्थानासाठी एक नैसर्गिक विद्युतरोधक बनवेल," असं त्या सांगतात

हे पृष्ठभागाच्या खाली पाण्याच्या बर्फाच्या उपस्थितीचं दिशादर्शक देखील असू शकतं.

चंद्राच्या उत्क्रांतीचं गूढ उकलणार

रोव्हरवर बसवलेल्या लेझर डिटेक्टरनं दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचं मोजमाप केलं तेव्हा त्यात अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन यांसारखी रसायनं आढळली.

परंतु सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष, शास्त्रज्ञ म्हणतात, सल्फरशी संबंधित आहे. इन्स्ट्रुमेंटनं पहिल्यांदा मोजमाप केलं आणि सल्फर आढळल्याला दुजोरा दिलाय, असं इस्रोनं सांगितलं.

चंद्रावर सल्फरची उपस्थिती 1970 पासून ज्ञात आहे, परंतु शास्त्रज्ञ म्हणतात की रोव्हरनं चंद्राच्या पृष्ठभागावरच सल्फर मोजलं आहे आणि ते खनिज किंवा स्फटीकाचा भाग म्हणून नाही. हे ‘एक मोठ यश आहे’

मित्रा म्हणतात की, जमिनीत सल्फरची उपस्थिती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.

"सल्फर सामान्यत: ज्वालामुखीतून येतो त्यामुळे चंद्र कसा तयार झाला, तो कसा विकसित झाला आणि त्याचा भूगोल याबद्दल आपल्या ज्ञानात भर पडेल.”

"हे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या बर्फाची उपस्थिती देखील सूचित करतं आणि सल्फर हे एक चांगलं खत असल्यानं, ही चांगली बातमी आहे कारण चंद्रावर निवासस्थान केल्यास ते वनस्पती वाढविण्यात मदत करू शकते."

खरोखर तो 'चंद्रावरील भूकंप' होता का?

नासा

फोटो स्रोत, NASA

विक्रम लँडरमध्ये एक साधन आहे जे त्याच्या स्वत: च्या अभ्यासातून आणि प्रयोगांमधून तसंच रोव्हर आणि त्याच्या हालचालींमधून उद्भवणारी कंपन मोजतात.

इस्रोनं सांगितलं की इंस्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी (इलसा) जमिनीवरुन, त्यांना "एक घटना, नैसर्गिक झाल्याचं दिसलं" आणि त्याच्या स्त्रोताची तपासणी देखील केली.

हा इव्हेंट खूप महत्त्वाचा होता , मित्रा या सांगतात , यासाठी अनेक स्पष्टीकरणं असू शकतात.

"तो अंतराळातील ढिगारा असू शकतो, जसं की उल्का किंवा लघुग्रह हे पृष्ठभागावर आदळतात. किंवा तो भूकंप ही असू शकतो. तो 1970 च्या दशकानंतर नोंदलेला पहिला 'चंद्रकंप' ठरेल. अशा परिस्थितीत, यामुळं चंद्राचा पृष्ठभागाखाली काय आहे आणि त्याचा भूगोल काय आहे याचं स्पष्टीकरण मिळू शकतं.

चंद्र प्लाझ्मा म्हणजे काय?

जेव्हा इस्रोनं X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केलं की लँडरवरील तपासणीनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाच्या "पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरणाचं पहिलं मोजमाप" केलं आहे आणि ते "तुलनेनं विरळ" असल्याचं आढळलं, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. पण त्यांना प्रश्न पडला की चंद्र प्लाझ्मा म्हणजे काय?

मित्रा स्पष्ट करतात की, प्लाझ्मा वातावरणातील चार्ज कणांच्या उपस्थिती ही, चंद्रयान-3 वापरत असलेल्या रेडिओ-वेव्ह संप्रेषणात अडथळा आणू शकतात.

" हा चंद्र प्लाज्मा खूप विरळ किंवा पातळ आहे, ही चांगली बातमी आहे कारण याचा अर्थ ते रेडिओ संप्रेषणात खूप कमी व्यत्यय आणेल."

जेव्हा लँडरनं दिलेल्या आदेश पाळला

सप्टेंबरच्या सुरुवातीला विक्रम लँडरन झोपी जाण्यापूर्वी शेवटची गोष्ट केली , इस्रोनं याला " हॉप प्रयोग" असं म्हटलं.

एजन्सीनं सांगितलं की, लँडरला "त्याचं इंजिन फायर करण्याचा आदेश देण्यात आला होता, तो सुमारे 40 सेमी [16 इंच] वर उडाला आला आणि 30-40 सेमी अंतरावर उतरला."

हा यशस्वी प्रयोग म्हणजे भविष्यात यानाचा वापर पृथ्वीवर नमुने परत आणण्यासाठी किंवा मानवी मोहिमांसाठी केला जाऊ शकतो, असंही त्या पुढे सांगताता.

आता, या ‘शॉर्ट हॉप’चा अर्थ भारताच्या भविष्यातील अंतराळ योजनांसाठी एक मोठी झेप ठरू शकेल का?

मित्रा सांगतात हॉपनं चंद्र लँडिंगनंतर इंजिन रीस्टार्ट करून ते अद्याप चांगलं चालत असल्याची खात्री करण्यासाठी चाचणी केली".

त्या सांगतात की, “ यानात चंद्राच्या मातीच्या वातावरणात लिफ्ट-ऑफ करण्याची क्षमता आहे, हे देखील दाखवून दिलं आहे. कारण आतापर्यंत चाचणी आणि वास्तविक लिफ्ट-ऑफ फक्त पृथ्वीवरूनच झालं आहे.”

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)