खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं... AI मानवजातीच्या मुळावर उठेल का?

बोरीस यांचा विजेता फोटो जो खरा नव्हता.

फोटो स्रोत, BORIS ELDAGSEN

फोटो कॅप्शन, बोरीस यांचा विजेता फोटो जो खरा नव्हता
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

तुम्हाला वर दिसत असलेल्या या फोटोला नुकताच सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार जाहीर झाला.

पण ज्याने तो फोटो काढला होता, त्या बोरीस एल्डागसेन नावाच्या छायाचित्रकाराने तो नाकारला, हे म्हणत की तो त्यांनी काढलाच नाहीय. हो. हा एक AI-generated photo होता, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बनवलेला. बोरीस म्हणाले की ते या फोटोग्राफी पुरस्कारांच्या परीक्षकांची परीक्षा घेत होते.

पण AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का, की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का? समजून घेऊ या.

जॉफरी हिंटन – यांना AIचे जनक मानलं जातं. आणि त्यांनी 1 मे ला गुगलमधून राजीनामा देताना म्हटलंय की त्यांना खंत वाटते की त्यांनी ही Artificial Intelligence technology विकसित केलीय.

पण असं ते का म्हणालेत?

बीबीसी न्यूजशी बोलताना ते सांगतात, “आपल्यापुढे एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. हे तंत्रज्ञान आपल्यापेक्षा जास्त हुशार होत जाईल. जशी कृत्रिम बुद्धिमत्ता आपण विकसित करतोय, ती आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी आहे.

"यातला मूळ फरक म्हणजे, डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकाच वेळी अनेक प्रती असू शकतात, आणि त्या त्यांनी मिळवलेलं ज्ञान एकमेकांशी शेअर करू शकतात. म्हणजे कल्पना करा की एका माणसाला कुठली माहिती कळली तर ती तिच्यापर्यंतच राहते.

"पण या तंत्रज्ञानात एका सिस्टमला कुठली माहिती कळली तर ती त्याच क्षणी जगभरातल्या लाखो सिस्टम्सला कळू शकते. त्यामुळे या सिस्टिम्स नक्कीच कुठल्याही माणसापेक्षा जास्त हुशार होऊ शकतात.”

त्यांची ही भीती रास्त ठरू शकते, हे आजवर अनेक अहवालांमधून समोर आलं आहे. खरंतर AI किंवा आर्टिफिशल इंटेलिजेन्स हा शब्द आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. मग आता एवढी भीती का व्यक्त होतेय? तर याला कारणीभूत आहे या तंत्रज्ञानाचा पुढचा अवतार – Generative AI (जनरेटिव AI).

AIमुळे आता तुम्हाला चुटकीसरशी एखादं चित्र हव्या त्या शैलीत काढून मिळू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, AIमुळे आता तुम्हाला चुटकीसरशी एखादं चित्र हव्या त्या शैलीत काढून मिळू शकतं.

AIची चर्चा अचानक का वाढलीय?

जनरेटिव्ह AI मध्ये काय बदललंय, तर तुमच्या एका ओळीच्या सूचनेच्या, माहितीच्या आधारे तुम्हाला इंटरनेटवरची अवाढव्य माहिती हवी त्या रूपात मिळू शकते – म्हणजे निबंध, कविता, कोड किंवा एखादं चित्रसुद्धा.

OpenAI या कंपनीने विकसित केलेले ChatGPT आणि Dall-E सारखे तंत्रज्ञान आता जगभरातल्या कोट्यावधी लोकांना सहज उपलब्ध होऊ लागलेत.

आता तर अनेक असे AI टूल्सही आले आहेत, ज्यामुळे कुणाचाही आवाज सहज टेक्स्ट टू ऑडिओमध्ये असा बदलला जाऊ शकतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

त्यामुळेच की काय, सातत्याने असे वृत्त येतायत की AI मुळे, Generative AI मुळे लाखो नोकऱ्या जातील. अशात अनेक जण AIच्या आधारे गोष्टी करू लागलेत, जसं की ऑफिसचे मेल्स पाठवणं, कोडिंग, वेब डेव्हलपमेंट, बिझनेस ॲनलिसिस, एक्सेलमधली आकडेमोड, फोटोशॉप, रिसर पेपर लिहिणं, वगैरे.

पण अशात एक मोठी भीती वर्तवली जातेय ती म्हणजे फेक न्यूजची. ती आता काय आहे?

AIमुळे समाजाला खरंच किती धोका?

ट्रंप यांना अटक होतानाचे हे फोटो खोटे होते

फोटो स्रोत, Truth Social

फोटो कॅप्शन, ट्रंप यांना अटक होतानाचे हे फोटो खोटे होते

काही आठवड्यांपूर्वी मार्च-एप्रिलच्या दरम्यान अमेरिकेच्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झालेत – एका फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अटक होताना दिसतेय, तर दुसऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस व्हाईट हाऊसमध्ये याचबद्दल जल्लोष करताना दिसत आहेत.

हा फोटो खराखुरा वाटत असला तरीही ट्रंप यांच्या मानेजवळ जरा निरखून पाहिल्यावर सत्य उघड होतं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, हा फोटो खराखुरा वाटत असला तरीही ट्रंप यांच्या मानेजवळ जरा निरखून पाहिल्यावर सत्य उघड होतं.

अर्थात हे सगळे फोटो खोटे होते, AI-generated होते, असं सिद्ध झालं. पण अर्थात, यावरून कळतं की येणारा काळ किती धोक्याचा आहे.

हा फोटो खोटा आहे

फोटो स्रोत, Twitter

आधीच आपण दररोज व्हॉट्सॲपवर, फेसबुक, ट्विटरवर फेक न्यूजला बळी पडतोय. कुठला मेसेज, फोटो किंवा व्हीडिओ खरा, कुठला खोटा, हे अजूनही ओळखणं अवघड असताना आता त्याला आणखी एक पदर आल्यामुळे गोष्टी अर्थात किचकट आणि चिंताजनक झाल्या आहेत.

तज्ज्ञांना चिंता आहे की ज्याप्रकारे 2016च्या अमेरिकेच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा गैरवापर आढळून आला होता, तसाच आता येणाऱ्या वर्षात 2024मध्ये अमेरिकेत आणि अगदी भारतातही होऊ शकतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

राजकारणी आता कमी पैशात जास्त लोकांपर्यंत, त्यांच्या सोयीचे संदेश पोहोचवू शकतील, आणि हवा तसा मजकूर तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करून विरोधकांना लक्ष्य करू शकतील, अशी भीती वर्तवली जातेय.

आणि जर कुणाविरुद्ध एखादा फोटो किंवा व्हीडिओ पुरावा असेल, तर ते लगेचच हे म्हणून नाकारू शकतील, की “छे छे! जो दिसतोय, तो मी नव्हेच! हे फेक आहे.”

त्यामुळेच की काय, इटली, रशिया, चीन, इराणसारख्या अनेक देशांनी यावर बंदी घातलीय. आणि मार्चमध्ये जगभरातल्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी, जनकांनी एक खुलं पत्र लिहून आवाहन केलं होतं की काही काळासाठी AIच्या प्रयोगांवर बंदी घालावी.

नाहीतर जशी भीती AIच्या जनकाला, जॉफरी हिंटन यांना आहे, AI माणसापेक्षाही हुशार होऊन जाईल, आणि मग त्याला आटोक्यात आणणं अवघड होऊन बसेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)