पाकिस्तानी मुलगी, भारतीय मुलगा - लुडो गेमची ओळख, प्रेम, लग्न.. शेवटी काय झालं... ?

इकरा आणि मुलायम

फोटो स्रोत, Bengaluru Police

    • Author, अनंत झणाणें आणि इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी आणि बीबीसी सहयोगी प्रतिनिधी

पाकिस्तानमधील हैदराबादच्या 19 वर्षीय इकरा जिवानी आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील 21 वर्षाचा मुलायम सिंह यादव ऑनलाईन ल्युडो खेळता खेळता प्रेमात पडले. ते वर्षं होतं 2020.

इकरा नेपाळहून बेकायदेशीर मार्गाने भारतात पोहोचली. दोघांनी लग्न केलं आणि के बंगळुरूत रहायला लागले.

पोलिसांना तिच्या एका व्हॉट्सअप कॉल्सवर संशय आला, कारण ते पाकिस्तानशी निगडीत होते.

मुलायला पोलिसांनी अटक करून त्याला तुरुंगात पाठवलं आहे.

मात्र मुलायम सिंह यादवचं कुटुंब आता सरकारकडे त्यांच्या घरची सून परत आणण्यासाठी आणि मुलाच्या सुटकेसाठी खेटे घालत आहेत.

इकरा आणि मुलायम यांच्या प्रेमाची, लग्नाची आणि पुन्हा एकदा विरहाची कहाणी.

ल्युडो खेळता खेळता पडले प्रेमात...

इकरा आणि मुलायम

फोटो स्रोत, Jeetalal Yadav

यावर्षी 19 फेब्रुवारीला इकरा जीवानीला वाघा सीमेवरून पाकिस्तानला पाठवण्यात आलं. तिच्यावर भारतात गैरमार्गाने येण्याचा आरोप होता. तिने प्रयागराज येथील मुलायम सिंह यादवशी लग्न केलं होतं आणि ती त्याच्याबरोबर बंगळुरूत राहत होती.

बंगळुरू पोलीस सुत्रांच्या मते कोव्हिडचा लॉकडाऊन सुरू झाल्यावर 2020 मध्ये मुलायम सिंह यादवने समीर अन्सारी असं नाव लावत इकरा बरोबर ल्युडो खेळायला सुरुवात केली.

तेव्हा ती 19 वर्षांची होती. तेव्हा 21 वर्षांचा असलेला मुलायम बंगळुरूला एका आयटी कंपनीत वॉचमनची नोकरी करत होता.

दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये अडचणी येत होत्या. इकराच्या घरी लग्नासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे इकरा मुलायमच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानहून दुबई वाटे नेपाळला पोहोचली.

पोलिसांचं मत आहे की दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं. सप्टेंबर 2022 मध्ये नेपाळवाटे पाटण्याहून नेपाळला पोहोचले. तिथे तो बेलंदूर पोलीस थाना विभागात रहायला लागले.

पोलिसांच्या मते मुलायम काम करत होता आणि इकरा घरी असायची. मुलायमने इकराचं रिया यादवच्या नावाने खोटं आधार कार्ड तयार केलं.

व्हॉट्स अप कॉलिंगने बोलणं व्हायचं

शांती देवी

फोटो स्रोत, Manavendra Singh

फोटो कॅप्शन, मुलायमची आई, शांतिदेवी

आपल्या कुटुंबापासून दूर राहिलेल्या इकराने व्हॉट्स अप कॉलवर पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये तिच्या आईशी बोलायची.

बंगळुरू पोलिसांनी जी-20 परिषद आणि एअरो शो असल्याने सावधगिरी बाळगली होती आणि त्याचवेळी इकराचे कॉल्स पोलिसांच्या रडारवर आलेत.

त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी इकराचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिची चौकशी केल्यावर हे एक प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं.

चौकशीनंतर 20 जानेवारीला इकराला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसला सुपुर्द करण्यात आलं.

बंगळुरूमधील व्हाईटफील्डचे उपायुक्त एस. गिरीश यांनी बीबीसीला सांगितलं, “देशात बेकायदा पद्धतीने येणाऱ्यांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होत नाही. सध्या चौकशी सुरू आहे.”

एका अन्य पोलीस सूत्रांच्या मते “बेकायदा प्रवेश फसवणूक याशिवाय ही एक प्रेमकहाणीही दिसतेय.”

मुलायम सिंह यादवला फसवणूक, फॉरेनर्स कायदा, आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमाअंतर्गत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून तो सध्या सेंट्रल जेलमध्ये आहे.

सरकारला विनंती

प्रयागराज येथील मकसुदन गावात मुलायमची आई शांती देवी ने बीबीसीला सांगितलं, “आम्हाला असं वाटतं की त्यांना सोडून द्यावं. आम्ही तिला आमची सून करून घेऊ. तिला आनंदात ठेवू. मग ते पाकिस्तानची असो किंवा मुसलमान असो, आम्ही तिला आमची सून करून घेऊ मग ती कोणत्याही जातीची असो. दोघांनी लग्न केलं आहे.

आमच्या मुलाला सरकारने सोडून द्यायला हवं. सरकारच्या मनावर घेतलं तर ते मुलीलाही इथे आणू शकतील.”

पाकिस्तान सरकारला मुलायमची आई म्हणते, “लग्न तर झालं आहे. आता त्या दोघांना घरी पाठवून द्या.”

मुलायमचा भाऊ जीतलाल यादवने बीबीसीला सांगितलं की, मुलायम आणि इकराबाबत 19 जानेवारी च्या पोलीस कारवाईनंतर आम्हाला त्याबदद्ल कळलं.

जीतलाल सांगतो की त्याला वाटतं की मुलायम त्याच्या मित्राबरोबर रहायचा.

‘ती आमची सून झाली तर ती तुमचीही सून आहे'

जीतलाल यादव

फोटो स्रोत, Jeetlal Yadav

जेव्हा जीतलाल यादवला कळलं की इकराला पाकिस्तानला परत पाठवलं आहे तेव्हा तो निराश झाला.

तो सांगतो, “सांगा आता आम्हाला मान सन्मान कसा मिळेल? आम्ही तिला ठेवून घेऊ इच्छितो. आम्हाला भारत पाकिस्तानच्या परिस्थितीची कल्पना आहे पण त्यांचा उद्देश चुकीचा नव्हता. प्रेमच केलं आहे ना एकमेकांवर. माझ्या भावाला हे कळेल तेव्हा त्याची काय परिस्थिती होईल काही सांगता येत नाही.”

जीतलाल यादव यांनी एका वकिलाच्या माध्यमातून जामिनाचा अर्ज दाखल केला आहे.

जीतलाल सांगतात, “चौकशी झाली आहे. त्यानंतर इकराला पाकिस्तानला पाठवण्यात आलं आहे. आता मला सांगा की माझ्या भावाला तुरुंगात का टाकण्यात आलं आहे?”

ते सांगतात, “ती आमची सून आहे याचा अर्थ ती भारताची सून आहेच ना?”

बीबीसीने पाकिस्तानात इकरा आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)