तुम्ही प्रेमात पडलाय की फक्त शारीरिक आकर्षण आहे, हे कसं ओळखाल?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्रेमाचं नाव ऐकताच गुदगुल्या व्हायला लागतात. प्रेमात असल्यास संपूर्ण जग आपल्या मुठीत असल्याचा फील येतो.

आजूबाजूचे लोकही चांगले वाटायला लागतात. मनात तर जणू उकळ्याच फुटायला लागतात.

प्रेमाची भावना व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

पण, आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो, तर आपल्या डोक्यात काय चालू राहतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

तुम्ही खरंच एखाद्याच्या प्रेमात आहात की नुसतेच आकर्षणाचे शिकार आहात? हाही एक मोठा अवघड प्रश्न आहे. प्रेम आणि आकर्षणात काय अंतर असतं? आणि याला कसं ओळखायचं? चला जाणून घेऊया...

प्रेमाचे हे पैलू समजून घ्या

रटगर्स विद्यापीठातील हेलेन ई. फिशर या प्रश्नावर म्हणतात, "रोमँटिक प्रेमाचे तीन पैलू असतात. लैंगिक संबंधांची इच्छा किंवा वासना हा सगळ्यांत आधीचा पैलू असतो. पण नेहमीच असं होत नाही. ज्या लोकांमध्ये लैंगिक इच्छा नसते, त्यांच्या प्रेमात वासना नसूही शकते. पण, वासनेची भावना ही एस्ट्रोजेन आणि टेस्टास्टरोन सारख्या हार्मोनचा खेळ आहे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

हे हार्मोन तुमच्या लैंगिक क्षमता आणि इच्छेवर परिणाम करतात. हे पूर्णपणे शारीरिक असतं. यामुळे लैंगिक संबंध बनवण्याची इच्छा होते. एखाद्या व्यक्तीत हे हार्मोन त्यांच्या आई-वडिलांच्या डीएनएतून येऊ शकतात. आकर्षण नसतं तर पृथ्वीवरील मानवजातीचं अस्तित्व संपुष्टात आलं असतं, असंही तुम्ही म्हणू शकता.

रोमँटिक प्रेमाचा दुसरा पैलू आहे आकर्षण. हे न्यूरोट्रांसमीटरपासून प्रभावित होत असतात. ज्याला डोपामाईन असं म्हणतात. हे आपल्या मेंदूत निर्माण होणारं जैविक रसायन आहे, जे आपल्याला एखाद्या गोष्टीचा लाभ मिळवण्याकरता प्रोत्साहित करत असतं. पण, डोपामाईन आपल्याला वारंवार एकच काम करण्यासाठी प्रवृत्त करत असतं.

प्रेमाचा तिसरा पैलू जवळीकता आणि मैत्री हा आहे. जर तुमचं नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी नात्यामध्ये मैत्री, सहवास आणि जवळीकता या गोष्टी असणं आवश्यक आहे. अशी सोबत असेल त्यावेळी ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन हे हार्मोन्स स्रवतात.

प्रेम हे व्यसन आहे का?

नात्यामध्ये राहण्यासाठी डोपामाईन या हार्मोनचा मोठा वाटा असतो. याच हार्मोनमुळे एखाद्या व्यक्तीप्रती प्रचंड आकर्षणाची भावना निर्माण होते. काही लोक यात अडकतात नव्या रोमँटिक नात्याच्या शोधात राहतात. याचा अर्थ तुम्हाला प्रेमाचं व्यसन लागलं आहे.

मेंदूचा जो भाग तार्किक विचार आणि योग्य व्यवहाराला नियंत्रित करतो, त्याच्यातील संवेदना डोपामाईनमुळे कमी होतात.

या काळात लोक 18 महिन्यांसाठी 'अतार्किक हनिमून पीरियड'मध्ये राहू शकतात. थोडक्यात 18 महिने तुम्ही जोडीदाराच्या चांगल्याच गोष्टी पाहतात. त्यानंतर ओला टॉवेल बेडवर का टाकला इथपासून भांडणं व्हायला लागतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आकर्षणात नोरपाईनफराईन या हार्मोनचीही महत्त्वाची भूमिका असते.

या अवस्थेत शरीराला जी प्रतिक्रिया मिळते, त्यात याची महत्त्वाची भूमिका असते. जे लोक प्रेमात असतील त्यांना यामुळे तळहातावर आलेला घाम, हृदय जोरात धडधडू लागणं आणि श्वास वरखाली होणं असे अनुभव येतात.

तणावाच्या दरम्यान येणारा अनुभव यासारखाच असतो. पण, प्रेमातला हा अनुभव चांगल्या प्रकारचा तणाव असतो.

आकर्षण काय असतं?

आकर्षणात दोन इतर हार्मोनही काम करतात. ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन. ऑक्सिटोसिन आपल्याला आलिंगनासाठी प्रवृत्त करतो.

हा हार्मोन सेक्सच्या दरम्यान निर्माण होतो आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो. सुरक्षा आणि समाधानाच्या अनुभवात यामुळे वाढ होते. यामुळे जोडीदारासोबतचा प्रणय अधिक रोमांचित करण्यास प्रेरणा मिळते.

वेसोप्रेसिन हा हार्मोन मात्र सेक्स केल्यानंतर निर्माण होतो आणि समाधानाची भावना निर्माण करतो.

यामुळे लैंगिक संबंधांची अधिक इच्छा असलेल्या लोकांना हा हार्मोन शिकार बनवू शकतो. कारण, तो या लोकांच्या मेंदूतील त्या भागावर प्रभाव टाकतो, जो भाग सेक्सला एक लाभाची गोष्ट समजून वारंवार सेक्स करण्यास प्रवृत्त करतो.

प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

या हार्मोनचा अजून एक परिणाम होतो. यामुळे ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत आहात, त्याच्यासोबत राहण्याची भावना दाट होते.

जर सगळं काही ठीक चाललं तर वेळेनुसार प्रेम तुमची स्थिरता आणि समाधानाच्या भावनेवर स्वार होतं. तुमचं दयाळू असणं प्रेमात महत्त्वाची भूमिका निभावतं, असं संशोधन सांगतं.

प्रेमाचे वाईट पैलू

प्रेमाचे वाईट पैलूही असू शकतात. तुमचा मूड एका विशिष्ट लेव्हलला आणणाऱ्या हार्मोन सेरोटोनिनचा स्तर खालावल्यास वेडेपणा, ईर्ष्या यासारखी भावना निर्माण होऊ शकते. प्रेम कायमस्वरूपी सगळ्यांच्याच सोबत राहू शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

कधी प्रेमात तुमच्यासोबत धोकाही होऊ शकतो. असं झाल्यास हृदयविकाराचा झटका आल्याचा अनुभवही येऊ शकतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ब्रेकअप झाल्यानंतर जो तणाव आपण अनुभवतो तो त्या रसायनांमुळे होतो, जे आपल्या मेंदूत शारिरीक दु:खाचा संकेत पोहोचवत असतात.

अशापद्धतीनं आपला मेंदू ब्रेकअपची व्याख्या एका त्रासासारखी करत असतो. पण, प्रेमभंग झाल्यानंतरही तळहाताला येणारा घाम आणि असामान्य वर्तणूक करणारी माणसं ही प्रेमाच्या अनुभवातून जात असतात.

लोक प्रेमात पडतात, दररोज ते अनुभवण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण डोपामाईन त्यांना त्यासाठी प्रवृत्त करू शकतो.

पण, समजा तुमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होत नसेल, तर तुमच्या हृदयावर तुमचा मेंदू भारी पडलाय असं समजायचं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)