उर्फी जावेद-चित्रा वाघ वादावर सुषमा अंधारे म्हणाल्या, अमृता फडणवीसांच्या वेशभूषेवर आक्षेप घ्याल काय?

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, FACEBOOK/SUSHMA ANDHARE

इन्स्टाक्वीन रिअॅलिटी टीव्ही स्टार उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता ती चित्रा वाघ यांच्याबाद्दलच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या वादात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनीही प्रवेश केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे.

उर्फी जावेद

फोटो स्रोत, Instagram

‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असं वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे.

यावर सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून आपलं मत मांडलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतात, साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.

पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच...

अंगप्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?

उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?

चित्रा वाघ यांचं पत्र

चित्रा वाघ यांनी लिहिलंय की, “केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल.

“या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”.

उर्फीचा पलटवार

उर्फीनेही याप्रकरणी ट्विट करत म्हटलं की, “माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील.

“माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या.”

चित्रा वाघ सोडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, असंही उर्फीनं पुढे म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

याआधीही चर्चेत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एका कार्यक्रमात बोलताना चेतन भगत म्हणाला होता की, 'उर्फी जावेदचे कपडे तरुणांचं लक्ष विचलित करतायत.'

त्याच्या या कमेंटनंतर वाद वाढायला लागला. यावर चेतन भगत पुन्हा म्हणतो की, "मी तरुणांना फक्त त्यांच्या करिअरवर लक्ष द्यायला सांगितलं. इन्स्टाग्रामवर त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये." 

ट्विटरवर रिप्लाय करताना चेतन भगत म्हणतो की, "माझ्या वाक्यांचा संदर्भ काढून टाकलाय, मी जे म्हटलं होतं त्यात काटछाट करण्यात आली आहे, आणि जे मी कधी बोललोच नाही ते दाखवण्यात आलंय."

एका साहित्य संमेलनात बोलताना चेतन भगत म्हटला होता की, "मोबाइलमुळे तरुणांचं लक्ष विचलित होतंय, ते तासनतास इन्स्टाग्रामवर रिल्स बघत बसतात."

भगत पुढे म्हणतो की, "हा उर्फी जावेदचा फोटो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना हे माहिती आहे का? हा फोटो कोणत्या कोर्समध्ये शिकवला जाणार आहे का? यातून तुमची प्रगती होणार आहे का? जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणणार आहात का, की तिचे सर्व ड्रेसेस मला माहित आहेत. यात तिचा काही दोष नाहीये, ती तिचं करिअर बनवते आहे. अशा अजून पन्नास आहेत."

चेतन भगतच्या या कमेंटवर उर्फी जावेद म्हणते की, "त्या साहित्य संमेलनात माझं नाव घेणं गरजेचं होतं का? मी लेखक नाहीये, आणि या सगळ्यांशी माझं काहीच देणंघेणं नाहीये." 

चेतन भगतवर व्यक्तिगत निशाणा...

उर्फी जावेदनेही चेतन भगतवर व्यक्तिगत कमेंट केली.

उर्फी जावेद म्हणते, "तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझ्यामुळे तरुणाई बिघडते आहे, ते लपून छपून माझे फोटो बघतात. तरुणांचं सोडा, तुम्ही तरी मोठे आहात, कदाचित माझ्या काकांच्या वयाचे असाल, तरुणांच्या वडिलांच्या वयाचे असाल, आणि तुमचं लग्नही झालंय. पण तरीही तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलींना मॅसेज करता? तेव्हा तरी काहीच खराब वाटत नाही तुम्हाला, ना तुमचं लग्न बिघडलंय, ना तुमची मुलं बिघडली."

उर्फी जावेदने लीक झालेल्या एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये चेतन भगत एका मुलीशी बोलतोय असं दिसतंय.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम रीलमध्ये लिहिलंय की, "असे पुरुष स्वतःमध्ये असलेले दोष स्वीकारत नाहीत, उलट महिलांना दोष देत बसतात. जर विकृती तुमच्यातच असेल तर महिलेने कोणते कपडे घातलेत याने काहीच फरक पडत नाही." 

उर्फी पुढे लिहिते की, "तुम्ही म्हणताय की, माझ्या कापड्यांमुळे तरुणांचं लक्ष विचलित होतंय. पण तुम्ही ज्या पद्धतीने मुलींना मॅसेज करताय त्याने लक्ष विचलित होत नाहीये का?"

चेतन भगत

फोटो स्रोत, Getty Images

चेतन भगतने दिलं प्रत्युत्तर

उर्फीने केलेल्या आरोपांवर चेतन भगत म्हणतो की, त्याने अशापद्धतीने कोणत्याही मुलीशी चॅट केलेलं नाही. आणि तो या मुलीला ओळखत सुद्धा नाही. 

चेतन भगत ट्वीट करतो की, "ना मी अशा कोणत्याही मुलीला ओळखतो, ना मी असं कधी कोणत्या मुलीशी चॅट केलंय, ना मी असं कधी बोललोय. हे जे पसरवलं जातंय ते फेक आहे, खोटं आहे. आणि मूळ मुद्दा म्हणजे मी कोणावर टीका सुद्धा केलेली नाहीये."

तो पुढे लिहितो की, "मला वाटतं की, इन्स्टाग्रामवर वेळ वाया घालवू नका, फिटनेस आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा, असं सांगणं अजिबात चुकीचं नाहीये."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

कोण आहे उर्फी जावेद?

urfi

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, उर्फी जावेद

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे.

उर्फीला इंस्टाग्रामवर जवळपास 10 लाख लोक फॉलो करतात. आणि तिच्या रिल्सला आणि व्हिडिओंना लाखोंच्या घरात व्ह्यूज असतात.

उर्फी बऱ्याचदा मुंबईत पॅपराजींसाठी पोज देताना दिसते.

उर्फी बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. आता ती स्पिट्सविलात सहभागी होणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)