You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉटरी विजेत्याचे नशीबच पलटले, तब्बल 700 कोटींचा लागला जॅकपॉट
लॉटरी काढून कोट्यधीश, लखपती झाल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. पण युनायडेट किंगडममध्ये एका लॉटरी धारकाला तब्बल 709 कोटींची लॉटरी लागली आहे.
व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी 'युरो मिलियन्स' तर्फे घेण्यात आलेल्या सोडतीत एका जणाला ही लॉटरी लागली.
विशेष म्हणजे हा जॅकपॉट लागण्यासाठी सर्व 7 क्रमांक त्याच क्रमाने लागावे लागतात आणि त्यामुळे हा जॅकपॉट लागणे फारच अवघड मानले जाते. पण हा जॅकपॉट लागला असल्याची माहिती नॅशनल लॉटरी ऑपरेटर ऑल्विन यांनी दिली आहे.
तब्बल £65,341,620.50 इतक्या रकमेचा हा जॅकपॉट आहे. याची भारतीय रुपयांत किंमत अंदाजे 709 कोटी रुपये इतकी होते.
या विजेत्याला 04, 14, 31, 36, 38 सोबत लकी स्टार्स 03 आणि 10 हे नंबर क्रमाने लागले.
त्याच बरोबर शुक्रवारी झालेल्या युरो मिलियनच्या सोडतीत 14 जणांना 1 मिलियन पाउंड म्हणजेच अंदाजे 80 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
नियमानुसार विजेत्यांनी सहा महिन्यांच्या आत या बक्षिसांवर आपला हक्क सांगावा लागतो.
विजेत्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते किंवा जाहीर केले जाते. याआधी, काही दिवसांपूर्वीच एका विजेत्याला तब्बल 83 दशलक्ष पाउंड म्हणजेच अंदाजे 905 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला होता.
द नॅशनल लॉटरीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची 23 व्या क्रमांकाची मोठी बक्षीस रक्कम आहे.
2022 मध्ये एका व्यक्तीला 195 मिलियन पाउंड म्हणजेच 2127 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीला 184 मिलियन पाउंडचा जॅकपॉट (2007 कोटी रुपये) लागला होता.
नोव्हेंबर 2024 मध्ये एका विजेत्याला 177 मिलियन पाउंड (1931 कोटी रुपये) इतक्या रकमेची लॉटरी लागली होती.
अद्याप 9 विजेते असे आहेत की त्यांनी आपली बक्षिसाची रक्कम नेली नाही. त्यापैकी सर्वांत मोठी रक्कम ही 1 मिलियन पाउंड म्हणजे अंदाजे 80 कोटी रुपये इतकी आहे अशी माहिती नॅशनल लॉटरीच्या वेबसाइटवर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)