महाराष्ट्रात 'कोसळधार', कुठे काय स्थिती 'या' 10 फोटोंतून जाणून घ्या

मुंबईसह राज्यात गेले तीन-चार दिवस अक्षरश: धुमाकूळ घातला.

आजही (20 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम होता. गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली.

राज्यात 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसात 21 जणांचा मृत्यू झाल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. 19 ऑगस्ट रोजी मृतांचा हा आकडा जारी करण्यात आला आहे.

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 3 जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सोमवारी (19 ऑगस्ट) रात्रीपासून पावसाचा जोर सुरुच असून गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. तर, चंद्रपुरात पूर परिस्थिती कायम आहे.

19 ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पावसात जमिनीपासून उंचावर असलेली प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे अचानक बंद पडली. यात मोठ्या संख्येने प्रवासी आत अडकले होते. दरम्यान, जवळपास दोन तासांनंतर प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.

या 10 फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या राज्यभरातील पावसाची स्थिती

पुण्यात झालेल्या जोरदार पावसाने मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या शहरातील लोकवस्त्या व गावांना प्रशासनाेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक प्रभावित झाली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.