Odisha Train Accident : पाहा कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे हृदयद्रावक फोटो

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (2 जून) अपघात झाला.
यामध्ये सुमारे 233 जणांचा मृत्यू झाला. तर 900हून अधिक जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, ani
या अपघातानंतर देशभरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. अपघातातील मृतांप्रति प्रत्येक जण सांत्वना व्यक्त करत आहे..
कोरोमंडल एक्सप्रेसचा हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. अंधार पडल्याने येथील खरं चित्र समोर येऊ शकत नव्हतं. बचावकार्यातही त्यामुळे अडथळे आले.
पण उजाडल्यानंतर येथील परिस्थितीचं चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे.
घटनास्थळाचे फोटो पाहिले तर येथील परिस्थितीच्या दाहकतेचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
हा अपघात तीन रेल्वे गाड्यांदरम्यान घडला. त्यापैकी दोन प्रवासी तर एक रेल्वे ही मालगाडी होती.

फोटो स्रोत, Getty Images
या अपघातात सुमारे 900पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही घटना इतकी भयानक होती की अपघातानंतर रेल्वेचे डबे घसरून उलटले.

फोटो स्रोत, Twitter@rajtoday
कोरोमंडल एक्सप्रेसचा हा अपघात शुक्रवारी (2 जून) सायंकाळी अंधार पडल्यानंतर काही वेळात घडला. अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

फोटो स्रोत, Twitter@rajtoda
घटनास्थळी मदतकार्यासाठी एनडीआरएफचे पथक हजर झाले आहे

फोटो स्रोत, Getty Images
अपघातानंतर झालेली रेल्वेची स्थिती

फोटो स्रोत, Twitter@rajtoday
या अपघातामुळे एक्स्प्रेसचे डबे अक्षरशः उलटे-पालटे होऊन पडलेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण मध्य रेल्वेने अपघाताशी संबंधित माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.

फोटो स्रोत, @SCRailwayIndia
विजयवाडा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या माहितीसाठी उभी करण्यात आलेली हेल्पलाईन

फोटो स्रोत, @drmvijayawada
अपघातामुळे ओडिशा सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचं जाहीर केलं आहे.

फोटो स्रोत, ani
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

फोटो स्रोत, ani
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








