जेव्हा अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी झाला 'नवरदेव' आणि वरातीतच...

फोटो स्रोत, Dakshesh Shah
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
गुजरातच्या दाहोदहून मध्यप्रदेशकडे जाताना मंडली गावाजवळ असलेल्या जंगलातून एक माणूस चालला होता. जना नावाची एक व्यक्ती डीजेच्या तालावर नाचत होती आणि मागे हळूहळू चालणाऱ्या कारमध्ये नवविवाहित जोडपं बसलेलं होतं.
मध्यप्रदेशच्या सीमेजवळील अलानी तलाईजवळ गाडीत बसलेला 'नवरदेव' गाडीतून उतरला आणि त्याने वरात पाहाणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीची कॉलर पकडली. गावकऱ्यांना काही कळण्याआधीच त्या माणसाला गाडीत कोंबण्यात आले आणि काही कळण्याच्या आत गाडी जंगलात गायब झाली.
एखाद्या थरारक चित्रपटाची कथा वाटावी अशा घटनेत दाहोद पोलिसांनी एका गुन्हेगाराचा छडा लावला आहे.
गुजरातच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगार पेडिया संगडिया याला पकडण्यासाठी दाहोद पोलिसांनी 25 वऱ्हाडी आणि एक नवरदेव तयार केला.
हा गुन्हेगार गेल्या 15 वर्षांपासून गुजरातमध्ये दारूचा व्यवसाय करत होता आणि मध्य प्रदेशात लपून बसला होता. गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तस्कराविरुद्ध 144 गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही राज्यांचे (गुजरात आणि मध्य प्रदेश) पोलीस त्याचा शोध घेत होते.

फोटो स्रोत, Dakshesh Shah
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगडिया यांच्यावर गुजरातमध्ये 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या दारूची तस्करी केल्याचा आरोप आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील गोवाली पत्रा गावातील रहिवासी असलेल्या संगाडियावर मध्य गुजरातमध्ये दारूची तस्करी केल्याचा आरोप आहे.
दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये त्याची चांगली पकड असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
येथे गावे विखुरलेली असून या गावांतील वनमार्गाने आरोपी दारूची तस्करी करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
दाहोद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एल डामोर बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, "लोक दाहोदजवळ सीमा पायीच ओलांडून मध्य प्रदेशात येतात. पेडिया संगाडिया इथल्या जंगलातून आणि आतील, डोंगराळ प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये दारू आणायचा. त्याच्यावर गुजरात आणि मध्य प्रदेश दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल होते. मध्य प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते.
मात्र, मध्य प्रदेशच्या झाबुआ आणि आदिवासी भागात त्याचं चांगलं वर्चस्व असल्याने तो सहज निसटून जायचा.गुजरात पोलीस अटक करण्यासाठी गेले असता तो मध्यप्रदेशात पळून जायचा आणि मध्य प्रदेश पोलीस त्याला पकडायला आल्यावर तो गुजरातच्या जंगलात लपून बसायचा.
"तो जंगलातील अज्ञात रस्त्यांचा वापर करत दारूची तस्करी करायचा. पोलिसांची जीप जंगलात घुसली की त्याला माहिती मिळायची. 2007 पासून तो गुजरातमध्ये दारू तस्करीचं नेटवर्क चालवत होता."
पोलीस उपनिरीक्षक दामोर सांगतात, "आम्ही दारू बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दाहोद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. डी. दिंडोर यांना या तस्कराला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. “पिडिया सांगडिया आलानी तलाई गावात लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली. तेथे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याची दहशत इतकी जास्त होती की यावेळीही अटक करण्याआधी त्याला माहिती मिळेल की काय अशी भीती पोलिसांना वाटत होती.
म्हणून आम्ही वऱ्हाडी होण्याचं सोंग घेण्याचा निर्णय घेतला. कारण सध्या इथे लग्नाचा हंगाम आहे आणि लोक डीजेच्या तालावर नाचायला कायमच उत्सुक असतात.”
डामोर पुढे सांगतात, "पोलिसांनी या तस्करावर 10,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आम्ही साध्या वेशात जाऊन त्याला पकडण्याचे ठरवलं. एक कार भाड्याने घेतली आणि ती सजवली. आम्ही त्यावर लग्नाचे स्टिकर लावलं. आमच्या एका महिला कर्मचाऱ्याने वधूचा वेश परिधान केला आणि इन्स्पेक्टर डामोर यांनी वराचे कपडे घातले.
या गाडीशिवाय 10 मोटारसायकली आणि 25 पोलिसांचा ताफा लग्नाला जातो तसा निघाला. आम्ही डीजे लावला आणि गाणी वाजवायला सुरुवात केली. आळणी तलाई गावाकडे जाण्यासाठी कचली मांडली गावाकडे निघालो. या संपूर्ण नाटकात पोलीस नाचत होते.
गंमत म्हणजे स्थानिक लोक आमच्यासोबत नाचू लागले. आमची परीक्षा मांडलीपासून सुरू होणार होती. आम्ही शक्य तितक्या वेगाने गाडी चालवली जेणेकरून त्या तस्कराला कोणतीही माहिती मिळू नये. कारण आम्हाला जंगलात 750 मीटरचा रस्ता कापायचा होता."
...आणि तस्कराला पकडलं.
शेवटी वरात पेडिया संगडिया लपलेल्या घराजवळ पोहोचली आणि तो ती वरात बघायला बाहेर पडला. पोलीस निरीक्षक दिंडोर हे वराच्या वेशात गाडीतून उतरले आणि त्याला काही कळण्याआधी त्यांनी त्या तस्कराला पकडलं.
तितक्यात पूर्वनियोजित योजनेनुसार वधू-वर झालेला पोलीस त्वरित गाडीच्या पुढच्या सीटवर बसला आणि गाडी पळवून नेली. आणि त्याचवेळी 144 गुन्ह्यातील वाँटेड आरोपींना दाहोद पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
गुजरातच्या स्टेट मॉनिटरिंग सेलमध्ये काम केलेले सेवानिवृत्त एसीपी दीपक व्यास बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, "पीडिया बराच काळ इथल्या जंगलातून दारूची तस्करी करत असे. आम्ही त्याला पकडण्यासाठी अनेकवेळा गेलो, पण त्याला आधीच कळायचं आणि तो जंगलात लपून बसायचा. गावात दारूच्या बाटल्या आणायचा. त्यामुळे तो आदिवासींना पैसे द्यायचा. त्यामुळे आदिवासींना तो रॉबिनहूड सारखा वाटायचा.तो दाहोदच्या जंगलातून दारू आणून आणंद येथील किशोर लंगडा नावाच्या तस्कराला विकायचा. मध्य गुजरातमधील नडियाद आणि अहमदाबाद मध्ये त्याचा व्यापार चालायचा
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








