व्हिनेगरने आजार बरे होतात का? त्याचा आरोग्याला फायदा होतो का?

व्हिनेगरमुळे जंक फुडच्या स्वादात भर पडते. पण अत्यंत लहान पातळीवर केलेल्या शास्त्रीय अभ्यासानुसार असेही सूचित केले जाते की, व्हिनेगरचा आरोग्याला लाभ होऊ शकतो.

स्थूल प्रौढ व्यक्तींवर केलेल्या अभ्यासांती त्यांचे वजन, फॅट मास आणि ट्रायग्लिसराइड बरेच कमी झाल्याचे दिसून आले.

संशोधकांनी 155 जपानी स्थूल व्यक्तींवर प्रयोग केला. त्यांच्यात 15 मिलीलिटर म्हणजे एक चमच्याहून थोडे जास्त किंवा 30 मिलीलिटर म्हणजे दोन टेबलस्पूनहून थोडे जास्त किंवा प्लेसिबो द्रव इन्जेस्ट केले. त्यानंतर त्यांचे वजन, फॅट मास व ट्रायग्लिसराइडवर लक्ष ठेवण्यात आले. 15 व 30 मिलीलिटरच्या गटात संशोधकांनी तीनही मार्कर्समध्ये घट झालेली पाहिली.

या अभ्यासाला अधिक मोठ्या प्रमाणावरील अभ्यासाने पुष्टी करणे गरजेचे असले तरी हे निष्कर्ष आश्वासक आहेत.

प्राण्यांवर, बहुतेक वेळा उंदरांवर केलेल्या प्रयोगांती दिसून आले आहे की, व्हिनेगरमुळे रक्तदाब कमी होण्याची आणि पोटातील चरबीच्या पेशी कमी होण्याची शक्यता असते.

या निष्कर्षांमुळे माणसांमध्ये पुढील अभ्यासासाठी आधार तयार होतो. पण फक्त प्राण्यांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे केलेले दावे अपरिपक्व असतात. माणसांवर अधिक व्यापक प्रमाणात अभ्यास करून व्हिनेगारच्या कथित आरोग्य लाभांची पुष्टी करणे गरजेचे आहे. माणूस व प्राण्यांवर आतापर्यंत केलेल्या अभ्यास पाहता हे निश्चितपणे होणार आहे.

व्हिनेगर शरीरासाठी अपायकारक आहे, असा एखादा पुरावा आहे का? तसे निदर्शनास आलेले नाही. तुम्ही त्याचे अतिप्रमाणात सेवन करत असाल किंवा स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे (सेवन करण्याजोग्या ॲसेटिक ॲसिडमध्ये फक्त 4 ते 8% असते) डिस्टिल्ड व्हाइट व्हिनेगरसारखे ॲसेटिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन व्हिनेगर जास्त प्रमाणात प्यायले किंवा डोळ्यांवर चोळले किंवा रोमन लोकांप्रमाणे ते गोड करण्यासाठी शिच्या पातेल्यात गरम केले तर ते अपायकारक असू शकते. शिस्याच्या पातेल्यात किंवा कढईत कोणतेही अन्न गरम करू नका. ते नेहमीच आरोग्याला अपायकारक असते. त्यामुळे मासे व चिप्स आणि व्हिनेगरचा आस्वाद घ्या. त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

व्हिनेगरचा तुम्हाला वाटत असलेला लाभ होईल, हे निश्चित नाही, पण व्हिनेगर हा सगळ्यावरचा उपाय नाही. पण हा असा जिन्नस आहे, ज्याचा जगभरातील लोक तुमच्यासोबत आस्वाद घेतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)