पाकिस्तान : माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना अटक

शाह मेहमूद कुरेशी

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर हिंसक आंदोलनं सुरूच आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (10 मे) रात्री पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी देशाला उद्देशन एक भाषण केलं. त्यात त्यांनी आंदोलनकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. हिंसाचार करणाऱ्यांनर कठोरातली कठोर कारवाई करण्याचा इरादा यावेळी त्यांनी बोलून दाखवला आहे.

पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेल्या या हिंचासारामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

शिवाय आता इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांनासुद्धा ताब्यात घेण्याचं सत्र सुरू झालं आहे.

बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

अटक होण्याआधी कुरेशी यांनी एक व्हीडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “पोलीस मला अटक करायला आले आहेत. मी एक संदेश देऊ इच्छितो. हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्यलढा आहे. आपल्याला सर्वांना त्यात भाग घ्यायचा आहे. इम्रान खान सध्या अटकेत आहेत. तिथं त्यांच्या जीवाला धोका आहे.”

त्यांनी पुढे म्हटलंय, “तुम्ही तुमचा लढा तोपर्यंत सुरूच ठेवा जोपर्यंत इम्रान खान यांची मुक्तता होत नाही.”

अल कादिर प्रकरण काय आहे?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अल कादिर विद्यापीठ प्रकल्पासाठी अल कादिर ट्रस्टची नोंदणी केली होती.

ही नोंदणी 26 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली होती. या ट्रस्टमध्ये दोन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली होती. यात स्वतः इम्रान खान आणि दुसरी त्यांची पत्नी बुशरा बीबी होत्या.

पाकिस्तानात पीडीएम म्हणजेच पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.

या आरोपात असं म्हटलं होतं की, या दोघांनीही एका रिअल इस्टेट कंपनीकडून बेकायदेशीर मार्गाने मिळवलेले 50 अब्ज रुपये कायदेशीर करून घेतले. आणि त्या बदल्यात आपल्या ट्रस्टला देणगी म्हणून कोट्यवधी रुपयांची जमीन मिळवली.

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी आरोप केले होते की, इम्रान खान सत्तेवर असताना ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी हाती घेतली होती. यानंतर उद्योगपती मलिक रियाझचे पैसे परत करण्यात आले. इम्रान खान यांनी 3 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर ही रक्कम ब्रिटनला परत करण्यासाठी मंजूरी दिली.

शिवाय सरकारने आपल्या आरोपात म्हटलं होतं की, या उद्योगपतीने त्याची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे लपवून ठेवण्यासाठी इम्रान आणि त्यांच्या पत्नीला अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टची जमीन दान म्हणून दिली होती.

इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टच्या नावे घेतलेल्या जमीन प्रकरणाच्या तपासाला आता सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास पाकिस्तानची नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो (एनएबी) करीत आहे.

यापूर्वी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो म्हणजेच नॅब, ब्रिटनमधून बेकायदेशीर मार्गाने आलेल्या संपत्ती प्रकरणाची चौकशी करीत होती.

नॅब अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा प्रकरण तपासाच्या टप्प्यावर येतं तेव्हा आरोपींची चौकशी केली जाते आणि गरज पडल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)